टॅग
7 डिसेंबरपासून नागपुरात सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाबाबत आमदार रोहित पवार यांनी मोठा दावा केला आहे. अधिवेशनाची इमारत दुरुस्तीसाठी बंद राहणार असल्याने पुढील तीन वर्षे नागपुरात अधिवेशन होणार नाही, असे ते म्हणाले. ते अधिवेशनापूर्वी शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्याच्या तयारीत आहेत.