भारतीय संविधानाचे निर्माते, बहुजन नायक भारतरत्न डॉ . बाबासाहेबांच्या स्मृतीदिनानिमित्य त्यांना विनम्र अभिवादन !
त्यांचे उपकार केवळ दलित समाजावर नसून सबंध जगाला अचंबित करणारी सामाजिक क्रांती या महामानवाने प्रत्यक्षात घडवून दाखवली आणि हजारो वर्षे जाती - पातीच्या चिखलात रुतलेले भारतीय समाजाचे चाक खऱ्या अर्थाने फिरायला लागले.
सबंध जगामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर आणि एवढ्या प्रतिकूल परीस्थ्तीमध्ये सामाजिक क्रांती होण्याची हि अद्वितीय अशीच घटना !
या महापुरुषाला केवळ एका जातीमध्ये अडकवून ठेवण्यचा कोतेपणा / संकुचितपणा गेली अनेक वर्षे अव्याहतपणे चालूच आहे, आज त्यांच्या स्मृतीदिनानिमित्य जाती धर्माच्याही पलीकडे जाऊन या महामानवाच्या विचारांना खरच मनापासून अबिवादन करूया!
जय भीम. जय महाराष्ट्र.
- अमोल सुरोशे (नांदापूरकर)
---
बाबासाहेबांना त्यांच्या स्मृतीदिनी विनम्र अभिवादन. आज असलेली सुबत्ता आणि समानता या भूमीवर तुमच्या शिवाय येणेच अशक्य होती. राष्ट्राला धर्माच्या पुढे नेवून आम्हाला मानवतेची शिकवण दिलीत आणि हात धरून त्या रस्त्यावर आणून सोडले. त्याची परतफेड फक्त आणि फक्त तुम्ही सुरु केलेला प्रवास संपवूनच केली जाऊ शकते.
जय भीम. जय महाराष्ट्र.
- प्रकाश बा. पिंपळे (उक्कलगावकर)
2 comments:
भारताचा 1991 ते 2012 मधला ‘आर्थिक’ प्रवास अभ्यासला की स्पष्टपणे जाणवते ती ‘आहेरे’ आणि ‘नाहीरे’मधील वाढलेली दरी आणि ‘सरकार’ नावाच्या व्यवस्थेचा वाढता नाकर्तेपणा! घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक द्रष्टे ‘अर्थनीतिज्ञ’ ही होते. घटना लिहितानाच त्यांनी संभाव्य आर्थिक अनाचाराबद्दल इशारा दिला होता. राजकीय व सामाजिक समता ही ‘आर्थिक समते’शिवाय प्रस्थापित होऊच शकत नाही, असे त्यांचे ठाम मत होते व त्यांच्या या अभ्यासू मताचा आम्ही आज अनुभव घेतो आहोत. इथे एक विशेष साम्य जाणवते ते छत्रपती शिवाजी व डॉ. आंबेडकरांच्या विचारांमध्ये! दोघांचाही आर्थिक विचार हा ‘कल्याणकारी राज्या’साठीचा होता. दोघांची एकूण बांधिलकी होती ‘रहेते’शी. दोघांच्याही आर्थिक तत्त्वांची आज प्रकर्षाने गरज भासते आहे.
अगदी बरोबर सुबोधराव. पण त्यांच्या त्या गुणांना आपण सगळ्यांनी कधी उचलून धरलेच नाही. आणि चिंदी चिंदी वाचाळ सुद्धा स्वतःला अर्थतज्ञ म्हणवून घेऊ लागले. आता ती जबाबदारी आपली.
Post a Comment