Monday, July 9, 2012

आणि विठ्ठल सावळा बघ्या झाला आहे, मातला इतका भेदा भेद जरी



अमंगळ जरी भेदा भेद होता
मार्ग हाची एक स्वार्थ लाटण्याचा.
---

इथे एक मोठा बाबासाहेब झाला
त्याला ही अपमानीला चांडाळानी.
---

शाहू फुले थोर मानव झाले
पायी तुडविले पण विचार त्यांचे. 
---

आम्हा नोव्हे जान जात पात धर्म 
जणू एक कर्म हरिनामाचे.

वारकरी आम्ही विठूरायाचे 
मायबाप अमुचा ज्ञाना-तुका.

पण इथेही शिवला भेदा भेद आता 
आणि विन्टाळला वारकरी.

आणि विठ्ठल सावळा बघ्या झाला आहे 
मातला इतका भेदा भेद जरी.

                                          - प्रकाश

3 comments:

Unknown said...

सुरेख कविता

प्रकाश बा. पिंपळे said...

Dhanyawad Sir!

Anonymous said...

Chan Khup Chan ...manatun abhinandan

Post a Comment