शरद पवार नेमके रसायन काय आहे हे कळणे अवघड. साहेबांना शाहू पुरस्कारही भेटतो आणि टिळक पुरस्कारही भेटतो. त्याच वेळी ते अण्णाभाऊंना हि विसरत नाहीत आणि तळागाळातल्या गरिबांनाही.
राजकारणा पलीकडे जाऊन बघाल तर शरद पवार ही व्यक्ती महाराष्ट्राला लाभलेलं अत्यंत महत्वाचं व्यक्तित्व आहे.
लोकमान्य पुरस्कार मिळाल्या बद्दल शरद पवारांना मुख्यमंत्री.कॉम कडून हार्दिक शुभेच्छा!
"स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि ते मी मिळवणारच", भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचे आद्य प्रवर्तक लोकमान्य टिळकांच्या या वाक्याने स्वातंत्र्यप्राप्तीची स्फूर्ती जनमनात संचारली. या ऐतिहासिक, अजरामर गर्जनेस १०० वर्षे पूर्ण होत आहेत. अशा वेळेस हा सन्मान प्राप्त होतोय, याचा मला आनंद आहे. नुकतेच राजर्षी शाहू महाराज पुरस्कारानेदेखील मला सन्मानित करण्यात आले. दोन वैचारिक मतभेद असणारे शाहू महाराज आणि लोकमान्य टिळक. मी स्वतःस भाग्यवान समजतो की, या दोघांच्याही नावाने दिले जाणारे मानाचे पुरस्कार एकाच वर्षी प्राप्त होण्याचा योग आलाय. आजचा दिवस फार थोर आहे, आजच्याच दिवशी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे. सामाजिक न्याय आणि समतेसाठी लढा देण्याकरिता अण्णाभाऊ साठे यांनी आपली लेखणी प्रभावी अस्त्रासारखी वापरली. आपल्या साहित्यामधून त्यांनी सामान्य कार्यकर्त्यांनाच घडवले असे नाही, तर सामान्य माणसातही शोषणाविरोधात प्रतिकार करण्याची क्षमता निर्माण केली. आज याप्रसंगी मी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचेही स्मरण करतो. .... शरद पवार
No comments:
Post a Comment