Friday, October 31, 2014
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हार्दिक अभिनंदन
Run for Unity!
I have not yet walked for unity! But I am for Unity. I believe more in unity of hearts than just the unity of lands. I think it will be more meaningful if we walk to those who are underprivileged, out caste (as per the elites definitions). I hate all this as it's an opportunity for 'most' to take the selfie and 'just' show how much they love the nation. I bet, offer them a permanent visa to a dollar or pound paying country and 'many' will run for 'getting out of this nation as soon as possible'!
It's not because I wasn't able to take the selfie and post. It's because 'events' like these keep the real concerns neglected. I hope everybody who is running today also remembers that the country has farmers who feed them and the same farmers are facing 'lowest prices for goods' in recent times. I hope they also remember the caste system here has recently chopped a family into pieces. Shankaracharya here has asked to ban Temple entry to Dalits.
I hope we run to connect and meet to these hearts who live with us!
Saturday, October 18, 2014
निकाल … पथारी-परभणी आणि जिंतूर विशेष
>जिंतूर भाम्बले आघाडीवर. नव्या चेहऱ्यांना हास्य - जवळपास विजयांचा विजय! - 7%(Vi) and 5.5%(Bo) vote share - updates to - 8.5% and 6.2% - update 9.80 and 7.2 - ११.०१ आणि ८.३३ विजय तेजीत - टोटल मतदार 324012 - गणती झाली ७६४८६(२३.६०) - 12.15 and 9.05 till now 25.79 counted - 13.45 and 10.25 counted 28.65% - 14.38 and 10.95 counted 30.75
>परभणीत सेना आल्या सारखीच आहे! - shivsena and BJP - 5.5%(Dr) and 2.5%(bh) vote share - updates to 8.72 and 4.26 - update 9.72 and 4.8 - आता अपडेट देणार नाही. सेनेचा विजय निस्चित. - tarihi 11.5 and 5.7 total counted 26%
>औरंगाबादमधील एम आय एम चा विजय निश्चित. राष्ट्रवादी आधीच मानेज झाली होती भाजपने धर्माचे महत्व इतके वाढवले कि, धर्मन्धाच हवे तर आपलेच का नको
>गंगाखेड चुरस - पैसे कुठे गेले ?
>माजलगाव, बीड चुरस
DATA:
FAD MOHAN MADHAVRAO | Independent | 31158 | 109547 | 9.3420003238 | Votes Counted % | PATHRI | |
ABDULLAH KHAN A .LATIF KHAN DURRANI | Nationalist Congress Party | 27123 | 8.1321995886 | 32.8451155232 | Total Voters | 333526 | |
WARPUDKAR SURESH AMBADASRAO | Indian National Congress | 22709 | 6.8087645341 | ||||
MEERA KALYANRAO RENGE | Shivsena | 15997 | 4.7963277226 | ||||
HARIBHAU VITTHALRAO LAHANE | Maharashtra Navnirman sena | 2871 | 0.8608024562 | ||||
COM. VILAS SAHEBRAO BABAR | Communist Party of India (Marxist) | 1499 | 0.4494402236 | ||||
SITAFALE VIJAYKUMAR TULSHIRAM | Swabhimani Paksha | 1419 | 0.4254540875 | ||||
ARJUN RAMRAO SABLE BHOGAOKAR | Bharipa Bahujan Mahasangh | 1288 | 0.3861767898 | ||||
RAMESH YAMAJI GHAGARE | Independent | 771 | 0.2311663858 | ||||
GUJAR SUBHASH YELAPPA | Bahujan Samaj Party | 724 | 0.2170745309 | ||||
RUMALE TUKARAM DHONDIBA | Prabuddha Republican Party | 531 | 0.1592079778 | ||||
PATHAN TALEWARKHAN PATHAN SHERKHAN | Independent | 448 | 0.1343223617 | ||||
ASHOK GANPATRAO GAIKWAD | Independent | 427 | 0.128026001 | ||||
JANARDHAN SAMBHAJI HATAGALE | Independent | 373 | 0.1118353592 | ||||
KALE BAJIRAO SHANKARRAO | Independent | 334 | 0.1001421179 | ||||
MRS. SHANTABAI MANOHARRAO SHAMKUWAR | Independent | 277 | 0.0830519959 | ||||
JADHAV NARAYAN GULABRAO | Independent | 232 | 0.0695597944 | ||||
CHAVAN REVA HARI | Independent | 227 | 0.0680606609 | ||||
None of the Above | None of the Above | 774 | 0.2320658659 | ||||
None of the Above | None of the Above | 365 | 0.1094367456 |
BHAMALE VIJAY MANIKRAO | Nationalist Congress Party | 46593 | 99666 | 14.3800229621 | 30.7599718529 | ||
KADAM RAMPRASAD WAMANRAO (BORDIKAR) | Indian National Congress | 35483 | 324012 | 10.9511376122 | |||
SANJAY NARAYAN SADEGAONKAR | Bharatiya Janata Party | 9109 | 2.8113156303 | ||||
PATIL (KHARABE) RAM SUKHDEV | Shivsena | 1663 | 0.5132525956 | ||||
BHAGWAN PRABHUAPPA GUNJKAR | Bahujan Samaj Party | 1144 | 0.353073343 | ||||
COMRADE RAJAN KSHIRSAGAR | Communist Party of India | 895 | 0.2762243374 | ||||
S. RAIS S. IDRIS | Independent | 660 | 0.2036961594 | ||||
AD. LAXMANRAO PUNJAJI BANSODE | Independent | 659 | 0.2033875289 | ||||
KAILASH DIGAMBARRAO PARWE DUDHGAONKAR | Independent | 567 | 0.1749935188 | ||||
A. HARUN A. KHUDDUS | Independent | 356 | 0.1098724739 | ||||
CHAVAN VITTHAL CHANDU | Independent | 319 | 0.0984531437 | ||||
ARJUN DADARAO DARADE | Independent | 239 | 0.0737627001 | ||||
SY. DILAWAR SY. JAMAL SAHAB | Independent | 201 | 0.0620347395 | ||||
ANIL GANGADHAR WATODE | Bahujan Mukti Party | 179 | 0.0552448675 | ||||
THITE MANOJ MUNJABHAU | Independent | 168 | 0.0518499315 | ||||
AD. VISHNU DAGADU DHOLE | Independent | 164 | 0.0506154093 | ||||
SANDIP GULABRAO CHAVAN | Peasants And Workers Party of India | 148 | 0.0456773206 | ||||
YAHIYA KHAN ZAFAR KHAN | Majlis Bachao Tahreek | 109 | 0.0336407294 | ||||
UMRAO GHANSHAM SALVE | Republican Party of India | 58 | 0.0179005716 | ||||
None of the Above | None of the Above | 952 | 0.2938162784 |
Friday, October 17, 2014
धर्म आणि जात संघाच्या रक्तात भिनलिये
प्रचाराच्या धुळीत सेनेने भाजपचा पार "कमळाबाई पासून दिल्लीहून आलेल्या फौजा" इथवर उल्लेख केला. आरोप झाले. फेका फेकी झाली. भाजप ने नरेंद्र मोदी या 'प्रचार प्रमुखाच्या' (पंतप्रधानाच्या नाही) जीवावर इथली सतत हातात घेण्याचा जो व्यावहारिक प्रयत्न केलाय त्याला वाखानावे लागेल. ज्या प्रकारे भाजपने महाराष्ट्रातील सरकार कसे अतिशय नाकर्ते होते आणि विकासाच्या नावाने इथे काहीच नाही ही भावना गोबेल्सच्या नीतीने, जाहिरातबाजीच्या साह्याने जनमाणसावर बिंबवली ते भाजपच्या व्यापारीकातेचे उदाहरण.
राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस ने केलेला कारभार अप टू द मार्क नसला तर महराष्ट्र कुठे नेवून ठेवलाय ? असे विचारण्यासारखा तरी नाही. हे समजून घ्यायला पाहिजे. ते का? तर लबाडीच्या जोरावर कुणी महाराष्ट्र काबीज करू इच्छित असेल तर ते चूक. भाजपला वेगळ्या प्रकारची जाहिरात करता आली असती. चांगला जाहीरनामा देता आला असता. पण विकासाच्या नावावर मते मागण्या ऐवजी, त्यांनी दादा काय म्हणाला आणि आबा काय म्हंटला, अमेरिकेत आजपर्यंत डंका वाजला होता का? वाजला होता का? असले प्रश्न विचारले.
माझ्या आजच्या लिखाणाचा उदेश्या तसा कुणाची सत्ता येणार आणि काय होईल हा नाही. भाजपच्या दुटप्पी आणि बेगडी भूमिकेचा चेहरा फक्त चित्रित करायाचाय. तशी या चित्राची सुरवात आणि अंत "राष्ट्रीय स्वयंसेवक संघ" नावाच्या रेषेनेच करावी लागेल. भाजपची जादू ओसरायला लागलीकी संघातून त्याला रसद पुरवली जाते. आता संघ ही काही अतेरिकी संघटना नाही. देशभरात अनेक ठिकाणी समाज उपयोगी कामे ही संघाच्या माध्यमातून केली जातात. शाळा आणि इतर माध्यमांद्वारे संघ विचारसरणी देशात अनेक वर्षां पासून टिकून आहे.
तर संघाच्या चांगल्या स्वरुपासोबतच संघाचा "हिंदू अजेंडा" ही भारतातील धार्मिक अशांततेला कारणीभूत आणि अप्रगातीला कारणीभूत असणारी एक दुर्दैवी गोष्ट. गेल्या अनेक वर्षात संघ प्रेरित हिंदुत्ववादी संघटना उभ्या राहिल्या. धार्मिक तेढ निर्माण झाली. राजकारणातील विकास आणि भ्रष्टाचार विरोध या गोष्टी बाजूला पडल्या गेल्या. कदाचित ही धार्मिक तेढ नसती तर भारताचे स्वातंत्र्य पासूनचे राजकारण वेगळे राहिले असते आणि हा देशही कदाचित वेगळ्या उंचीवर राहिला असता.
अगदी आजचे, आज म्हणजे आज रोजी १७ ऑक्टो २०१४ चे, संघाचे विचार :
"राम मंदिर हा देशाचाच अजेंडा आहे. त्यासाठी आजवर झालेल्या आंदोलनांना संघाने कायमच पाठिंबा दिला आहे. भाजपच्या जाहीरनाम्यातही राम मंदिर उभारणीचा उल्लेख आहे. मात्र, त्यासाठी सरकारकडे २०१९पर्यंत वेळ आहे. सरकारचे स्वत:चे काही प्राधान्यक्रम आहेत. सरकारला आधी सामान्य माणसाशी संबंधित समस्यांकडे लक्ष द्यावे लागेल. त्यामुळे आम्ही आताच सरकारकडे मंदिराबाबत काहीही मागणी करणार नाही" - (संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे, )राम मंदिर हा हिंदुत्ववाद्यांच्या 'हातचा' मुद्दा, कुठे बेरीज कमी पडली कि घेतलाच 'हातचा' ! विकासाच्या नावावर मते मागत असतांना हे असले "छुपे अजेंडे काखेत सुरीसारखे बाळगणे" ही जनतेची फसवणूक होय. तर बरं अयोध्येत राम मंदिर होणे चूक का ? तर नाही. पण विवादित जागेवरच ते व्हावे हा, प्रभूरामांपेक्षाही यांचा असलेला अस्मितेचा प्रश्न, तो चूक! काही युगापूर्वीची रामजन्मभूमी जर अस्मिता होत असेल, तर मग त्याच गणिताने काही अनेक शतकांपूर्वी पासून इथे राहत असलेला आणि इथच्या समाजाचा भाग झालेला आणि झालेले धर्म का म्हणून आपली अस्मिता विसरतील? त्याच गणिताने आजही जातिभेदाच्या जखमा सहन करणारे समाज अस्मिता म्हणून उभे राहिले तुमच्या विरोधात तर, का म्हणून त्याची ऍलर्जी ? या प्रश्नांची उत्तरे देतांना "आम्ही नाही त्यातले" असा आव संघ सदैव अनत आलाय, तोच त्याचा बेगडीपणा. मुखात राम बगलेत सुरा. किंवा मग अतिशय सोप्पा मार्ग म्हणजे स्वतः साठी एक नियम आणि इतरांसाठी दुसरा.
त्यांच्या भूतकाळापासून आजवरची संघाची विचारसरणी बघितल्यास साचेबद्ध आखणी दिसेल आणि धर्म आणि जात संघाच्या किती रक्तात भिनलिये ते समजेल. हा सगळा अट्टाहास या साठीच की शाहू फुले आंबेडकर आणि गांधी यांचा द्वेष करणारे त्यांच्या नावे मते मागून त्यांना हवे ते 'अजेंडे' समोर आणणार असेल तर त्याचा विरोध प्रत्येक नागरिकाने करावा. लोकशाहीत मते मागायला बंधन नाही. तुमच्या विचारसरणीची लोके इथे असतील तर बिलकुल तुम्ही निवडून याल. पण मते मागतांना तोंडावर एक आणि सत्ता गाजवतांना काखेत एक असे करणे म्हणजे शुद्ध फसवणूक!
संघाच्या वेबसाईट वरील हा मजकूर -
यह भारतीय राष्ट्रजीवन, अर्थात हिंदूराष्ट्र है | ‘हिंदू’ शब्द जातिवाचक नहीं है | अनादि काल से यहाँ का यह समाज अनेक संप्रदायों को उत्पन्न कर, परंतु एक मूल से जीवन ग्रहण करता आया है | उसके व्दारा यहाँ जो समाज स्वरूप निर्माण हुआ है, वह हिंदू है |-परम पूज्य श्री गुरूजी
संघ सुरु होत असतांना -
पुढे -
हिंदी और मराठी प्रार्थना के स्थान पर संस्कृत प्रार्थना स्वीकृत।
संस्कृत में संपूर्ण आज्ञाएँ देना प्रारम्भ।
श्यामा प्रसाद मुखर्जी ने डॉक्टरजी से मिलकर बंगाल के हिंदुओं की दुर्दशा पर चिंता व्यक्त की।
आणि १९९० ते २००० ला ते हे म्हणतात -
The decade of Ram-Janmabhoomi movement. A great Hindu upsurge of unity.
तर हा काही नवीन शोध नाही की संघ हा हिंदुत्व वाढी आहे. तो आहेच हिंदुत्ववादी आणि ज्याला सत्ता स्थापनायासाठी संघाने मदत केलीये तो पक्षही हिंदुत्वादी आहे, इतकेच काय ते पुन्हा सांगायचे. तुम्ही म्हणाल आहे हिंदुत्ववादी, त्याने काय फरक पडतो? तर, भूतकाळात पुन्हा एकदा डोकावून बघा. यांना अपेक्षित असणारा हिंदुत्ववाद हा संघाला पुळका असलेले लोक म्हणतील त्या दिशेला इतरांनी पूर्व म्हणावे असा आहे. मानसिक गुलामगिरी सहन करून जगल्याने देशाचे इतके वाटोळे झालेय कि पुन्हा ते दिवस नकोत. इतकेच.
अजूनच संघाच्या इतर साचेबद्ध गोष्टींकडे आजच लोकसत्तेतून कोरडेंनी प्रकाश टाकलाय. http://www.loksatta.com/vishesh-news/rss-and-other-fundamental-hindu-organisation-ever-ridicule-mahatma-gandhi-1032194/?nopagi=1.
असो. इथे तरी आम्हाला पुन्हा धर्माच्या नावाने दंगली नकोयेत!
Monday, October 13, 2014
तुम्ही सरकार निवडण्यासाठी मतदान करत नाही आहात.....
१५ ऑक्टो २०१४ ला होणारी विधानसभेची निवडणूक महाराष्ट्रासाठी एक अतिशय महत्वाची अशी संधी आहे. सर्व पक्ष यावेळी आपली ताकत अजमावत आहेत. माजलेले सत्ताधारी आणि आम्हीही आल्यावर सत्तेचा आणि धर्माचा मज दाखवू हे जाणू न देता 'आम्ही आता बदलोय' असा बोम्बलत सांगणारे विरोधी.
या सगळ्या गोंधळात मतदार भांबावलेला आहे. विधानसभेला शक्यतो अतिशय लोकल अशा विषयांवर निवडणूक होत असते. पण शेवटी सरकार कुणाची येईल किंवा बहुमत कुणाला मिळेल हे शक्यतो एकंदर मागील कारकीर्दीवर आणि घोषनापत्रावर ठरते.
यावेळी सगळेच पक्ष आप-आपल्या चुली मांडून बसल्याने मागील वेळी करपलेली भाकर ही युती किंवा आघाडील इतर घटक पक्षामुळे, असे आरोप होत आहेत. एकंदर पाहता थंड असलेले विरोधक अचानक निवडणुकीलाच जागे झालेत. आघाडीचा कारभार हवा तसा झालेला नाहीच, पण त्याच मानाने विरोधक ही याला जबादार. शासन चालवणे म्हणजे फक्त सत्तेतील पक्षाची जबाबदारी असते असे धरून चालणारे राजकारण इथे निपाजाल्याने सत्ते साठीच हे लोक राजकारण करतात यात शंका नाही.
आज प्रचार थांबतोय. शेवटी प्रचारांती असे दिसते कि जाहिरातबाजी ही लोकमन वळवण्यासाठी अतिशय खमके साधन आहे आणि त्याच्या अतिशय चांगला उपयोग या वेळी केला गेला. तोही इतकाकी 'निरमाची पावडर विकणाऱ्या हेमा, रेशमा … गायबच झाल्या!' एकंदर प्रचारात कॉंग्रेसची जाहिरात ही कॉंग्रेस सारखी शांत काही अंशी सुस्त, तर राष्ट्रवादीची त्या सारखीच 'प्रचंड आशावादी'. पण या वेळी आशावादी राहून फायदा होईल कि नाही माहित नाही! भाजप वर्षभर शाळेत न येता अचानक परीक्षेला सगळा 'थेअरी' अभ्यास करून येणाऱ्या विध्यार्थ्या सारखा जाहिरात तंत्रातील सगळे हथखंडे वापरून जाहिरातींच्या बाबतीत आपले 'व्यापारी' तंत्र चांगले आजमावून गेला. त्यांच्या जाहिराती ह्या निश्चितच त्या क्षेत्रातील जबरदस्त लोकांनी चांगल्या मोबदल्याच्या अपेक्षेने बनवल्यात यात शंका नाही. पण जाहिराती खर्या मराठी वाटल्या त्या शिवसेनेच्या. लोकगीतांचा अतिशय चांगला वापर आणि आपण अस्सल मराठी आहोत याचे दर्शन यातून झाले. पण शिवसेनेतील सगळा राडेबाजपणा किंवा येन केन प्रकारे जनतेच्या प्रश्नाबाद्दलची तळमळ दिसली नाही. मनसेने शेवटच्या काही दिवसात सरकारी जाहिराती सारखी जाहिरात करून आपणही टीव्हीवर जाहिरात देऊ शकतो हे दाखवले. असो. जाहिरातीवर इतका लिहिण्याच कारण म्हणजे, जाहिरात बाजी या वेळची सत्ता ठरवणार आहे!
कोट्यावधी रुपये खर्चून त्यांनी जाहिराती केल्या असल्या तरी, स्वतःचे डोके स्वतःच्या शरीवारच असल्याने मतदारराजा भुलणार नाही अशी भाबडी अशा. तर आज एक प्रयत्न करा. सगळ्या जाहिराती विसरा. महाराष्ट्र इथेच आहे आणि फक्त आशावादी असूनच काहीच होत नाही, मराठी अस्मिता महत्वाची पण पोट भारत नाही आणि फक्त स्वच्छ प्रशासनाने प्रश्न सुटत नाहीत, त्या स्वच्छतेचा सामान्य माणसाच्या आयुषावर जाहिराती बाहेर हि परिणाम झाला पाहिजे; हे लक्षात ठेवा.
मतदान करण्यापूर्वी एकदा आपल्या मतदारसंघातील सगळे उमेदवार कोण आहेत हे समजून घ्या. सार्वजनिक, व्यक्तिगत नव्हे, प्रश्नाला कुणी आपला वेळ दिलाय आणि लोकांच्या नव्या प्रश्नाची आणि नव्या जगाची कुणाला जाणीव आहे असे नेतृत्व शोधा. तो निवडून येईल की नाही याचा विचार करू नका. निर्वाचन आयोग त्यासाठीच नेमालेय. परत एकदा लक्षात ठेवा तुम्ही सरकार निवडण्यासाठी मतदान करत नाही आहात. ते करत आहात तुम्ही तुमचा प्रतिनिधी निवडण्यासाठी. नसता वरती वेगळे सरकार असल्याने आम्ही काम करू शकत नाही असे म्हणारे सरकार आले तरी काहीच करू शकत नाहीत, ते मुळातच षंढ असतात. कार्यकुशल आमदार कार्य कुशलच असतात. ते इतरांच्या नावे बोंबा मारत नसतात. पैसे घेउन मतदान करणार असाल तर, पैसे देवूनच कामे करून घ्यायची तयारी ठेवा.
यावेळी दोन गोष्टींशी आपला लढा आहे :
१) सत्तेचा माज
२) धर्मांध आणि जातीय शासन
बाकी. शिवरायांच्या महाराष्ट्रात कोणत्याही गलथान व्यवस्थेला पलटवून लावायची ताकत आहेच!
मतदान ही इतकी महत्वाची बाब आहे कि जिने तुमचे भविष्य उज्वल होऊ शकते आणि न केल्याने अंधकारमय!
जय जिजाऊ! जय शिवराय!