Sunday, October 25, 2015

संघ दक्ष

त्याने दोन देशीच्या कॉर्टर रिकाम्या केल्या. आज रविवार असल्याने त्याला एक टोळकं खाखी चाडीत जातांना दिसलं. सकाळी सकाळी हे असले विदुषी कपडे आजकाल पुन्हा बघून त्याला आश्चर्य वाटले. समोर जाऊन त्यांना थांबवणार तोच त्यातला एकजण संघ दक्ष अस काही तरी म्हणाला आणि सगळी ग्यांग एकदम थांबली. महादेव त्या संघ दक्ष म्हननाराच्या समोर गेला आणि म्हणाला 'कुठं निघालाय मंडळी?' अनेकांनी कुजबुजून म्हंटले - गुरुजी चला कशाला त्याच्या नादी लागता. पण गुरुजीला राहवेना. संघाच्या नियमाप्रमाणे जमेल तितक्या जास्त लोकांना संघाची ओळख करून द्यायची हे गुरुजींचे ठरलेले. गुरुजींनी सांगितले आम्ही शाखेला चाललो. 'शाखेला' म्हणताच महादेवचा उर भरून आला, त्याने लगेच सगळ्यांना 'जय महाराष्ट्र' घातला. गुरुजींनी त्याला मधेच थांबवून म्हंटले अरे 'जय महाराष्ट्र' नाही - वन्दे मातरम म्हण. तुला वाटतेय ती शाखा मी म्हणत नाहीये. महदेव बुचकळ्यात पडला, मग कोणती? गुरुजी उवाच - अरे आम्ही हिंदू लोक्स आणि हिंदू राष्ट्र यासाठी स्वयंशासन आणि व्यक्ती विकास याचे धडे देणारी संघटना आहोत. तू म्हणतोयेस त्या शाखेत असे काही होत नाही. बाकी सगळे महादेवाने निमूट ऐकले होते पण, शेवटच्या वाक्याने महादेवाची आता पुरती उतरली होती. शाखेचा अपमान म्हणजे घोर पाप या नियमाने शीरछेद किंवा कडेलोट हीच शिक्षा याला द्यावी असे महादेवाला वाटले पण पक्ष सोडून १ वर्ष उलटल्याने राडेबाजी थोडी कमी झाली होती. पण मनातच त्याने ठरवले आज यांच्या चड्ड्या उतरवायच्या - त्याने गुरुजींना प्रश्न केला. गुरुजी, तुमचा हा संघ देश फोडण्याची कामे करतो असे मी ऐकलेय? गुरुजी शांततेने म्हणाले, 'असे आरोप करणारे संघाला नीट ओळखत नाहीत, त्यांनी संघाच्या कामाबद्दल माहिती घ्यावी आणि मग बोलावे'. महादेव हसला त्याला हे उत्तर माहित होते. शेजारी राहणाऱ्या कमळाबाईचा नवरा दर रविवारी शाखेत जायचा. आणि रोज संध्याकाळी ८ वाजता बायकोला शाखेत जातोय असे सांगायचा ते वेगळे. असो. तर त्याच्याकडून ८ च्या शाखेत त्याला ही असली उत्तरे आधीच पाठ करून घेतात हे पूर्वीच कळलेले. त्याने पुन्हा एक प्रश्न केला तुम्हाला हिंदू राष्ट्र म्हणजे नेमके काय पाहिजे? गुर्जी उवाच … क्रमश

Friday, October 9, 2015

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी

मुख्यमंत्र्यानी मंत्रालयात गरजू रूग्णासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी या नावाने कक्ष उघडला आहे ही सुविधा सर्व आजारावर आहे किमान 2 लाखापर्यंत मदत मिळू शकते त्यासाठी मंत्रालयात थेट फोन करून माहिती घेऊ शकता फोन नं 022 22026948 प्रमुख.श्री .शेटे साहेब 7वा मजला
** नियम**
1) एक लाखाच्या आत उत्पन्न दाखला
2) केसरी/पिवली रेशन कार्ड
3) आधार कार्ड
4) मुंबई बाहेरचे रूग्ण असतील तर हाँस्पिटल कोटेशन 

Monday, October 5, 2015

आपण एका अराजाकेतेत आहोत

संघावर म्हणजे जो खाकी रंगाच्या हल्फ प्यांट घालून राष्ट्रवादाच्या चर्चा करतो अशा संघावर टीका करण्याचे माझे तसे काही व्यक्तिगत कारण नाही. पण भारताच्या जडण-घडणीत किंचितही हिस्सा नसतांना इथच्या संस्कृतीला विनाकारण कसला तरी धार्मिक रंग चढवायचा प्रयत्न केला जातोय. अनेक मूर्ख सेकुलर या शब्दाला सिकुलर म्हणतात. मुर्ख या कारणाने कारण ज्या निश्चिंतपाणे ते हा शब्द उच्चारतात त्या निश्चिंतीतेचे करणाच या देशाचे सेकुलर असणे आहे. तर संघ इतका समोर ठेऊन का टीका केली जातेय. सध्याची अराजकता. होय पटत नसेल तर वाचू नका. आपण एका अराजाकेतेतच आहोत. तुम्ही विशिष्ट प्रकारचा विचार करत असाल तरच तुम्ही राष्ट्रभक्त ही संकल्पना उदयास आली आहे. आणि दुर्दैवाने ती ही अशा लोकांकडून ज्यांची निष्ठा भारतापेक्षा मनुस्मृती आणि धर्मावर आहे. कुणी म्हणेल तुम्ही असेच मुस्लिमांबद्दल का बोलत नाही. मी म्हणतो आधी मी माझे घर साफ करेल. आणि मुस्लिम, ख्रिचन अशा प्रत्येक धर्मात असे मूर्ख आसतात. आढळतील तिथे अशा मुर्खांची समजूत घालायला पाहिजे, ज्याने राष्ट्र स्वतंत्र राहायला मदत होईल.
तर मूळ मुद्दा - संघ हा काही राष्ट्रीय वगैरे काही नाही. त्याची सुरवात राष्ट्र सेवेसाठी झाली नाही. आणि हे त्यांच्याच लिखाणावरून इथे स्पष्ट केलेय (अप्रैल 17, डॉक्टरजी के घर में उपस्थित सभा ने संघ का नाम निश्चित किया। जरिपटका मंडल, भारत उद्धारक मंडल, हिंदू सेवक संघ और राष्ट्रीय स्वयंसेवक संघ इन चार प्रस्तावित नामों में राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यह नाम चुना गया। -http://www.mukhyamantri.com/2014/10/blog-post_17.html) तर "हिंदू सेवक संघ" म्हणण्या ऐवजी त्याला राष्ट्रीय हा शब्द जोडला गेला. तसेच एकंदर काम पाहता ही धर्म हाच संघाचा मूळ गाभा. या देशात प्रत्येकाला मत मांडायची मुभा आहे. तशीच संघालाही. बरं हे लिहिल्यावर अनेकांना मी आणि माझ्या सारखे विचार करणारे एकतर सिकुलर वाटत किंवा विशेष माझ्या बद्दल म्हंटले तर मी संभाजी ब्रिगेड वगैरेचा कार्यकर्ता असेल असे वाटते. तर अशांच्या माहितीस्तव तसे काहीही नाही. जसा संघा मूलतः ब्राम्हनांची संघटना आहे आणि इतर जाती आणि धर्मातील लोक जसे तिथे चवीला आहेत त्याच प्रमाणेच संभाजी ब्रिगेड जशी मूलतः मराठा युवकांची संघटना आहे आणि इतर जाती धर्मांचे तीतही स्थान तसेच आहे. पण दोन्ही संघटनांना आपला विचार मांडायची मुभा आहे. म्हणून दोन्हीतही असणाऱ्या कार्यकर्त्यांना आणि त्यांचा भाग होऊ पाहणाऱ्याना याची जाण्यापूर्वी माहिती असावी. आता ब्रिगेडला झुकते माप म्हणून नाही पण त्यांचा प्रामाणिकपणा म्हणून - ते जे बोलत आहेत तेच करत आहेत. त्यांचा जातीय द्वेष हा सगळ्यात चुकीचा गुण आणि त्या कारणानेच संघटन अनेकांना आपले वाटत नाही. असो. याला कारण हे - http://www.bbc.com/…/ind…/2014/10/141012_why_i_left_rss_rns…