Friday, August 31, 2012

आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र (यशदा) पुणे पूर्व परीक्षा - मोफत मार्गदर्शन, राहण्य खाण्याची सोय

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षात यश मिळवावे या उदेशाने त्यांना महाराष्ट्र शासन या उपक्रमाद्वारे तयार करते. येथे स्पर्धा परीक्षांच्या तयारी साधी मोफत मार्गदर्शन, राहण्य खाण्याची सोय ही केली जाते. ग्रामीण महाराष्ट्रातील सर्वांनी यात उत्साहाने सहभाग घ्यावा ही जिजाऊ.कॉम आणि मुख्यमंत्री.कॉम ची इच्छा आहे. आपल्याला या बद्दल काही ही मार्ग दर्शन हवे असल्यास संपर्क करावा.
तसेच इतर माहिती साठी येथे भेट द्या: http://www.geexam.com/ 

Thursday, August 30, 2012

शिवाजी अंडर ग्राउंड इन भीम नगर मोहल्ला इस इन मुंबई

 शिवाजी अंडर ग्राउंड इन भीम नगर मोहल्ला हे एक अतिशय नावाजलेले आणि खूप चर्चेत असलेले नाटक रविवारी आणि सोमवारी मुंबई आणि ठाण्यात अनेक नाट्यगृहात लागत आहे। अनेक दिवसां पासून या नाटक बद्दल ऐकत होतो आणि म्हणून बघण्याची एक उत्सुकता हि आहे। परवा ठाण्याला जाऊन पाहण्याचा बेत ठरवलाय। अनेक मित्र ही  आहेत सोबत। तुम्ही हि हे नक्की कुठे ना कुठे नक्की पहा। खाली लोकसत्तेत आलेली जाहिरात आहे।
दिनांक  : १/०९/२०१२ शनिवार रात्री ८।३० गडकरी, ठाणे
              २/०९/२०१२ रविवार दुपार २ घाणेकर, ठाणे (वेस्ट)
              ३/०९/२०१२ सोमवार रात्री ८ शिवाजी मंदिर, दादर  

फोन बुकिंग सुद्धा चालू आहे। क्रमांक सोबतच्या जाहिरातीत आहेतच।
नाटकाच्या मागे संभाजी भगत, राजकुमार तांगडे आणि नंदू माधव (हरीशचंद्राची फ्याकट्री) तसेच इतर कलाकारांचे परिश्रम आहेत।
नाटक कशे वाटले ते सांगायला विसरू नका! 

एके ठिकाणी नाटकाबद्दल हे सापडले:
शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला या नाटका बधल एक गोष्ट तुम्हाला सांगावी आसे वाटते ती म्हणजे हे  नाटक खरा शिवाजी हा कुठल्या एका जातीचा,धर्माचा, समाजाचा किवा प्रांताचा नसून ते कष्टकर्यांचा पिढीतांचा आणि शोषितांचा व या सोबतच माणूस म्हणून माणसा प्रमाणे जगणार्यांचा होता . आजहि जे जे हि माणुसकी टिकवण्य साठी जातीधर्माच्या पलीकडे जाऊन माणुसकी साठी लढत आहेत त्यांचात तो  जिवंत आहेत, राजे कुठलेहि दैवी अवतार नसून एक माणूस होते हि खूप महत्वाची बाब डोळ्या समोर आण्याचे काम हे नाटक करते. आजच्या समाज वेवस्ते समोर जातीयतेची जी भिंत उभी आहे ते पडण्याची हि एक अप्रतिम चळवळ कम नाटक आहे असे मला वाटते.आपल्यातल्या प्रतेकाने हे नाटक जरूर पाहावे .   - महेश लाडे (https://groups.google.com/forum/?fromgroups=#!topic/nirman_4/4VD6RxTbMJk)




अगर पानीसे बिजली निकालोगे तो पानी में क्या बचेगा?


ये नहीं हो सकता. अगर पानीसे बिजली निकालोगे तो पानी में क्या बचेगा? ये हमारे क्षेत्र के किसानोपे अन्याय है.

याचाच प्रत्यय आला : http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=247227%3A2012-08-30-06-55-45&catid=73%3Amahatwachya-baatmyaa&Itemid=104

Sunday, August 26, 2012

अशा परीस्थित महात्मा फुल्यांची उणीव भासते

गेली कही वर्षे अणि येणारी कही वर्षे ही भारताच्या भविष्य काळासाठी अतिशय महत्वाची आहेत. या काही वर्षात भाताच्या समाज मनाचे चित्रच बदलले. आर्थिक बदलांनी सामाजिक बदलांना अशा काही वळणावर आणून सोडले की सामाजिक समीकरणांचे उत्तर हवे ते येईनच झाले. मग ते येण्यासाठीचे प्रयत्न धार्मिक मुलतत्ववाद्यांचे असोत किंवा मग सर्वधर्म समभाव निपजावा म्हणून काम करणारांचे असोत. समाजाने प्रत्येक वेळी या दोन्ही घटकांना धोकेच दिले. मागे एक 'जमिनीचा तुकडा राम मंदिराचा की मास्जीतीचा' या प्रकरणाचा सर्वोच न्यालायाचा निकाल होता आणि म्हणून अनेक मुलतत्ववाद्यांनी आपल्या तलवारी घासून ठेवल्या होत्या. पण जनता बेरकी निघाली, दोन्ही बाजूंच्या या लाळगाळत बसलेल्या सगळ्यांचा तिने पोपट केला. निकाल लागला. जनता शांत. मग याची कारण मीमांसा झाली आणि म्हण्यात आले की आर्थिक प्रशानंचे महत्व इतके झाली की या प्रश्नांकडे लोक दुर्लक्ष करू लागले आणि म्हणून ही शांतता. आता हे गृहीतक मान्य करून थोडे निश्चिंत होताच काल परवा आझाद मैदानात एक वेगळच समाजमन समोर आल. आता असे कोणी काही करणार नाही अशी अपेक्षा असतांना अचानकच कुठे तरी जगाच्या एका कोपऱ्यात एका समाजाच्या कुणावर तरी अत्याचार झाले म्हणून इथे दंगे केले गेले. आणि पुन्हा गृहीतक चुकीचे निघाले. आणि याच्या बदल्यात पुन्हा या 'एका' समाजा विरोधात मनात कदाचित ना इलाजाने साठवून ठेवलेला द्वेष अनेकांनी नाईलाजाने शब्दातून बाहेर काढला. एकंदर भारतीय समाज अनप्रेडीकटेबल झालाय.
एकीकडे मुस्लीम परकीय आहेत म्हणायचे आणि या म्हणनारांचे युरेशियनपण काढले की स्टंटबाजी म्हण्याचे. एकीकडे आम्ही पूर्ण भारतीय आहोत म्हण्याचे आणि अमर जवान ज्योतीला लाथाडायचे. इतरांचे युरेशियनपण काढून त्यांना भेदाभेद करतात म्हणून हिणवायचे आणि जातीत एक प्रेम विवाह जाती बाहेर झाल की रक्ताची सरमिसळ नको म्हणून पिचालेल्यांच्या नग्न करून धिंडी काढायच्या. एकीकडे संविधानकर्त्याचा वैचारिक वारसा सांगायचा आणि वेळ आली की इतर मुलतत्ववाद्यांना लाजवेल इतके आक्रमक होवून विचार गेले चुलीत म्हणून हिंसक व्हायचे आणि लागेलेच तर हे कसे चूक आहे हे म्हण्यात जास्त वेळ घालायचा आणि स्व परीक्षण करायची एक चांगली संधी सोडायची. असा सगळाच समाज अगदीच बेरकी झालाय. आपल्या समुदायाच्या आणि त्यातल्या आपल्या स्वार्थाच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून जगतांना वस्तुनिष्ट पद्धतीने काय करावे आणि कशे वागावे याचा विचार करणेच कदाचित इथल्या माणसांनी सोडून दिलेय. अशा परीस्थित महात्मा फुल्यांची उणीव भासते.

Saturday, August 25, 2012

काही नक्की ऐकावी अशी राजकारण्यांची भाषणे

खालील काही भाषणे ही विविध राजकारण्यांच्या व्यक्तिमत्वाचे छान  दर्शन घडवतात. राजकारणात अनेक प्रवाह आहेत आणि ते असतातच. पण त्यातल्या विचारांचा आदर आपण करायला हवा, त्यांना समजून घ्यायला हव. 
पण खालील भाषणे ही वक्तृत्व कलेचे नमुने म्हणूनच ऐका.



Tuesday, August 21, 2012

स्त्रियां साठी खास नौकरीच्या संधी MSW/BED/MED/DED/Graduate किंवा दहावी अथवा बारावी पास व नापास ही

या जाहिरातीत शासनाच्या शेकडो नौकर्या आहेत स्त्रियां साठी. कृपया सर्वन पर्यंत पोहोचवावे.

Friday, August 17, 2012

सेकुलर (धर्म निरपेक्ष) राष्ट्र म्हणजे काय ?

एकदा मी आणि अमोलराव असच सेकुलर (धर्म निरपेक्ष) राष्ट्र म्हणजे काय यावर बोलत होतो. तर तेंव्हा त्यांनी काही मोजक्या शब्दात याचा उत्तर दिला होत, ते असे : धर्म निरपेक्ष राष्ट्र म्हणजे धर्म विरहित राष्ट्र नाही, तर स्पष्टच बोलायचं झाल तर, अशा राष्ट्रात मंदिर, मस्जीत, चर्च वगैरे सगळ काही असते पण राष्ट्राचे नियम, धोरणे आणि भवितव्य मंदिरातून, मास्जीतीतून किंवा चर्च मधून ठरवली जात नाहीत. पण सध्याची परिस्थिती पहिली तर संसदीय लोकशाही ही या धर्म सत्तान पुढे झुकतीये. ही एक अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे. वेळीच हे थांबवले नाही तर आपल्या स्वातंत्र्यावर विघ्न आल्याशिवाय राहणार नाही. हे मी नव्हे तर बाबासाहेब अनेक वर्षान पूर्वी सांगून गेलेत. इथली जनता बघताना शासनाने त्यांना फक्त माणूस आणि नागरिक म्हणून बघावे, हा मुस्लीम मतदार, हा हिंदू मतदार असा भेद केला तर अनिष्ट जास्त दूर नाही. आणि तेच शहाणपण मतदारांनीही नेतृत्वाकडे बघतांना ठेवावे. 
शेवटी सध्या असलेल्या परिस्थितीत हिंदू आणि मुस्लीम या दोन्ही गटांनी सय्यम बाळगावा. नसता राजकारणी एक मेकांना एकमेकांची भीती घालून अविरत सत्ता गाजवायची वाटच पाहत असतात!      

Thursday, August 16, 2012

"राजमाता जिजाऊ"!! १९ ऑगस्ट २०१२, स्टार प्रवाह वर सायं ७ वाजता नक्की बघा !

राजमाता जिजाऊ : आऊ साहेब डोळ्यासमोर उभा करणारा चित्रपट.

रिव्ह्यू :
एक खूप आनंदाचा क्षण अनुभायाला भेटला काल, तो म्हणजे 'राजमाता जिजाऊ' या चित्रपटाचा प्रीमियर. आऊसाहेबांच्या जीवनावर आधारित असा हा चित्रपट आज दिनांक २० मे २०११ रोजी प्रदर्शित होतोय. योगा योग असा की अगदी याच दिवशी २००८ रोजी जिजाऊ.कॉम चे पहिले पाऊल पडले.

"राजमाता जिजाऊ" हा जिजाऊ साहेबांच्या आयुष्यावर आधारित असा पहिला वहिला चित्रपट आहे. आज या मराठी मातीत आणि मराठी माणसाच्या मनात असणाऱ्या स्वाभिमान आणि स्वातंत्र्याचे बीज कधी याच मातेने शिवबा मध्ये रुजवले. या पेरणीचा आणि पुढे स्वराज्याच्या वाढीचा आलेख म्हणजे "राजमाता जिजाऊ" हा चित्रपट.

सुंदर आणि कणखर असा मावळ प्रांत; आणि त्यात तसेच व्यक्तीमत्व असणारी एक आई आपल्या बाळाला स्वातंत्र्याचे धडे देते, त्याच्यात स्वाभिमान, समानता आणि शौर्य अशी मुल्ये रुजवते असे एकंदर कथानक. पण चित्रपट पाहिल्यावर आपण फक्त इतकच नव्हे, तर अजून खूप काही पाहिलंय ही भावना बाहेर घेऊन पडतो. लहाना पासून ते मोठ्यां पर्यंत प्रत्येकाला माझ्यासाठी 'हे' सांगितले जातेय असे वाटते.

चित्रपटातील गाणी तर इतकी अप्रतिम की प्रत्येक गाण्यागाणीस अंगावर रोमांच उभा राहतो. कैलास खेर, सुरेश वाडकर, शंकर महादेवन, नंदेश उपम यांनी अप्रतिम अशी गीते गायली आहेत, काही ओळी काळजाला भिडतात तर काही थेट डोक्याला, तर काही थेट आपल्याला घोड्यावर बसवून शिवकाळात घेऊन जातात.

प्राचार्य स्मिता देशमुख (आता आमच्यासाठी आऊसाहेबाच) ह्या जिजाऊ साहेबांच्या भूमिकेत आहेत, तर अमोल कोल्हे हे छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत आहेत. अप्रतिम अशा अभिनयाचा दाखला दोघांनी ही दिलाय. पण ज्या प्रमाणे शिवरायांच्या राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात प्रत्येक मावळ्याचा जसा तितकाच सहभाग होता, तसाच तितकाच कसोशीचा अभिनय इतर कलाकारांनी ही केलाय. अगदी काहीच ठिकाणी बाल कलाकार अजून अप्रतिम असा अभिनय करू शकले असते असे वाटते. पण शिवराय साकारणे तसे मुश्कीलच, नाही का? पण संवाद इतके जबरदस्त आहेत की कुठे कुठे अभिनयातील हे चढ उतार ही दिसतच नाहीत.

चित्रपटात एकापेक्षा एक असे संवाद, फार कमी वेळात जिजाऊ आणि शिव चरित्राबद्दल खूप काही सांगून जातात. बर ते सांगणे फक्त जिजाऊ आणि शिव चारीत्राबाद्दलचेच राहत नाही तर त्या काळचा इतिहास ही सांगून जातात.
चित्रपटातील आम्हाला खूप खूप आवडलेले काही दृश्य म्हणजे, पुण्यातील जमिनीवर चालवलेला सोनेरी नांगर, छत्रपती आणि जिजाऊ याच्यातील अनेक संवाद, शिवबा आणि मावळ्यांचा एकमेकांच्या डोळ्यात पाहून झालेला संवाद, शाहिस्तेखानाचा वध, राज्याभिषेकाच्या वेळी शिवरायांना दाटून आलेली शिवा काशीद, बाजीप्रभू देशपांडे यांसारख्या स्वराज्याच्या कामी आलेल्या स्वराज्याच्या आधार स्थंभांची आठवण आणि अजून काही.

चित्रपटात फक्त जिजाऊ चरित्रच नव्हे तर शिव चरित्र ही पाहिल्यावेळेस इतके त्यांच्या प्रत्येक पैलूसहित चित्र रुपात आपल्या समोर उभे राहते. "हे माझं राज्य नाही, हे रयतेचे किंवा श्रींचे राज्य आहे" म्हणजे काय हे राज्याभिषेकाचे दृश्य पाहिल्यावर कळते.

पूर्ण चित्रपटभर आऊ जिजाऊ आपल्याला खंबीर बनवत जाते, पण शेवटच्या दृश्यात जिजाऊ प्रेमींच्या डोळ्यात अश्रू उभे करून जाते.

चित्रपटाला जिजाऊ.कॉम आणि मुख्यमंत्री कार्यकर्ता च्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

सहकुटुंब (लहानगे आणि स्त्रियांनी तर आवर्जून - आधुनिक जिजाऊ-शिवबा) पहावा असा हा एक मनोरंजन, विचार आणि संस्कार देणारा चित्रपट आहे.

एक छान असे संकेत स्थळ ही चित्रपटासाठी rajmatajijau.com या नावे आहे.

प्रशासना बद्दल महत्वाचे


खालील लेख हा शाणपट्टी या ब्लॉग  वरून घेतलेला (चोरलेला/उचललेला) आहे. थोडक्यात सौजन्य : शाणपट्टी, आळशांचा राजा


डिस्क्लेमर: लोकप्रशासनावरील हा ऑथेंटिक वगैरे लेख नाही. प्रशासनाशी सहसा संबंध न येणाऱ्या मित्रांना ढोबळ कल्पना यावी एवढाच हेतू आहे. कुणी भर टाकल्यास स्वागत आणि आनंद आहे. काही चूक आढळल्यास अवश्य सांगावे.
प्रेरणा (!)-
पण मला प्रांत म्हणजे कलेक्टर/डेप्युटी कलेक्टर की अजुन कुठली पोस्ट ते अजुन कळल नाही.
*******
जिल्हा प्रशासनामध्ये दोन प्रमुख उतरंडी असतात. राज्या राज्यांनुसार थोडे फरक असतात. प्रस्तुत संदर्भामध्ये –
विकास (डेव्हलपमेंट) उतरंड / हाएरार्की–
कलेक्टर – पीडी(डीआरडीए)/ अध्यक्ष जि.प. – बीडीओ/ सभापती पंचायत समिती – पीइओ/ सरपंच
पीडी(डीआरडीए) – प्रोजेक्ट डायरेक्टर (डिस्ट्रिक्ट रुरल डेव्हलपमेंट एजन्सी) (महाराष्ट्रात सीइओ असतात, पीडी पेक्षा रॅंक आणि जबाबदारीने वरचे पद); बीडीओ – ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर; पीइओ - पंचायत एक्स्टेन्शन ऑफिसर (महाराष्ट्रात ग्रामसेवक असतात.).
महसूल (रेव्हेन्यू) उतरंड –
कलेक्टर (जिल्हाधिकारी/ जिल्लापाळ) – सबकलेक्टर (उपजिल्हाधिकारी/ उपजिल्लापाळ - प्रांत) – तहसीलदार – रेव्हेन्यू इन्स्पेक्टर.
(रेव्हेन्यू इन्स्पेक्टर हा साधारणपणे पन्नास साठ गावे पाहतो. जमीनीचे सर्व कागद याच्या ताब्यात असतात. सरकारची शेवटची कडी. पृथ्वीवरचा सर्वात महत्त्वाचा माणूस! आपल्याकडे जसा तलाठी!)
याशिवाय कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी या महसूल यंत्रणेतील अधिकाऱ्यांकडे असते. ते एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट असतात. म्हणजे कलेक्टर असतो डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट (डीएम), सबकलेक्टर – सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट (एसडीएम), तहसीलदार – एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट. ही मंडळी क्रिमिनल प्रोसीजर कोड, तसेच पोलीस ऍक्ट अंतर्गत काही अधिकार बाळगून असतात. कायदा सुव्यवस्थेसाठी हे जबाबदार असतात, आणि पोलीसांच्या साहाय्याने त्यांनी हे काम करायचे असते. गुन्हे तपासामध्ये यांचा काही संबंध नसतो. ते पोलीसांचे काम. म्हणजे पोलीसांना दुहेरी काम असते – कायदा-सुव्यवस्था, आणि गुन्हे अन्वेषण. [हे ग्रामीण भागात. शहरी भागात पोलीस कमिशनरेट असेल, तर असे अधिकार पोलीसांकडेच असतात. म्हणून त्यांना कमिशनर असे पद असते. म्हणजे आयुक्त – आयोगाचे अधिकारी, अर्धन्यायिक काम. पोलीस त्यामुळे कायदा सुव्यवस्था संपूर्णपणे सांभाळतात. तसेच वेगवेगळ्या किरकोळ परवानग्या/ लायसेन्स – मोर्चा/ लाउडस्पीकर/ इ. तेच देतात.]
तसेच, डिझॅस्टर मॅनेजमेंट ही संपूर्णपणे रेव्हेन्यू अधिकाऱ्यांची जबाबदारी असते. इमर्जन्सी ड्यूटी यांच्याकडे असते. उदा. पूर, दुष्काळ, उष्माघात, अपघात, इ.
निवडणुकांचे काम रेव्हेन्य़ू अधिकाऱ्यांनाच करावे लागते.
जनगणना यांच्याकरवीच.
व्यक्तीच्या ओळखीशी संबंधित रहिवासी प्रमाणपत्र, जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले, पासपोर्टसाठी प्रमाणपत्र इ. दाखले देण्याचे अधिकार यांच्याकडे असतात. कदाचित माणसाची ओळख जमिनीशी निगडित असते, आणि जमिनीचे काम बघणारे लोक म्हणून असेल. (काही राज्यांत हे अधिकार लोकनियुक्त प्रतिनिधींना दिलेले आहेत, पण अशी प्रमाणपत्रे सगळीकडे ग्राह्य धरली जात नाहीत, फॉर ऑबव्हियस रीझन्स, आणि मुळातच ते त्यांचे काम नव्हेच.)
ही ठळक कामे. याशिवाय बरीच कामे असतात.
इतर विभाग – लाइन डिपार्टमेंट्स
यांना जिल्हे नसतात. म्हणजे यांचे जिल्हे थोडे वेगळे असतात असे म्हणणे जास्त योग्य ठरेल. म्हणजे असं – प्रत्येक खात्यासाठी एकेक मंत्री असतात. ते राज्यातले त्या त्या खात्याचे टॉप एक्झिक्युटिव्ह. हे टू इन वन असतात – एक्झिक्युटिव्ह पण आणि लेजिस्लेटर पण. जसे रेव्हेन्यू अधिकारी टू इन वन असतात – एक्झिक्युटिव्ह पण आणि (क्वासी) ज्युडिशियल पण.
मंत्री – सेक्रेटरी – डायरेक्टर – जिल्हा स्तरावरील अधिकारी.
उदा. शिक्षण मंत्री – शिक्षण सचिव – शिक्षण संचालक – जिल्हा शिक्षण अधिकारी – शिक्षण निरीक्षक.
हे ढोबळ उदाहरण झाले. प्रत्यक्षात थोडी अधिक गुंतागुंत असते. म्हणजे, वरील उदाहरणात बीडीओ, जिल्हा परिषद, कलेक्टर यांचेही अधिकार मिसळलेले असतात. शिवाय, सचिवालयाची वेगळी उतरंड असते, निर्देशालयाची (डायरेक्टोरेट/ डिरेक्टोरेट) वेगळी उतरंड.
सेक्रेटरी – सचिव हे खरे नोकरशहा. ब्युरोक्रॅट्स. मंत्र्यांचे सल्लागार. हे एक्झिक्युटिव्ह यंत्रणेचे सगळ्यात वरचे अधिकारी. डायरेक्टर म्हणजे फिल्डवरचे लोक आणि ब्युरोक्रॅट्सना जोडणारी कडी. यांच्या कामात सचिव आणि जिल्हा स्तरावरचे अधिकारी यांच्या प्रोफाइलचा संगम असतो. जिल्हा स्तरावरचे अधिकारी म्हणजे फिल्डवरचे लोक.
फिल्डवरचे सगळे अधिकारी जरी आपापल्या उतरंडीमध्ये काम करत असले, तरीही जिल्हा प्रशासनाला टाळून त्यांना काम करता येत नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासन प्रमुख अर्थात कलेक्टर हा एकप्रकारे त्यांचा (म्हणजे सगळ्या जिल्ह्याचाच) सुपरवायजरी अधिकारी असतो.
********
विशेष टिप्पणी!
आमदार/ खासदार/ लोकनियुक्त प्रतिनिधी यात नेमके कुठे येतात हे सूज्ञांना वेगळे सांगायला नकोच.Wink
माझ्या मते ते ‘नेमके’ कुठेच नसतात, दुधात मिसळलेल्या साखरेसारखे/ मिठाच्या खड्याप्रमाणे सर्वव्यापी असतात! त्यांच्या चवीनुसार व्यवस्था नीट काम करते किंवा फेफरे आल्यासारखी वागून आपली वाट लावते.

Tuesday, August 14, 2012

विलासरावांचे निधन !


राजकीय आणि सामाजिक जीवनात नेहमी अतिशय संयमाने आणि हसतमुखाने परिस्थितीला सामोरे जाणारे, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, मराठवाड्याचे भूमिपुत्र तथा विद्यमान केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांचे निधन.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो !

Thursday, August 2, 2012

अण्णा - आत्ता खरं आंदोलनाला पाहिलं यश लाभलं !


अगदी दोनच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री वरून अण्णांना एक राजकीय पर्याय देण्यासंबंधी आवाहन करण्यात आले होते, आणि आज जंतर मंतर वरून अण्णांनी देशाला एक राजकीय पर्याय देण्यासंबंधी एक सकारात्मक पाऊल उचलले. सर्वात प्रथम अण्णांचे आणि त्यांच्या सहकार्यांचे अभिनंदन.

भ्रष्टाचार आणि भ्रष्ट व्यवस्थेला कंटाळून वर्षभरापूर्वी लाखो लोक अण्णांच्या पाठीशी उभे राहिले आणि बघता बघता लोकपाल कायद्यासाठी सुरु केलेले आंदोलन एक जन आंदोलन - चळवळ म्हणून बाळसे धरू लागले. भ्रष्टाचाराने पिचलेली जनता बघता बघता या चळवळी मध्ये सहभागी होऊ लागली, परंतु गेले काही दिवस सामान्य माणूस या आंदोलनापासून थोडासा दुरावला. याला अनेक कारणे आहेत, त्यापैकी एक म्हणजे देशातला सामान्य माणूस जो रोजी रोटीच्या चक्रामध्ये अडकला गेला आहे त्याला हे आंदोलन, उपोषण पेलवले नाही आणि तशी अपेक्षा करणे हि गैर. नेमके हेच घटनाकारांनी ओळखले होते आणि पुढील शेकडो वर्षांचा विचार करून या देशाला एका संविधानाच्या चौकटीत बांधले, याच संविधानाने सामान्यातल्या सामान्य माणसालाही एक हक्क दिला, आवाज दिला. हा देश कुठल्या प्रकारच्या  लोकांच्या हाती असावा हे ठरवण्याचा  हक्क दिला. त्यांचे जिव्हाळ्याचे प्रश्न कुणीतरी देशाच्या सर्वोच्च ठिकाणी मांडावेत आणि ते सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत म्हणून लोकशाही प्रदान केली. 

देशाला ६५ वर्षे झाली स्वतंत्र होऊन आणि देशातील अनेक घटकांचा आवाज संसदेमध्ये घुमू लागला, शेतकऱ्याचा, कामगारांचा, दलितांचा , अल्पसंख्याकांचा पण दुर्दैवाने गेल्या काही वर्षांमध्ये सच्च्या भारतीयांचा आवाज काही त्या संसदेमध्ये ऐकायला मिळेना. जनतेचे खरे प्रतिनिधीच जनतेपासून दुरावले आणि पैश्याच्या जवळ गेले. आणि आता इथेच  खरी गरज होती यांना बदलण्याची कारण ज्या लोकांमधून हे निवडून आले त्यांनाच यांनी आता दूर केले म्हणून यांना दूर करण्याची आता वेळ आली आहे. 

हि वेळ आता आली आहे हे अण्णा आणि या आंदोलनाने ओळखले आणि खऱ्या अर्थाने हे या आंदोलनाचे पहिले यशस्वी पाऊल ठरले.

खर तर आता या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्यांची कसोटी लागणार आहे, खूप मोठी जबाबदारी यांच्या खांद्यावर येऊन ठेपली आहे आणि हीच या आंदोलनाची सर्वात कठीण परीक्षा असणार आहे त्यामध्ये हि हे आंदोलन यशस्वी होईल अशी आशा आपण सगळे बाळगू.  

आपल्या देशात असा एक मोठा वर्ग आहे कि जो फेसबुक, ट्विटर किंवा मेडीयावर मोठ्या हिरारीने सहभागी होतो परंतु   या सबंध राजकीय व्यवस्थेपासून स्वतःला दूर ठेवतो आणि इथेच सगळी फसगत होते. देशाला खरे स्वातंत्र्य मिळवून देण्याचे आणि सामान्य माणसाने त्याच्यात सहभाग नोंदाविण्यासाठीच  तर हि लोकशाही ची देन आहे. हि लोकशाही आपल्या सारख्यांच्या सहभागाने अधिक बळकट  होईल यात तिळमात्र हि शंका  नाही.

आता खऱ्या रूपाने हे आंदोलन लोकांशी जोडले जाऊ लागले आहे आता काही कर्तव्य आहेत ती या देशातील नागरिकांची आणि त्याच कर्तव्याची आठवण टीम अण्णा आणि आपण सर्व मिळून लोकांना सतत करून देऊ.

जय हिंद - जय भारत.

टीम अन्नाचे अभिनंदन

टीम अन्नाचे अभिनंदन. आणि ये अंबिका सोनिका का फिनी, काय माहीत होते तुला त्यांच्या राजकीय महत्वाकांक्षण बद्दल? आता ही टीम अन्न निवडून येवो का न येवो. पण तुम्ही मात्र येणार नाहीत हे नक्की. आणि उरली सुरली काळजी घेऊ आम्ही राष्ट्राची. बाय बाय कॉंग्रेस!


राष्ट्रासाठी मरणारे खरेच खूप भेटतील, त्याच्या साठी जगणारांची संख्या त्या प्रमाणात अगदी नगण्य.