मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील जनहितैषी धोरणांचा लाभ
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने राज्यातील पदवीधर तरुण, सुशिक्षित बेरोजगार आणि शिक्षकांच्या हितासाठी घेतलेले क्रांतिकारी निर्णय भाजपच्या विजयाचा भक्कम पाया ठरत आहेत. शिक्षण क्षेत्रातील पारदर्शकता, नोकरभरतीची गतिमान प्रक्रिया आणि शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक यामुळे पदवीधर व शिक्षक मतदारांमध्ये भाजपबद्दल प्रचंड विश्वास निर्माण झाला आहे.
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनात अभेद्य संघटनात्मक बांधणी
बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना सूक्ष्म निवडणूक नियोजन आणि बूथ स्तरावरील प्रभावी मतदारांपर्यंत पोहोचण्याचे निर्देश दिले.
या बैठकीत प्रामुख्याने खालील मुद्द्यांवर सविस्तर चर्चा व नियोजन करण्यात आले: मतदार संपर्क मोहीम: पदवीधर व शिक्षक मतदारांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या व अपेक्षा जाणून घेणे.
प्रचार यंत्रणेची आखणी: दोन्ही मतदारसंघांतील प्रत्येक महाविद्यालये, शाळा व शैक्षणिक संस्थांपर्यंत पक्षाचा विचार पोहोचवणे.
शासकीय योजनांचा जागर: फडणवीस सरकारच्या माध्यमातून शिक्षक व पदवीधरांच्या कल्याणासाठी राबवण्यात आलेल्या योजनांची माहिती मतदारांपर्यंत देणे.
यावेळी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ठाम विश्वास व्यक्त केला की, "भाजपचे शिस्तबद्ध संघटन, तळागाळातील समर्पित कार्यकर्ते आणि देवेंद्र फडणवीस यांच्या गतिमान कारभाराच्या जोरावर पुणे पदवीधर मतदारसंघातील उमेदवार डॉ. स्मिताताई योगेश जाधव आणि पुणे शिक्षक मतदारसंघातील उमेदवार कौस्तुभ गावडे हे दोघेही प्रचंड मताधिक्याने विजयी होतील."
भाजपच्या दिग्गज नेत्यांची भक्कम उपस्थिती
पुण्यातील या महत्त्वपूर्ण बैठकीस राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, शहराध्यक्ष धीरज घाटे, मंत्री माधुरीताई मिसाळ, भाजप प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, प्रदेश सरचिटणीस आमदार निरंजन डावखरे, महापौर मंजूषाताई नागपुरे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आमदार, लोकप्रतिनिधी आणि पक्षाचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाजपच्या या एकसंध ताकदीमुळे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात पक्षाचे पारडे अत्यंत जड झाल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.