टॅग
अफगाणिस्तानचा रशीद खान पुरुष टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 200 विकेट घेणारा पहिला गोलंदाज ठरला. शारजाहमध्ये झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या टी-20त त्याने तडीवानशे मारुमानीला नवव्या षटकात पायचीत बाद केले. 120 सामन्यांत त्याची सरासरी 13.96 आणि इकॉनॉमी 6.13 आहे. इंग्लंडचा आदिल रशीद 171 विकेटसह दुसऱ्या क्रमांकावर.