Tuesday, April 30, 2019

माणसाची पापं वाढल्याने दुष्काळ पडतो का ?

दुष्काळाकडे किती हा उन्हाळा असं म्हणून साधं सोप्प त्याच समीकरण करणे धोकादायक आहे. पडणारा उन्हाळा दुसरं तिसरं काही नसून येणाऱ्या अवघड काळाची नांदी आहे. वेळीच त्या काळाला कसं सामोरी जायचं याचा विचार केल्याशिवाय पुढं होणे अवघड होईल. आप-आपल्या परीने आपण जमेल ते प्रयतन या दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी करावे लागतील.

दुष्काळ म्हणजे काय, हे सध्या सोप्या शब्दात आपण आपल्यालाच समजून सांगणं अधिक महत्वाचं. दुष्काळ पडला कि -
१. पाण्याच्या अभावाने पिण्याच्या पाण्याचे हाल होतात
२. दैनंदिन पाण्याशी संबंधित कामं खोळंबतात
३. पाण्याच्या अभावाने उन्हाळा तीव्र होतो
४. वीरनिर्मितीला अडथळे येतात
५. शेतीतील उत्पादन घाटतं
६. जनावरांच्या पाण्याचे प्रश्न उद्भवतात
७. अस्वच्छ पाण्याच्या वापराने रोग उद्भवतात
८. उद्योग धंद्यांना पाण्याच्या अभावाने खीळ बसते आणि नौकऱ्या कमी होतात

हेच नाही तर अनेक गोष्टींवर दुष्काळाचे परिणाम होतात. मग इतका आपल्या जगण्याशी निगडित असलेला प्रश्न आजवर म्हणजे इतका कमी पाऊस आणि जास्त ऊन पडेपर्यंत तुमच्या आमच्या आणि सरकारच्या पहिल्या क्रमवार का नव्हता याचं आश्चर्य! दुष्कळाशी संबंधित अनेक सरकारी धोरणे आहेत, पण त्यातली बहुतेक दुष्काळ पडल्यावर काय करायचं या बद्दलची आहेत.

असो. दुष्काळाला वर वर पाहता झाडे लावणे या पलीकडे सोप्प उत्तर नाही. इतर अनेक गोष्टी करता येऊ शकतात, पण ते लोकांच्या आणि शासनाच्या मर्जीनेच. शासनाच्या का? तर शासन काही वेगळी बाहेरची व्यवस्था नाही, इथली सगळी लोकं मिळूनच शासन बनते.

तर दुष्काळाबद्दल -


  • चार प्रकारचे दुष्काळ असतात
(सौजन्य - https://www.indiawaterportal.org/articles/dealing-droughts)
      • Meteorological droughts occur when there are long gaps in normal rainfall and are measured based on the degree of dryness and the duration of the dry period.
      • Agricultural droughts occur when there is insufficient soil moisture to meet the needs of a crop at a particular time. Agricultural drought usually follows meteorological drought and occurs before a hydrological drought. Agricultural drought can be measured through indicators such as lack of rainfall, changes in evapotranspiration, soil water deficits, reduced groundwater or reservoir levels etc.
      • Hydrological droughts are the result of surface and subsurface water supplies from streams, rivers and lakes becoming scarce due to scanty rainfall. The frequency and severity of hydrological droughts are defined at the watershed or river basin scale and are influenced by factors such as land degradation or land use changes, construction of dams etc.
      • Socioeconomic droughts occur when water shortage starts to affect people’s lives, individually and collectively.
    दुष्काळ का पडतात ?
    • Droughts are caused due to lack of rains over extended periods of time. A number of factors such as temperature changes between land and water, changes in air circulation and erratic weather patterns can affect rainfall frequency and intensity leading to droughts. म्हणजे कुण्याही नैसर्गिक/वातावरणीय कारणाने पाऊस कमी पडल्यास दुष्काळ पडतो.  
    • Human activities such as land use changes, deforestation, urbanisation, pollution can also have a negative impact on rainfall leading to dry conditions and loss of soil moisture. माणसाची पापं वाढल्याने दुष्काळ पडतो. पाप कोणती ? तर जंगलांची घेणे, शहरीकरण म्हणजे मुळशीचे - पुणे - पुण्याची - मुंबई आणि मुंबईच -शांघाय वगैरे करणे, प्रदूषण म्हणजे पायी ऐवजी टू व्हीलर - टू ची फोर आणि पुढे दोन्ही घेऊन ट्राफिक मध्ये आडवी करून धूर सोडत बोंबलत बसने, वगैरे वगैरे. याने दुष्काळ पडतो.    
    • Poor rainfall and high temperatures coupled with overuse of surface and groundwater resources and poor water management practices can lead to demand for water exceeding the available water supply. कमी पाऊस, आणि झाडे तोडल्याने आणि गाड्या वापरल्याने वाढणारे तापमान यामुळे तसेच, हान बोर एक उभा एक आडवा, घे ५००, घे १००० केल्याने. मला कल्पना आहे लोकं हे मुद्दाम करत नाहीत तरी हे त्यातला एक कारण. आणि सगळ्या महत्वाचं कारण म्हणजे आहे त्या पाण्याचा अत्यंत मूर्ख पणे वापर करणे. त्याहून ही मोठं कारण म्हणजे धरणं बांधू , नद्या जोडू, पाणी अडवू आणि त्याने याची आणि त्यांची जिरवू अशा फक्त फोकाट्याच सोडल्याने हि दुष्काळ पडतो.

    म्हणजे एकुणात काय तर पाऊस न पडल्यानेच हे सगळे दुष्काळ येतात. 


    आपल्याकडच्या दुष्काळाची कळणारी करणं :
    • पाण्यासंबंधी विशेष धोरण नसने. 
    • आपल्याकडे बोर घेण्यासाठी परवानगी लागत नाही. गरजेची असल्यास ती घेतली जातीये का हे बघणारी व्यवस्था गांडूळ आहे. 
    • कोणतं पीक घ्यावं या बदल मार्गदर्शन नाही, जे पीक घ्यावं त्यासाठी बाजारपेठ नाही. असलीच तर तिला भाव नाही. नाविलाजाने लोकांना जे कळतं आणि विकतं तेच करावं लागतं. लोक स्वतःहून मूर्ख नसतात व्यवस्था त्यांना तसं वागायला भाग पाडते. आणि सगळ्या लोकांची मिळून जी फॉर्मल व्यवस्था बनते तिलाच 'सरकार' म्हणतात. 
    • लोकप्रतिनिधींना दूरगामी परिणामकारक धोरणांसाठी वेळ नाही. याची बदली कर, त्याला रोडचे गुत्ते दे, बस थांब्यावरचे शेड बांध, वगैरे वगैरे कामं हि 'धोरणं बनवण्यासाठी निवडून दिलेल्यांचा' वेळ खातात. सहज वाटलं बस स्टोपला दार वेळी शेड बांधण्या जमेल तिथं झाडं का लावली नसतील. पावसाळ्याच बाजूला ठेवलं तर नक्कीच हे दूरगामी आहे. असो. 
    • तर हि आणि अशी अनेक आपल्याकडे पाऊस न पडण्याची करणे आहेत.
    अजून काही इतर अभ्यासातून - भविष्यात काय होईल ते ? (सौजन्य - https://agupubs.onlinelibrary.wiley.com/doi/full/10.1002/2014JD021471%20)
    • Changes in total dry days are more severe over western and northeastern part of India as compared to entire India. म्हणजे महाराष्ट्रापुरतं म्हणायचं झाल्यास आपण दुष्काळाच्या अग्रस्थानी आहोत. 
    • In summary we propose that decreases in light precipitation coupled with increases in total dry days and prolonged dry spells as a result of increase in global temperature can increase the risk of droughts in India. परत मुळात काय तर येणाऱ्या दुष्काळ अधिकच दाहक होणार आहे.
    • The results presented in this paper point to increasing risk in drought over India, in particular over the northeastern and western part. आणि महाराष्ट्र बद्दल बोलायचं झालं तो देशातल्या दाहक दुष्काळांपैकी तो एक असणार आहे.
    • We acknowledge the funding for this work from National Science Council of Taiwan under grant NSC96‐2111‐M‐001‐005‐MY3. आणि हे भलतंच!!! भारताच्या दुष्काळावर अभ्यास करायला तैवानी पैसे. कमीत कमी गुगलवर वरती येणाऱ्या कामात तरी हेच सापडलं. इतके आपण अनभिज्ञ आणि मूर्ख.
    तर मुळात कधी कधी ठीक ठाक पाऊस पडूनही हि आपल्याकडे येरे माझ्या मागल्या का आहे तर -

    • Yearly, seasonal and regional variations in rainfall in spite of high average annual rainfall - पावसाच्या पाडण्यात खूप फरक आहे. 
    • A short span of fewer than 100 days during the south-west monsoon - कमी दिवस पाऊस पडतो 
    • Loss of water during heavy rains as surface runoff - पडलेला पाऊस वाहून जातो. 
    • Less rainfall over 33 percent of the cropped area in the country 
    • Over-exploitation of groundwater resources and poor conservation and storage mechanisms for surface water leading to inadequate water availability in times of scanty rainfall - हे महत्वाचं. जमीतल्या पाण्याचा अमाप वापर आणि दळभद्री जलसंधारण आणि नियोजन व्यवस्था.
    • Rapid deforestation, urbanisation and climate change that has been leading to erratic rainfall patterns.  हे ही महत्वाचं. जंगलतोड, शहरीकरण आणि वतावरणातले बदल. आणि या 'वातावरणातील' बदलांचा परिणाम 'वरणातील दाळीच्या' प्रमाणावर होतो हे वेगळं सांगायची गरज नाही.  
    • Limited irrigation coverage leading to excessive dependence of agriculture on rainfall - योग्य सिंचन व्यवस्थेचा आभाव. 
    • Faulty cropping patterns and over emphasis on water guzzling crops - चुकीची पिकं आणि पाण्याचा अमाप वापर.

    सरकार दुष्काळ कसा मोजतं?

    (सौजन्य - http://agricoop.nic.in/sites/default/files/Manual%20Drought%202016.pdf)

    मुख्यतः पाऊस किती पडला, पिकांची स्थिती काय आहे, रिमोट सेन्सिंग आणि इतर टेकनॉलॉजि काय सांगते या सगळ्यांचा विचार करून दुष्काळ आहे कि नाही आणि आहे तर किती आहे हे डिक्लेअर करते. म्हणून दुष्काळाची पाहणी करणारांना दाखवू नका.  बुटं घालून आणि छात्रया घेऊन ही पहाणी करू देऊ नका. त्यांना मातीच्या स्पर्शानेच हैड्रोलॉजिकल इंडेक्स काळाला पाहिजे!

      
    अनेक कारणांनी पाऊस पडतो आणि पडत नाही. अनेक आपल्या हातात ही नाहीत, पण झाडं लावल्याने आपण त्याची दाहकता कमी करू शकतो हे नक्की! म्हणून स्वतः ही जमेल तिथं झाडं लावा. तुमच्या हाकेतल्या शासन व्यवस्थेला हि झाडं लावायला भाग पाडा! 


    No comments:

    Post a Comment