असंख्य भारतीय तरुणांचे आणि लहानांचे प्रेरणास्थान माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम आज आपल्यात नाहीत. वयाच्या ८४ व्या वर्षी गेलेले असले तरी अजूनही काळी काळ त्यांनी देशाच्या स्वप्नांना फुलवत राहायला हवे होते असे वाटते.
त्यांनी त्यांच्या हयातीत केलेले काम हे प्रचंड आहे. मिसाईलात त्याने पृथ्वीच्या बंधनातून मुक्त व्हावे इतके प्राण ओतणारे कलाम या देशातील जवळच्या काळातील तरुणांत स्वप्न ओतणारे एकमेव.
आज देशभर खेड्यापाड्यात मुलं मोठी होवून अब्दुल कलाम बनवीत या स्वप्नांनी भारलेली अनेक घरं मिळतील. स्वप्नपंखांत प्राण फुंकणारा आपल्यातून निघून गेलाय याच प्रचंड दुखः मनाशी घेऊन त्या सगळ्या घरांचा आजचा दिवस कसाबसा निघेल.
या स्वप्नपंखात बळ असच राहो म्हणून त्याच्याकडे प्रार्थना.
No comments:
Post a Comment