टॅग
नागपूर महापालिकेने रेशीमबाग मैदानावर कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित स्वयंचलित सार्वजनिक शौचालय सुरू केले आहे. देशातले हे पहिले असे शौचालय असल्याचा महापालिकेचा दावा आहे. 20 नोव्हेंबरला आमदार मोहन मते यांच्या हस्ते उद्घाटन झाले. पहिल्या दोन दिवसांत सुमारे 200 नागरिकांनी वापर केला.