लोक माध्यमांवर वरील दोन्ही गोष्टी बऱ्याच चर्चेत आहेत. या आणि अशाच अनेक गोष्टी बघितल्यावर एक नक्कीच खरंय की पोट भरलेल्यांचा आणि पोट भरण्यासाठी धडपडणाऱ्यांचा धर्म वेगळा असतो.
सत्याला आणि प्रामाणिकपणाला जवळपास सगळ्याच धर्मात 'खरं धर्मपालन' म्हंटल गेलंय. आणि पुढे हिंदू धर्मात 'धर्माचा विजयच होतो' असंही म्हंटल गेलय, इतरही धर्मात ते म्हंटल गेलेलं असावं असा अंदाज.
ते असो. पण या दोन्ही चित्रांना बघून एक मात्र खरंय कि सत्य हा धर्म असेल आणि सत्याचा विजयच होत असेल तर - उपाशी राहणं, फटाके कपडे घालणं, अगदी ५०० रुपयांसाठी याची त्याची हांजी हांजी करावं लागणं, घरातल्या लग्न कार्यासाठी शेत विकावं लागण, व्याजाने पैसे काढावे लागने या सगळ्याला आपण एक सरकारी जी आर काढून (किंवा मग शंकराचार्यांना बोलून) तातडीने 'विजय' असं डिक्लेअर करून टाकायला पाहिजे.
कदाचित या डिक्लेअर न केल्यामुळे अनेकांची गफलत होऊन ते खोटं बोलून, फसवून, असंवेदनशील होऊन पैसे रुपी 'धर्म-विजयाच्या' मागे भरकटलेत.
किंवा मग या दोघांचे धर्म वेगळे आहेत हे तरी डिक्लेअर करून घेऊत! म्हणजे सोय होईल!