पुरोगामी महाराष्ट्राचे एक शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांची आज जयंती. यशवंतराव चव्हाण यांचा जन्म १२ मार्च १९१३ रोजी झाला. त्यांच्या ७० वर्षांच्या आयुष्यात साहेबांनी जे काम केले आणि महाराष्ट्राची आणि देशाची जी सेवा केली ती स्वातंत्र्य प्राप्तीनंतरच्या काळातील काहीच एकमेवाद्वितीयांपैकी एक. साहेबांनी संतांची आणि समाज सुधाकारांची पार्श्वभूमी असणाऱ्या महाराष्ट्रात पुढे त्याच पायावर शिवाजी महाराज-फुले-टिळक या आणि अशा अनेकांच्या विचारांच्या प्रेरणेने नव्या महाराष्ट्राचा कळस उभा केला. महाराष्ट्रातील राजकारणाला अतिशय आदर्श असे मापदंड घालून दिले. व्यक्तिगत आणि क्षेत्रीय विचारांच्या पलीकडे राष्ट्रहितासाठी राजकारण हा जो पायंडा महाराष्ट्रातील राजकीय चळवळीला लाभलाय तो म्हणजे यशवंतरावांचीच देन.
यशवंतरावराव चव्हाण जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!