Monday, August 31, 2015

पुरोगाम्यांच्या हत्या

जगप्रसिद्ध  सनातन प्रभातचे काही अशातले लेख :

२. पुरोगाम्यांच्या हिंदु धर्मविरोधी कारवायांकडे दुर्लक्ष
                                          करून शासनच अशा हत्यांना प्रोत्साहन देत नाही का ? 

 अशी विधाने होऊनही हिंदू कधी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण करीत नाहीत; म्हणून पोलीस धर्मद्रोह्यांच्या विरोधात कृती करीत नाहीत. पोलिसांना कृती करण्यास भाग पाडण्यासाठी आता हिंदूंनीही कायदा हातात घ्यावा, असे पोलिसांना अपेक्षित आहे का ?
    जगभरातील कोट्यवधी हिंदूंच्या धर्मभावना दुखावणारी अशी वक्तव्ये करून ही पुरोगामी मंडळी उजळ माथ्याने फिरत असतात. शासनही त्यांच्यावर काही कारवाई न करता त्यांना विविध पुरस्कार देऊन मानसन्मान देत असते. हेच अन्य धर्मांच्या बाबतीत झाले, तर त्यांच्या धर्मभावना दुखावणार्‍यांवर शासन त्वरित कारवाई करते. अशीच कारवाई शासनाने हिंदूंच्या धर्मभावना दुखावणार्‍यांवर केली, तर धर्मप्रेमी हिंदूंमध्ये न्याय मिळाल्याची भावना निर्माण झाली असती आणि पुरोगाम्यांच्या हत्या करण्यापर्यंत त्यांचे विचार झाले नसते. डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे आणि आता डॉ. कलबुर्गी यांच्या हिंदु धर्मविरोधी कारवायांविषयी शासनाने त्यांच्यावर कारवाई केली असती, तर कोणाला त्यांच्या हत्या करण्याची आवश्यकता वाटली असती का ? 
================

No comments:

Post a Comment