टॅग
नागपुरात मुख्य रस्त्यांवरील ई-रिक्षांवरील बंधनांविरोधात गुरुवारी ५०० हून अधिक चालकांचा आक्रोश मोर्चा निघाला. व्हरायटी चौकातून निघालेला हा मोर्चा महाराजबाग चौकात पोलिसांनी रोखला. सर्व १३ रस्ते सुरू करणे, दंडाचा दर निम्म्याने कमी करणे आणि जप्त ई-रिक्षा सोडण्याची मागणी चालकांनी केली.