पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीचा सेमी फायनल म्हणून झालेल्या ४ राज्यांच्या निवडणुकांचा निकाल अखेर लागला. चार हि राज्यात कॉंग्रेस नावाच्या मस्तवाल हत्तीला देशाच्या सामान्य मतदारांनी अक्षरशः चारी मुंड्या चित केले. कुणी म्हणतय हा कॉंग्रेस चा अस्त तर कुणी म्हणतंय मोदी युगाचा प्रारंभ !! माझ्या हा केवळ आणि केवळ लोकांचा आणि लोकशाहीचा विजय आहे.
यंदा मतदानामध्ये झालेली प्रचंड वाढ, युवकांचा, आदिवासींचा, मागासलेल्या राज्यांचा या संपूर्ण निवडणुकीमध्ये गांभीर्याने असलेला सहभाग यामुळे हि निवडणूक सामान्य माणसाच्या मुद्यांवर लढली गेली, जात, धर्म - भाषा यांना झुगारून निकोप लोकशाहीला अभिप्रेत असणारी निवडणूक अतिशय उत्साहाने पार पडली आणि म्हणूनच ज्यांचा २ वर्षापूर्वी राजकीय जन्म देखील झाला नव्हता अश्या आम आदमी पार्टी ला दिल्ली करांनी सत्तेच्या दाराजवळ नेउन सोडले.
खर तर निवडणूक हि तुमच्या आमच्या प्रश्नांची खोलवर चर्चा करून ती सोडवण्यासाठी राजकीय पक्षांनी आक्रमकपणे पुढे येण्याची प्रक्रिया, पण गेली काही वर्षे सामन्यांच्या प्रश्नांना बगल देऊन केवळ साम - दाम - दंड - भेद यांच्या बळावर पुरती चिखलफेक करण्याचा महोत्सव बनला होता. आम आदमी पक्षाने दाखवून दिलेली बदलाची चाहूल खरोखरच नव्या आशेचा किरण म्हणून बघता येईल.
संपूर्ण देशात सामान्य माणसापासून तुटलेल्या कॉंग्रेसच्या विरोधात एक सुप्त लाट आहे हे कुणी हि अमान्य करू शकणार नाही, पण या लाटेवर आयते स्वार होणाऱ्यांना हि सामान्य जनतेने एक सूचक संदेश दिला आहे कि येणारी निवडणूक हि सामन्यांच्या प्रश्नावर लढवली गेली नाही तर प्रस्थापितांना हि वेळप्रसंगी धूळ चारून कुण्या तिसऱ्याच्या हाती सत्तेचा सोपान चढवायला हि भारतीय जनता मागे पुढे पाहणार नहि.
मध्यप्रदेश आणि छत्तीसगढ मध्ये लोकांनी दाखवून दिले कि राष्ट्रीय स्तरावर कुठलेही वारे असू दे अथवा लाट या पेक्षा हि स्थानिक प्रश्नांना ज्यांनी प्रामाणिक पणे हात घातला अश्या शिवराज सिंग चौहान किंवा रमणसिंग यांचे हात अजून बळकट केले.
केवळ लाट, हवा किंवा निवडणुकींच्या वेळी केलेली खैरात यांच्यावर स्वार होऊन निवडणुकांच्या महोत्सवात एखाद्या पक्षाचा झेंडा बुलंद करण्याचे दिवस आता गेले, बाबासाहेबांनी दिलेलि लोकशाही आणि त्याची ताकद सामान्य जनतेला, मुख्यतः युवकांना उमगली आहे आणि ते याचा वापर देशाच्या, राष्ट्राच्या उन्नती साठी नक्कीच करून घेतील.
निवडून आलेल्या सर्व पक्षांचे , उमेदवारांचे अभिनंदन
शेवटी लोकशाहीचा विजय असो.
भारत मत कि जय !
- अमोल

No comments:
Post a Comment