टॅग
नागपूर महानगरपालिकेतील सुमारे 900 विकासकामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली असूनही ती निविदेच्या टप्प्यापर्यंत पोहोचलेली नाहीत. आर्थिक वर्ष संपायला चार महिने उरले आहेत. लेखा व वित्त विभागाने सोमवारी परिपत्रक काढून विभागप्रमुखांना 2026-27चा सुधारित अंदाज आणि 2027-28चे प्रस्ताव तयार करायला सांगितले आहे. सत्ताधारी पक्षाचे नेते नरेंद्र बोरकर यांच्यासह सुमारे 60 भाजप नगरसेवकांनी महापालिका आयुक्त विनीत इटनकर यांच्याकडे रखडलेल्या प्रस्तावांची तक्रार मांडली आहे.