Tuesday, March 12, 2019

इलेक्शन आलेले आहे


इलेक्शन आलेले आहे
जात, शिवाजी महाराज, संभाजी महाराज, धर्म, राम, त्रिशूल, भगवा, आंबेडकर, चक्र, चंद्र, हिरवं आणि अजून काय काय? या सगळ्या गोष्टींचा बाजार तुमच्या समोर असेल.
कन्फ्युज होऊ नका...
यातलं काहीच घेऊ नका...
तुम्ही विचारा त्यांना
स्वातंत्र्यच्या 70 वर्षांत
किंवा तुमच्या मागच्या 5 वर्षात
गावाकडचा 4 किलोमीटरचा रस्ता अजून का डांबरी झाला नाही?
तुम्ही विचारा त्यांना
टॅक्स वाढत असतांना,
शिक्षण कसं काय महागलं
आणि सरकारी, मराठी शाळांच दिवाळं का हो निघालं?
विचार त्यांना
विकासाच्या नावाखाली शहरें बंब होतात,
खेडीच अशी कशी साहेब सुकू सुकू जातात?
विचारा त्यांना
कारखान्याच्या बंदी मागे
राजकारण कुणाचं होतं,
उभ्या तुमच्या उसाचं कळलं
नाही का त्यांना नातं?
ते हात जोडून गप्प हसतील, 
तरी तुम्ही विचारा त्यांना
कश्मीराचं ठीकंय साहेब,
आपण नक्कीच तरुन जाऊ,
पाकिस्तानातल्या लाहोराच्या
वेशिवरती जाऊन येऊ,
पण विधवा-त्या-फौजिची
विहिरीचं तिच्या काय झालं,
जमीन लाटली तिची यांनी
त्यांचं आधी पाहून घेऊं?
तरीही हसतील ते.
सोबतचेही होतील शामिल.
तरीही त्यांच्या चेहऱ्यासमोर बोटे मोडून म्हणा
देश साहेब माझाच आहे,
मीच त्याचा कर्ता,
मतदानाच्या दिवशी
सगळा हिशेब करील बरंका.

वाटोळं केलंत लोकशाहीचं,
तुमचंही तेच होईल!
तुमचं ही तेच होईल!

No comments:

Post a Comment