गेली कही वर्षे अणि येणारी कही वर्षे ही भारताच्या भविष्य काळासाठी अतिशय
महत्वाची आहेत. या काही वर्षात भाताच्या समाज मनाचे चित्रच बदलले. आर्थिक
बदलांनी सामाजिक बदलांना अशा काही वळणावर आणून सोडले की सामाजिक समीकरणांचे
उत्तर हवे ते येईनच झाले. मग ते येण्यासाठीचे प्रयत्न धार्मिक
मुलतत्ववाद्यांचे असोत किंवा मग सर्वधर्म समभाव निपजावा म्हणून काम
करणारांचे असोत. समाजाने प्रत्येक वेळी या दोन्ही घटकांना धोकेच दिले. मागे
एक 'जमिनीचा तुकडा राम मंदिराचा की मास्जीतीचा' या प्रकरणाचा सर्वोच
न्यालायाचा निकाल होता आणि म्हणून अनेक मुलतत्ववाद्यांनी आपल्या तलवारी
घासून ठेवल्या होत्या. पण जनता बेरकी निघाली, दोन्ही बाजूंच्या या लाळगाळत
बसलेल्या सगळ्यांचा तिने पोपट केला. निकाल लागला. जनता शांत. मग याची कारण
मीमांसा झाली आणि म्हण्यात आले की आर्थिक प्रशानंचे महत्व इतके झाली की या
प्रश्नांकडे लोक दुर्लक्ष करू लागले आणि म्हणून ही शांतता. आता हे गृहीतक
मान्य करून थोडे निश्चिंत होताच काल परवा आझाद मैदानात एक वेगळच समाजमन
समोर आल. आता असे कोणी काही करणार नाही अशी अपेक्षा असतांना अचानकच कुठे
तरी जगाच्या एका कोपऱ्यात एका समाजाच्या कुणावर तरी अत्याचार झाले म्हणून
इथे दंगे केले गेले. आणि पुन्हा गृहीतक चुकीचे निघाले. आणि याच्या बदल्यात
पुन्हा या 'एका' समाजा विरोधात मनात कदाचित ना इलाजाने साठवून ठेवलेला
द्वेष अनेकांनी नाईलाजाने शब्दातून बाहेर काढला. एकंदर भारतीय समाज
अनप्रेडीकटेबल झालाय.
एकीकडे मुस्लीम परकीय आहेत म्हणायचे आणि या म्हणनारांचे युरेशियनपण काढले की स्टंटबाजी म्हण्याचे. एकीकडे आम्ही पूर्ण भारतीय आहोत म्हण्याचे आणि अमर जवान ज्योतीला लाथाडायचे. इतरांचे युरेशियनपण काढून त्यांना भेदाभेद करतात म्हणून हिणवायचे आणि जातीत एक प्रेम विवाह जाती बाहेर झाल की रक्ताची सरमिसळ नको म्हणून पिचालेल्यांच्या नग्न करून धिंडी काढायच्या. एकीकडे संविधानकर्त्याचा वैचारिक वारसा सांगायचा आणि वेळ आली की इतर मुलतत्ववाद्यांना लाजवेल इतके आक्रमक होवून विचार गेले चुलीत म्हणून हिंसक व्हायचे आणि लागेलेच तर हे कसे चूक आहे हे म्हण्यात जास्त वेळ घालायचा आणि स्व परीक्षण करायची एक चांगली संधी सोडायची. असा सगळाच समाज अगदीच बेरकी झालाय. आपल्या समुदायाच्या आणि त्यातल्या आपल्या स्वार्थाच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून जगतांना वस्तुनिष्ट पद्धतीने काय करावे आणि कशे वागावे याचा विचार करणेच कदाचित इथल्या माणसांनी सोडून दिलेय. अशा परीस्थित महात्मा फुल्यांची उणीव भासते.

No comments:
Post a Comment