युपीए च्या कार्यकाळात झालेले भ्रष्टाचार, वाढलेली महागाई आणि एकंदरच त्याच त्याच नेतृत्वाला कंटाळलेली जनता. तसेच भारतीय राजकारणात फक्त आणि फक्त कौटुंबिक पार्श्वभूमी असेल तरच काही स्थान आहे हा कळून चुकलेला मुद्दा यांनी सामान्य माणसाला सद्य परिस्थितीबद्दल अतिशय निराश केलेले आहे.
१० वर्षां पूर्वीची स्थिती आणि आताची स्थिती यात नक्कीच फरक आहे, सामन्यांच्या जीवनमानात बराच फरक आलेला आहे, पण या पेक्षा ही चांगली स्थिती राहू शकली असती हे मात्र सत्य. या चांगल्या स्तिथीनिर्माणाच्या प्रक्रियेत अपयशाला कॉंग्रेस नक्कीच जबाबदार आहे. तसेच तितकीच जबाबदार भाजपही आहे.
आत्मविश्वास हरवलेली भाजप आणि आपल्याला सत्तेतून हलवण्यास आता कुणी उरलेले नाही या मस्तीत जगणारी युपीए २ किंवा मुख्यतः कॉंग्रेस यांनी सामान्य माणसांचा अगदी भ्रमनिरास केला होता. झालेले चांगले बदल बहुतअंशी १९९१ ची देन होते. शासन व्यवस्थेने बऱ्यापैकी मेंटेनन्सचेच काम केले असे म्हणवे लागेल. तरी त्यालाही थोडे फार महत्व असून त्याचे क्रेडीट युपीएला द्यावेच लागेल; फक्त कॉंग्रेसला नव्हे.
पण गांधी घराण्याच्या वळचणीला बसलेली कॉंग्रेस म्हणजे खर पहिले तर आपल्या देशाचे एक प्रूपच आहे. आपल्याला आजकाल सदैव फक्त हाकनाराची गरज भासते. कधी ते काम बाबा, बुवा, गुरु करतात तर कधी राजकीय नेतृत्व. कधी कधी तर संशय येतो की मुघल, इंग्रज हे परकीय इथल्या मातीवर इतकी वर्षे राज्य करू शकले याच कारण आपली राज्य करण्याची अक्षमता तर नाही ना! शिवाजी, राणाप्रताप आणि अशी काही तुरळक उदाहरणे सोडली तर ऑन यान अव्ह्रेज आपण परकियांच्या सत्तेखालीच जास्त नान्दलो आहोत. कुठे-कुठे स्वाभिमानाचे बीज आलेच तर, गवत होताच ते ही कुणाच्या दावणीत चारा म्हणून टाकले जातेय; इतकी दयनीय अवस्था.
प्रश्न फक्त विकासाचा नाही, जीडीपीच्या नाम्बरांचाही नाही. तो आहे तो प्रत्येकाला स्वाभिमानाने जगण्याच्या अधिकाराचा, राष्ट्राची एक नैतिक ओळख असण्याचा आणि मानवी मूल्यांच्या संरक्षणाचा. जातीपातीच्या, धर्माच्या, दिखावू विकासाच्या आणि सामान्यातल्या सामान्या प्रती असलेल्या बेगडी सदभावनेच्या राजकारणाला - कॉंग्रेसच्या - आळा घालायची कदाचित हीच निवडणूक आहे. एकीकडे जातीयवाद, भाजप आणि सपाचाही आणि दुसरीकडे घराणेशाही, कॉंग्रेस, मित्र पक्ष आणि इतरांची, या सगळ्यांना घरी बसवण्याची कदाचित हीच वेळ आहे.
भाजप व्यक्ती आधारित पार्टी नाही असे म्हणारे आज 'एकाच' व्यक्तीच्या जीवावर लढत आहेत. साधे सुधे आमदार आणि खासदारही आपण निष्क्रिय असलो तरी "मोदी कडे बघून लोक मला मतदान करतील" अशी वाक्य सहज म्हणून जात आहेत. कॉंग्रेसच्या सरंजामी व्यवस्थेला भाजपा हा एक 'बरा' पर्याय आहे, पण मोदी सारखा माणूस अख्खी भाजप स्वतःच्या वळचणीला बांधून बसल्याचे दुःख होते. काहीही म्हंटले तरी गुजरातेतील दंगली या वास्तव आहेत. त्यांना मोदीने खत-पाणी दिले हा एक संशय आहे, तो न्याय व्यवस्थेसमोर खरा आहे की खोटा, हे वेळ सांगेलच; पण नैतिकतेच्या दरबारात मोदी हा विषय निघाल्यास मोदी डोळ्यात डोळे घालून बघू शकणार नाहीत हे निश्चित. हा एक मुद्दा. पण समजा त्यांनी या दंगलींना खत-पाणी दिलेले नसले तरी, त्या रोकण्यात मात्र ते अयशस्वी झालेले आहेत हे मान्यच करावे लागेल.
खालील प्रधानमंत्रीचा एपिसोड, "एबीपी काँग्रेसी आहे!" हा आरोप न करता, डोळ्यांनी बघितल्यास आणि कानांनी ऐकल्यास मोदी या समीकरणाच्या हातात देश, तुम्ही मुस्लिम द्वेषी नसाल तर, देण्याबद्दल भीतीच वाटेल!
मोदी बाजूला काढल्यास या सगळ्या परिस्थितीत भाजप हा एक 'त्यातली त्यात' बरा पर्याय वाटतो. पण मोदी बाहेर काढल्यास सध्याची भाजप कुठेच दिसतच नाही!
पर्यायांबद्दल बोलतांना 'पर्याय म्हणूनच' उदयाला आलेली 'आप' पार्टी दुर्लक्षित करून चालणार नाही. ती नक्कीच पुढील लोकसभेत असेल, पण सत्तास्थानी असण्याची शक्यता फारच कमी. आप ज्या प्रकारे दिल्लीत राज्य करतेय त्याकडे पाहिल्यास 'अजून अनुभवाची गरज' असलेला पक्ष असेच त्यांच्याबद्दल म्हणावे लागेल. "कश्मिरात लोकांना विचारा" आणि "आयेतो पुरा संविधानही बदलेंगे" अशा कॉमेंट करणारे या पक्षाचे नेतृत्व अजून 'अव्यवस्थेचे समर्थक' या भूमिकेतून बाहेर पडलेले नाहीत. पण त्यांच्या सोबत आलेले इतर चांगले लोक ही त्यांची भक्कम जमेची बाजू. या नवीन आलेल्या लोकात अतिशय विविधता आहे आणि भारतासारखे राष्ट्र चालवायला ती अतिशय आवशकही आहे. त्यांना समोर करणे आपला आणि देशाला हिताचे राहील. पण त्याची सध्या तरी शक्यता कमीच दिसतेय. पण असो. त्यांचा जास्त भूतकाळ नसल्याने प्रेडीक्ट करणे अयोग्य ठरेल.
शेवटी लोक ठरवतील आणि त्यांनी या वेळी तरी 'प्रत्येक वेळी पेक्षा जास्त विचार' करून ठरवावे!
जय हिंद!

No comments:
Post a Comment