भारत हा अजूनही कृषीप्रधानच देश आहे. आपली आर्थसत्ता कोणत्या व्यवसायांनी मोठी होतीये किंवा कोणता व्यवसाय किती भर घालतो हे बघण्या ऐवजी इथली किती लोकं कोणत्या व्यवसायावर जगतायेत ते बघावं. त्यात शेतीचा पहिला नंबर आहे.
शेतीला आर्थिक मदत हे तिच्यावर आपले उपकार नाहीत! आपली अर्थव्यवस्था सुरळीत राहावी म्हणून जसं ब्याकांना दर वेळी भांडवल दिल जातं हा त्यातला प्रकार आहे. आज शेती तोट्यात गेली तर ती उद्या पिकणार नाही, बिन भांडवली धंदा शेतकरी करू शकणार नाहीत. त्याने आपण सगळेच एका जेवण इम्पोर्ट करण्याच्या चक्रात अडकू. आणि मग संबंध अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम दिसेल.
आपल्या शिकलेल्यांच्या भाषेत रूरल परचेसिंग कॅपॅसिटी कमी झाल्याने चहा पावडर, ऑटो मोबाईल, टेलिकॉम ते पार झंडूबाम इत्यादी धंद्यावर याचा परिणाम होईल.
म्हणून आज शेतीत पुन्हा कॅपिटल इन्फ्यूज करण्याची म्हणजे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तीही त्यांनी भरलेल्या विम्यातून आणि शासकीय तिजोरीतून देण्याची वेळ आलेली आहे.
ते होणार नसेल तर अराजकाला तयार व्हा!!
1 comment:
माहितीबद्दल आभारीआहोत
Post a Comment