मुख्य मजकुराकडे जा
मुख्यमंत्रीमुख्यमंत्री
राजकारणमहाराष्ट्र

एनटीसी गिरणी कामगारांचे प्रश्न नोव्हेंबरमध्ये केंद्रासमोर : सचिन अहिर

एनटीसी गिरणी कामगारांचे प्रश्न येत्या नोव्हेंबरमध्ये केंद्र सरकारसमोर मांडण्याचा शब्द विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी शिवडीतील दसरा मेळाव्यात दिला. बंद गिरण्यांच्या कामगारांच्या उपासमारीचा मुद्दाही संघटनेने मांडला.

· · १ मिनिटाचे वाचन

शिवडी : एनटीसी गिरणी कामगारांचे प्रश्न येत्या नोव्हेंबरमध्ये केंद्र सरकारसमोर मांडणार, असा शब्द महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी दिला.

कामगारांच्या दसरा मेळाव्यात बोलताना अहिर म्हणाले की, पदाचा उपयोग कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी निश्चितपणे करू. हा प्रश्न देशातील बंद एनटीसी गिरण्यांशी निगडित आहे, त्याकडे सरकारचे लक्ष वेधवे लागेल, असेही ते म्हणाले.

राष्ट्रीय मिल मजदूर संघ आणि महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाच्या संयुक्त विद्यमाने संघटनेचा ७९वा वर्धापन दिन सोहळा आणि दसरा संमेलन विजयादशमीच्या पूर्वसंध्येला सोमवारी (१९ ऑक्टोबर) मनोहर मामा फाळके सहभागृहात पार पडले. उपसभापती अहिर मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

प्रारंभी सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी संघटनेच्या वर्धापनदिनाचा मागील इतिहास सांगितला. संघाचे उपाध्यक्ष सुनील बोरकर यांनी एनटीसी कामगारांच्या उपासमारीवर माहिती दिली.

नोव्हेंबरमधील केंद्रासमोरील बैठकीकडे आता कामगारांचे लक्ष आहे.