Monday, September 26, 2022

विद्येचे माहेरघर म्हणवणारा महाराष्ट्र या महत्वाच्या परीक्षेत मागे पडतोय



महाराष्ट्रातून सगळ्यात जास्त विद्यार्थी मेडिकल साठीची नीट परीक्षा देतात. पण सरकारी कॉलेज मिळेल असा स्कोअर त्या प्रमाणत नाहीं. म्हणजे 95 पर्सेंटाइल नाही. विद्येचे माहेरघर म्हणवणारा महाराष्ट्र या महत्वाच्या परीक्षेत मागे पडतोय. 

महाराष्ट्रातील या चांगल्या मार्क्स मिळवणारातही मुंबई-पुण्यातील अमराठी टक्का खूप आहे. ग्रामीण भागाचा आणि त्यातल्या त्यात गरीब घरातील मुलांचा टक्का अजून चिंतेची बाब आहे. एक दोन पेपरात येणारी प्रेरक उदाहरणे सोडल्यास मोठ्या स्केलवर आपण मागे पडत आहोत. त्याची कारणे आपल्या ढासळणाऱ्या शिक्षण व्यवस्थेत आणि संस्कृतीत आहेत. 

वेळीच आपल्या चुका ओळखून प्रयत्न केले नाहीत तर आपल्याला फक्त गणपतीत नागीण डान्स आणि नवरात्रीत गरबा या पलीकडे फार संधी राहणार नाहीत.

- प्रकाश पिंपळे, मुख्यमंत्री.कॉम, www.mukhyamantri.com