Wednesday, April 10, 2013

११ एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती

आज ११ एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती.     
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्य हार्दिक शुभेच्छा 


खऱ्या खुऱ्या स्वतंत्र भारताचे स्वप्न ज्यांनी बघितले , भारतीय समाज रचनेचा कायापालट करणारा एक महान क्रांतिसूर्य, भारतीय स्त्रियांसाठी साक्षात स्वातंत्र्य मूर्ती ...
सामान्य माणसांसाठी .. दुर्लक्षित समाजासाठी लढणारे एक असामान्य व्यक्तिमत्व. केवळ आपल्या कर्माने ज्यांनी महात्मा हि पदवी मिळवली असे महात्मा ज्योतिबा फुले.

याच महात्म्याने रायगडावर शिवरायांच्या समाधीचा शोध लावला, त्या समाधीची रीतसर पूजा करून शिव जयंतीची सुरुवात केली. हिंदवी स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांना "कुळवाडी भूषण" म्हणून संबोधिले . त्यांनी "शेतकऱ्यांचा आसूड " या पुस्तकातून आमच्या बळीराजाचा आवाज उठवला. समाजातील अनिष्ठ रूढी परंपरा यांच्या विरुद्ध त्यांनी उभारलेला लढा हा खरोखरच जगासाठी एक प्रेरणा आहे. शिक्षणाची गंगा सामान्य अति-सामन्यांच्या पर्यंत पोचवणारा हा भगीरथ .. ज्याने केवळ आणि केवळ सत्याची कास धरून आपल्या या महाराष्ट्राचा वैचारिक, सामाजिक कायापालट केला.

सामाजिक समतेचा संदेश देणारे आणि शिक्षणाचा उपयोग करून सर्वांना खर खुरा स्वतंत्र मिळवून देणारा हा महात्मा.

ज्यांचा वैचारिक वारसा घेउन अगदी कणखर पणे आपली वाटचाल करणार्या महाराष्ट्राचा त्यांच्या त्या अफाट कर्तुत्वास कोटी कोटी प्रणाम! आणि महाराष्ट्रातील तरुण पिढीकडून त्यांचा वसा चालवला जावा ही अपेक्षा!

जय हिंद .. जय महाराष्ट्र ....!

No comments:

Post a Comment