टॅग
नाशिकच्या अंबड आणि सातपूर औद्योगिक वसाहतीतील ६६ इलेक्ट्रोप्लेटिंग उद्योगांवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई केली आहे. १४३ उद्योगांच्या तपासणीनंतर ही कारवाई झाली. दहा बोअरवेलच्या नमुन्यांपैकी पाचमध्ये क्रोमियम आढळले आहे.