Friday, June 10, 2016
Thursday, June 2, 2016
#शेतकरी_कर्जमाफी माफी नव्हे, बेजबाबदार पॉलिसीज् मुळे झालेल्या नुकसानीची भरपाई !
खरं दु:खं कसं असतं. तसं खरं खोटं काही नसतं. पण जे खोलवर, आतून माणसाला निराश करतं ते दु:खं वेगळंच. तीन-चार वर्षांपासून तुमच्या व्यवसायात तुम्ही नुकसानीत आहात. तुमची एक चिमुली ९वित शिकायला. मोठा मुलगा मेडीकलला. अगदी हुशार. सगळ्यात मोठी लग्न होऊन गेलेली. तिचा नवरा छोट्याश्या नौकरीत. छोट्या शहराच्या ठिकाणी. तिलाही वर्षभराची एक चिमुली.
जून येतो. चिमुलीला वह्या पुस्तकं घ्यायची असतात. ती झेड.पि.त नाही. विकत घ्यावी लागतात. कपड्या सहित सगळा मिळून खर्च १२००-१३०० रुपये. तुमचा व्यवसाय शेती. जून आला म्हणजे पाऊस येईल या श्रधेखातर तुम्ही बियाणंही घेनारं त्याचा खर्च १०-१५ हजार. मोठ्याची सरकारी कॉलेजचीच, पण फीस तर भरावीच लागते. तीही ४०-५० हजार. पुढे दिवाळीही येईल, पिकावर रोगही पडेल. आणि मागेच मोठीचं बाळंतपण हि झालेलं. तेही सिझर. खर्च रुपये ३०-३५ हजार.
आता या सगळ्या माहित असलेल्या आणि माहित नसलेल्या संख्यांच्या बेरजा लावल्या आणि खिशातली आणि ब्यांकेतली रक्कम मिळून त्यानां जुळवायला बसलं तर मेळ लागणारच नाही. कारण ब्यांकेत असतात रुपये फक्त १०० आणि खिशात पेट्रोल साठीचे रुपये ५०.
आणि आज २ जुन म्हणून तयार होऊन छोटी चिमुलि वह्या पुस्तकं खरेदी साठी गाडीवर मागे बसलेली. तुम्ही किक मारावी कि नाही या विवंचनेत. जावं तर कुण्या दुकानावर जावं याच विचारात. हातापायाला थरकाप सुटावा इतकी हतबलता. हे खोलवरचं दु:खं. उद्या संपेल कि परवा, नेमकं माहित नसलेलं. पाहवं तिथवर अंधार. तितक्यात कुणी तरी मागून धावत येतं. कुठे निघालात विचारतं. तुम्ही सांगता. तो म्हणतो मी पण येतो. तुम्ही तर जावचं कि नाही या विवंचनेत अजून. तो सांगतो ब्यांकेत जायचय, पिक कर्ज माफ झालय. क्षणातच हातापायात जिव आणि मनात आशा आणि धीर येतो. सुरु व्हायला १-२ मीनिटं घेणारी गाडी क्षणात सुरु होते.
साध्या #शेतकरीकर्जमाफी #शेतकरी_कर्जमाफी नं इतकं होणार असेल तर ज्यांच्या प्राईस रेगुलेटेड प्रोड्यूस ने पोटं भरून फ्रीमार्केटात काम करायची ताकत येते, जे पत्तीपुडा, झंडू बाम, पतंजली पेस्ट, लक्स ते टू व्हीलर, ट्राक्टर ते अगदी इंड्रेल पर्यंत प्रत्येक गोष्टीवर ट्याक्स देतात त्यांची गरजेची कर्जमाफी करायला काहीच हरकत नसावी. माफी कसली गांडूनो, तुम्ही केल्याला बेजबाबदार पॉलिसीज् मुळे झालेल्या नुकसानीची भरपाई आहे ती!