टॅग
बंगालच्या उपसागरात तयार होणारी कमी दाबाची पट्टी 26 ऑक्टोबरपर्यंत चक्रीवादळात रूपांतरित होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हे वादळ 28 ऑक्टोबरच्या सुमारास उत्तर आंध्र प्रदेश व दक्षिण ओडिशा किनाऱ्याकडे सरकेल. ओडिशाने अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द केल्या आहेत.