त्याने दोन देशीच्या कॉर्टर रिकाम्या केल्या. आज रविवार असल्याने त्याला एक टोळकं खाखी चाडीत जातांना दिसलं. सकाळी सकाळी हे असले विदुषी कपडे आजकाल पुन्हा बघून त्याला आश्चर्य वाटले. समोर जाऊन त्यांना थांबवणार तोच त्यातला एकजण संघ दक्ष अस काही तरी म्हणाला आणि सगळी ग्यांग एकदम थांबली. महादेव त्या संघ दक्ष म्हननाराच्या समोर गेला आणि म्हणाला 'कुठं निघालाय मंडळी?' अनेकांनी कुजबुजून म्हंटले - गुरुजी चला कशाला त्याच्या नादी लागता. पण गुरुजीला राहवेना. संघाच्या नियमाप्रमाणे जमेल तितक्या जास्त लोकांना संघाची ओळख करून द्यायची हे गुरुजींचे ठरलेले. गुरुजींनी सांगितले आम्ही शाखेला चाललो. 'शाखेला' म्हणताच महादेवचा उर भरून आला, त्याने लगेच सगळ्यांना 'जय महाराष्ट्र' घातला. गुरुजींनी त्याला मधेच थांबवून म्हंटले अरे 'जय महाराष्ट्र' नाही - वन्दे मातरम म्हण. तुला वाटतेय ती शाखा मी म्हणत नाहीये. महदेव बुचकळ्यात पडला, मग कोणती? गुरुजी उवाच - अरे आम्ही हिंदू लोक्स आणि हिंदू राष्ट्र यासाठी स्वयंशासन आणि व्यक्ती विकास याचे धडे देणारी संघटना आहोत. तू म्हणतोयेस त्या शाखेत असे काही होत नाही. बाकी सगळे महादेवाने निमूट ऐकले होते पण, शेवटच्या वाक्याने महादेवाची आता पुरती उतरली होती. शाखेचा अपमान म्हणजे घोर पाप या नियमाने शीरछेद किंवा कडेलोट हीच शिक्षा याला द्यावी असे महादेवाला वाटले पण पक्ष सोडून १ वर्ष उलटल्याने राडेबाजी थोडी कमी झाली होती. पण मनातच त्याने ठरवले आज यांच्या चड्ड्या उतरवायच्या - त्याने गुरुजींना प्रश्न केला. गुरुजी, तुमचा हा संघ देश फोडण्याची कामे करतो असे मी ऐकलेय? गुरुजी शांततेने म्हणाले, 'असे आरोप करणारे संघाला नीट ओळखत नाहीत, त्यांनी संघाच्या कामाबद्दल माहिती घ्यावी आणि मग बोलावे'. महादेव हसला त्याला हे उत्तर माहित होते. शेजारी राहणाऱ्या कमळाबाईचा नवरा दर रविवारी शाखेत जायचा. आणि रोज संध्याकाळी ८ वाजता बायकोला शाखेत जातोय असे सांगायचा ते वेगळे. असो. तर त्याच्याकडून ८ च्या शाखेत त्याला ही असली उत्तरे आधीच पाठ करून घेतात हे पूर्वीच कळलेले. त्याने पुन्हा एक प्रश्न केला तुम्हाला हिंदू राष्ट्र म्हणजे नेमके काय पाहिजे? गुर्जी उवाच … क्रमश
No comments:
Post a Comment