टॅग
ऊसाला 3,800 रुपये दर आणि पहिली उचल 3,500 रुपये मिळावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारी सोलापुरात मोर्चा काढला आहे. संस्थापक तथा माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात सकाळी 11 वाजता चार हुतात्मा चौक ते जुने जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा जाणार आहे. धाराशिवमध्ये दुपारी 12 वाजता येडशी टोलनाक्यावर चक्का जाम होणार आहे.