टॅग
ठाणे जिल्ह्यातील भिवंडीत वंजारपट्टी नाका परिसरातील रस्त्यावरील खाद्यपदार्थाच्या दुकानातील शॉर्मा सोमवारी रात्री खाल्ल्यानंतर ५३ जणांना अन्नविषबाधा झाल्याची शंका आहे. या रुग्णांमध्ये १७ बालके आणि २५ महिलांचा समावेश असून सर्वजण भिवंडी येथील इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयात उपचार घेत आहेत. सर्व रुग्ण स्थिर असल्याचे भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप गाडेकर यांनी सांगितले.