समजा तुमच्याकडे धुनी भांडी करायला मोलकरीण आहे.
ती तिच्या गरिबीबद्दल रोज बोलत असते.
तुम्हीही तिला सहानुभूती पूर्वक चार शब्द बोलता.
ती सांगते तिच्या गरिबीची कारणे आणि मग तुम्ही तिच्या मुलाला कधी कधी शाळेच्या फी साठी मदत करता. चांगलंय ते.
पण एक दिवस तिच्या घरी नवरा भांडण करतो दारू पिऊन.
तुम्ही तिला तेंव्हा सांगता - तुझ्या गरिबीचं कारण तुझा कमी पगार किंवा महागाई नाही. तुझा नवरा दारू पितो. तेचयं मूळ तुझ्या गरिबीचं.
मग तुम्ही तिचा पगार वाढवायचा मुद्दाच उरतच नाही!
आहे कि नाही गम्मत. कारण दारू पिऊन पिऊन तो पितो तरी कितीची. २०-३०-५०-१०० ची.
आणि गरिबी? लाखो हजारोंची.
आहेच दारू वाईट. कुणीच पिऊ नये. तिचं समर्थन करणारांना किडे लागोत.
पण गरिबीचं कारण फक्त दारू?
हे म्हणजे साप सोडून कातीन बडवणं.
हेच करतोय आपण पुन्हा पुन्हा शेतकऱ्याच्या आणि त्यांच्या मुलींच्या आत्महत्या बघून.
मुळातच देण्या-घेण्याने लग्न मोडूही नये आणि जमू ही नये.
पण सगळं अरिष्ट या इतक्यानेच आलंय असं म्हणत असाल तर, हम्म.
तुम्ही चांडाळ आहात. कपटी आहात. त्या मोलकरणीची पगार न वाढवणारी मालकीण आहे तितकेच.
कारण मूळ प्रश्न सोडवायला तुम्हाला स्वतःला झीज लावून घ्यावी लागेल.
म्हणून मुळात जायला आपण शिकायला पाहिजे.
साप सोडून कातीन झोडपणं
काय म्हंटल सोडून कोण म्हंटल यावर चर्चा करणं
मजकूर सोडून व्याकरणावर वाद घालणं
आपण सोडायला हवं.
कारण मूळ प्रश्न सोडवायचा नसला कि
हे असले धंदे सुचतात - 'मी म्हंटलं होतं ना कि हे असेच आहेत' सारखे.
नियत सुधारू.
हमीभाव देऊ.
No comments:
Post a Comment