टॅग
हरियाणाचे महसूल मंत्री विपुल गोयल यांच्याकडून नागरी उड्डाण विभाग बुधवारी रात्री काढून घेण्यात आला. मुख्यमंत्री नायबसिंग सैनी आता हा विभाग स्वतःकडे ठेवणार आहेत. महसूल आणि नगर स्थानिक स्वराज्य विभाग मात्र गोयल यांच्याकडेच राहिले आहेत. विभागाकडे राज्याची दोन्ही विमाने आहेत.