टॅग
अंधेरी पूर्वेतील एमआयडीसी पोलिसांनी ७६ वर्षांच्या रामचंद्र बाबूराव हुंबे यांना ५६ ग्रॅम हेरॉईनसह अटक केली आहे. मादक द्रव्याची किंमत सुमारे ११ लाख रुपये सांगण्यात येते. हुंबे यांची पाच दिवसांपूर्वीच खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणात जामिनावर सुटका झाली होती. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी नालासोपाऱ्यातील पुरवठादाराकडून मादक द्रव्य आणल्याचे सांगितले. पुरवठादाराचा शोध सुरू आहे.