Wednesday, December 28, 2011

सुप्रिया सुळे यांचे लोकसभेतील लोकपाल वरील भाषण

Tuesday, December 27, 2011

देश चालवणे 'एन. जी. ओ आणि कॉर्पोरेट' ला 'आउट सोर्स' करायचं ठरवलंय


मान्य सरकारी सिस्टीम मध्ये खूप भ्रष्टाचार आहे, बरेच राजकारणी भ्रष्ट आहेत. पण मग अस करू एक हुकुमशहा नेमू. नको त्याला हुकुमशहा नको म्हणायचं. त्याला दुसरच काहीतरी म्हणू आणि त्याच्या नेमणुकीचे सगळे हक्क आम्ही निवडलेल्या नेतृत्वाला न देता इतर कुनाला तरी देऊ. आणि मग हळू हळू ज्यांचा आधीच आवाज नाही त्यांचा आवाज अजून दाबू आणि आमची जी जुनी संस्कृती होती, व्यवस्था होती तिला परत आणू अगदी राम राज्य!
भ्रष्टाचार तर हटवायलाच हवा, पण आमचीच 'क्रोसिन' घ्या म्हणणे चूक. असो, अस ही देश चालवणे 'एन. जी. ओ आणि कॉर्पोरेट' ला 'आउट सोर्स' करायचं ठरवलंय!

Sunday, December 25, 2011

बाबा तुम्ही आमची सदैव प्रेरेना राहाल



सुखावतु जीवन सोडून दीन दुबळ्यांच्या आयुष्याच नंदवन करणाऱ्या महा मानवाचा आज जन्म दिवस. बाबांना आणि त्यांच्या कार्याला कोटी कोटी नमन आणि शुभेच्छा!

आज-काल : गांधीजी आणि जिना एक पुनर्विलोकन

सुमारे १५ वर्षांपूर्वी मुंबईच्या हुतात्मा चौकातील पदपथावर मला हमीद दलवाई यांचे ‘मुस्लिम पॉलिटिक्स इन इंडिया’ हे पुस्तक आढळले. अत्यंत अल्प किमतीत म्हणजे २०-२५ रुपयांना मिळालेल्या या पुस्तकाचे मूल्य मात्र अमूल्य आहे. गेल्या १५ वर्षांत मी या पुस्तकाची किमान सहा-सात पारायणे केली असतील. हमीद दलवाई आज फार थोडय़ा लोकांना माहिती असले तरी भारतीय मुस्लिमांमधील एक निर्भीड आणि परखड विचारवंत म्हणून जुन्या पिढीला ते माहिती आहेत. कोकणच्या लाल मातीत जन्मलेल्या हमीद दलवाई यांनी डाव्या विचारसरणीच्या राजकारणात स्वत:ला झोकून दिले. काही सुंदर लघुकथा आणि विचारप्रवर्तक राजकीय लेख त्यांनी लिहिले. त्यांचे स्नेही आणि सहकारी दिलीप चित्रे यांनी हमीद दलवाई यांचे लेखन अनुवादित करून पुस्तकरूपाने प्रसिद्ध केले तेच हे पुस्तक होय. या पुस्तकात मुस्लिम समाजातील प्रतिगामी आणि हिंदू रूढीप्रिय, कर्मठ या दोघांचीही झाडाझडती घेण्यात आली आहे.  धर्मनिरपेक्ष, सर्वसमावेशक आधुनिक भारताच्या उभारणीसाठी सर्व जाती-पंथ-धर्मातील सुधारणावाद्यांना एकत्र येण्याचे आवाहन त्यात करण्यात आले आहे. भारतीय राजकीय विचारधारेवरील एका संकलन ग्रंथात मी हमीद दलवाई यांच्या लेखनाचा समावेश केला; तेव्हा काही समीक्षक कमालीचे गोंधळले. त्याचे एक कारण म्हणजे या समीक्षकांनी दलवाई यांचे नाव पूर्वी कधी ऐकले नव्हते. दुसरे कारण म्हणजे या संकलन ग्रंथात मी मौलाना अबुल कलम आझाद यांना वगळले होते. दलवाई यांचे अगदी चाळीशीतच निधन झाल्याने आजच्या पिढीतील बहुतांश लोकांना ते माहिती नाहीत, हे खरे आहे. तथापि मौलाना आझाद यांच्याऐवजी मी दलवाई यांची निवड करण्यामागील आणखी एक कारण म्हणजे मौलाना आझाद हे थोर विद्वान, विचारवंत आणि राष्ट्रवादी असले तरी त्यांच्या लेखनात त्यावेळच्या समस्यांचे प्रतिबिंब दिसत नाही. याउलट हमीद दलवाई यांनी त्यावेळच्या ज्वलंत समस्या, प्रश्न यावरच आपल्या लेखनात भर दिलेला आढळतो.
हमीद दलवाई यांचा दिलीप चित्रे यांनी अनुवादित केलेला एक लेख अलिकडेच मी वाचला आणि त्यांच्याबद्दलचा आदर आणखी वाढला. महंमद अली जिना यांचे जीवन आणि वारसा यांचे पुनर्विलोकन या निबंधात आहे. हा अनुवाद १९७३ मध्ये ‘क्वेस्ट’ या साहित्यविषयक नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे. हे नियतकालिक आज अस्तित्वात नाही. तथापि ‘द बेस्ट ऑफ क्वेस्ट’ (क्वेस्टमधील सवरेत्कृष्ट, निवडक लेख) या नावाने प्रसिद्ध झालेल्या एका संकलन ग्रंथात दलवाई यांच्या लेखाचा समावेश आहे. या लेखाची सुरुवातच दलवाई यांनी अशी केली आहे- ‘‘बांगलादेशची निर्मिती हा महंमद अली जिना यांच्या मोठय़ा राजकीय स्वप्नांवरील अखेरचा प्रहार आहे.’’
जिना हे सर्वधर्मसमभाव मानणारे, आधुनिक विचारसरणीचे होते; परंतु राजकारण, तसेच समाजकारण यांच्यात तडजोडीला सतत विरोध करणाऱ्या काही हिंदू नेत्यांच्या वागण्यामुळे आणि महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू यांच्यामुळे (त्यांचे विचार न पटल्याने) नाईलाजाने जिना यांना स्वतंत्र मुस्लिम राष्ट्रासाठी आग्रह धरणे भाग पडले, असा जो समज होता तो चुकीचा, अनाठायी असल्याचे हमीद दलवाई यांनी या लेखात उघड केले आहे. १९१६ चा लखनौ करार आणि १९४६ चा ‘कॅबिनेट मिशन प्लॅन’ या दोन गोष्टींवर दलवाई यांनी चांगले विश्लेषण केले आहे. वसाहतवाद्यांविरुद्धच्या लढय़ात हिंदूंना साथ द्यायची, असा जिना यांचा उद्देश होता, असे जिना यांचे समर्थक ठामपणे सांगतात. खरोखरच तसे असेल तर मग लखनौ करारानंतर ब्रिटिशांविरुद्धच्या लढय़ात जिना हे केंद्रस्थानी असायला हवे होते; परंतु तसे घडले नाही. उलट मध्यंतरीच्या काळात ब्रिटिश राज्यकर्ते आपल्या कोणत्या गोष्टी, मागण्या मान्य करतात याचीच चाचपणी जिना हे करीत होते, अंदाज घेत होते. मुस्लिमांसाठी कोणत्या सवलतींच्या मागण्या पुढे करायच्या, त्या कशा रेटायच्या याचाच जिना हे सातत्याने विचार करीत होते; ही बाब हमीद दलवाई यांनी उघड केली आहे.
त्यानंतर ‘कॅबिनेट मिशन प्लॅन’संबंधांतही दलवाई यांनी विश्लेषण केले आहे. ‘कॅबिनेट मिशन प्लॅन’नुसार मुस्लिमबहुल प्रांतांत मुस्लिमांना राजकीय सत्ता-अधिकार तर मिळणारच होते; त्याशिवाय केंद्रातही त्यांना ५० टक्के आरक्षण मिळणार होते; म्हणूनच  जिना यांनी ‘कॅबिनेट मिशन प्लॅन’ ताबडतोब स्वीकारला, मान्य केला. आणखी एक गोष्ट म्हणजे भारतातील जी राजेशाही राज्ये होती ती या ‘कॅबिनेट मिशन प्लॅन’नुसार तशीच राहणार होती. त्यांचा दर्जा बदलणार नव्हता. त्यामुळे जिना यांनी या योजनेचे स्वागत केले. ‘मुस्लिम इंडिया’  आणि ‘प्रिन्सली इंडिया’  या दोघांचा ‘हिंदू इंडिया’  विरुद्ध आपल्याला वापर करता येईल, अशी अटकळ जिना यांनी बांधली होती. भारतात त्यावेळी असलेले नवाब आणि महाराजे यांचे हक्क अबाधित राहावे, अशी भूमिका जिना यांनी घेतली होती, हे दलवाई यांनी स्पष्ट केले आहे.
जवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधी यांनी ‘कॅबिनेट मिशन प्लॅनह्ण मान्य केला नाही म्हणून इतिहासकारांनी त्या दोघांना दोष दिला, टीका केली. हे इतिहासकार गतस्मृतींमध्ये रमण्यात धन्यता मानणारे, आहे तेच पुढे चालू द्यावे, बदल-सुधारणा नको अशा मताचे होते. गांधी आणि नेहरू यांनी ‘कॅबिनेट मिशन प्लॅन’ मान्य केला असता तर देश आज अखंड राहिला असता (फाळणी झाली नसती; पाकिस्तानची निर्मिती झाली नसती) असे त्यांचे म्हणणे!
जिना यांच्या मागण्या गांधी आणि नेहरू यांनी मान्य केल्या असत्या तर फाळणी निश्चितपणे टळली असती हे दलवाईही मान्य करतात. तथापि ते   पुढे जे म्हणतात ते अधिक महत्त्वाचे आहे. हमीद दलवाई लिहितात- ‘‘कोणत्याही स्थितीत, पडेल ती किंमत मोजून देशाची फाळणी टाळायची हे गांधी आणि नेहरू यांचे मुख्य उद्दिष्ट नव्हते. फाळणी टाळण्यासाठी पडेल ती किंमत मोजण्याची तयारी ठेवली असती तर त्याचा किती विपरीत परिणाम झाला असता ते पाहा- फाळणी टळली असती, पण देशाचे धार्मिक तत्त्वावर आतल्या आतच विभाजन झाले असते. प्रत्येक भारतीय हा एकतर हिंदू नाहीतर मुस्लिम झाला असता. भारतीयत्वाची भावना राहिलीच नसती. हा मोठा धोका होता. मग देशाच्या त्या अखंडतेला काय महत्त्व  राहिले असते?
सुधारणावादी विद्वज्जन हे महात्मा गांधींकडे नवचेतनावादी म्हणून तर जिना यांच्याकडे आधुनिक विचारसरणीचा माणूस म्हणून पाहात होते. म्हणजेच दोघांबद्दलही विद्वज्जनांमध्ये आदरभावना होती. असे असले तरी प्रत्यक्षात गांधीजींच्या ‘नवचेतनावादी’ भारतात अल्पसंख्याकांना समाधानाने राहता येत होते. देशाला धर्मनिरपेक्ष राज्यघटना आहे. आधुनिक राष्ट्रउभारणीचा मोठा प्रयोग सुरू झाला आहे. १६ प्रमुख भाषा आणि आठशेवर बोली भाषा असलेला हा बहुधर्मीय, बहुवंशीय देश आजही अखंड आहे, एकात्म आहे. या देशातील महिलांना मतदानाचा हक्क न झगडता मिळाला आहे. मतदानाच्या हक्कासाठी महिलांना संघर्ष करण्याची वेळ आली नाही, तो हक्क त्यांना आपसूक मिळाला. याउलट दुसरीकडे जिना यांच्या पाकिस्तानात काय आहे? पाकिस्तान तर धर्मनिरपेक्षतेविरुद्धच्या तसेच लोकशाहीविरोधी दिशेने जातो आहे. पाकिस्तानच्या निर्मितीनंतर केवळ दोनच महिन्यांत तेथील अध्र्याअधिक हिंदूंना देश सोडून जावे लागले; म्हणजेच त्यांना जबरदस्तीने हाकलून देण्यात आले. इस्लामच्या संकुचित आणि जाचक परंपरा, रूढींना खतपाणी मिळाले आणि पाकिस्तान हे इस्लामी राष्ट्र झाले. त्यात लोकशाहीमूल्यांचा मागमूसही नाही. देशाची राष्ट्रीय ओळख, अस्तित्व आजही स्पष्ट नाही. महंमद अली जिना हे जर खरोखरच आधुनिक धर्मनिरपेक्ष, लोकशाहीवादी नेते होते; तर मग त्यांच्या पाकिस्तानात  अशी स्थिती का ? पाकिस्तानचे राजकारण हे सुरुवातीपासून आतापर्यंत आंधळेपणाने हिंदूंचा दीर्घद्वेष करण्याच्या पायावरच का उभे आहे? असा सवाल हमीद दलवाई यांनी उपस्थित केला आहे. जाता जाता शेवटी त्यांनी जिना यांच्या दुर्बलतेबद्दलही लिहिले आहे. फाळणीच्या वेळी दोन्ही ठिकाणी जो प्रचंड हिंसाचार झाला तेव्हा जिना यांच्या मनात प्रचंड भीती घर करून होती. गांधीजींनी मात्र हिंसाचार थोपविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली हे सर्वाना माहिती आहे. अल्पसंख्याकांच्या रक्षणासाठी सहाय्यभूत ठरेल असे एक संयुक्त निवेदन प्रसृत करण्याची योजना गांधीजींनी पुढे केली; परंतु त्यावर स्वाक्षरी करण्यास जिना यांनी स्पष्ट नकार दिला. १९४७-४८ च्या हिवाळ्यात भारतात आणि पाकिस्तानातही हिंसाचाराने कळस गाठला होता तेव्हाची ही गोष्ट आहे. दंगली थांबविण्यासाठी गांधीजींेनी कसोशीने प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना कलकत्त्यात यशही आले. याउलट त्यावेळी जिना हे गव्हर्नर जनरलच्या निवासस्थानातून बाहेरही पडले नाहीत. एवढेच नव्हे तर ३० जानेवारीला गांधीजींची दिल्लीत हत्या झाल्याचे समजल्यावर आपलेही असेच होईल की काय, या भीतीने जिना यांनी आपल्या निवासस्थानाच्या परसदाराभोवती भक्कम भिंत उभारण्याचे आदेश दिले.  यावरून जिना यांचा भित्रेपणा आणि राजकीय दांभिकपणा दिसून येतो तसेच मानवी मूल्यांबाबतच्या त्यांच्या भावनाही दुर्बल असल्याचे स्पष्ट होते, असे दलवाई म्हणतात.
१९४७-४८ च्या हिवाळ्यामध्ये जिना यांना वयोमानाने शारीरिक दौर्बल्य आले होते. १९७३ नंतर भारतातही परिस्थिती बदलत गेली. १९७५ मध्ये आलेली आणीबाणी, हिंदुत्वाचा उदय अशा अनेक गोष्टी होऊनसुद्धा भारतातील मुस्लिम बांधव हे पाकिस्तानातील हिंदूंपेक्षा सांस्कृतिक आणि आर्थिकदृष्टय़ा सुरक्षित आणि सुखात आहेत. बंगाली भाषा आणि बंगाली माणसे यांच्या दमन-दडपशाहीमुळे पाकिस्तानात फूट पडली. याउलट भारतात बहुभाषिकतेला कधी विरोध झाला नाही. बहुभाषिकता  समृध्द होऊ दिली गेली. पाकिस्तानच्या तुलनेत भारतात महिलांचे सक्षमीकरण अधिक झाले आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाकिस्तानात प्रथमपासून आणि आजही राजकारणात लष्कराचा हस्तक्षेप, किंबहुना वरचष्मा कायम आहे; तर भारताच्या राजकारणात लष्कराचा अजिबात हस्तक्षेप नाही, भूमिका नाही.
स्वातंत्र्यानंतर भारत एकसंध, अखंड राहावा की त्याचे विभाजन व्हावे या मुद्दय़ावर गांधीजींचा पराभव झाला हे मान्य! इच्छा नसतानासुद्धा फाळणी झालीच; परंतु तरीही इतिहास मात्र आजही गांधीजींचे विचार, भूमिका आणि कार्य यांचे समर्थन करतो. स्वातंत्र्यानंतरच्या अनेक वर्षांमध्ये जे पाहायला मिळाले; त्यावरून नवचेतनावादी गांधीजींचे श्रेष्ठत्व सिद्ध होते. जिना यांचा दिखाऊ, बेगडी तथाकथित आधुनिकतावाद त्यापुढे खुजा वाटतो. आता उपखंडाबाबत विचार करणे सोडून जरा बाहेरच्या जगाचा विचार करू या. उत्तर अमेरिका, पूर्व युरोप, पश्चिम युरोप, दक्षिण आफ्रिका, तिबेट आणि ब्रह्मदेश (म्यानमार) आदी ठिकाणी जिना यांचे नावही कोणाला माहिती नाही. याउलट लोकशाही, सामाजिक न्याय, धर्मनिरपेक्षता, सर्वधर्मसमभाव, तत्सम मानवी मूल्ये आणि हक्कांसाठी प्रभावी लढा देणारा म्हणून महात्मा गांधी यांचे नाव आजही जगभर घेतले जाते. त्यांना ‘जाऊन’ ६३ वर्षे झाल्यानंतरही..!
अनुवाद: अनिल पं. कुळकर्णी

सौजन्य : लोकसत्ता 

Wednesday, December 21, 2011

साहित्य अकादमी पुरस्कार - ग्रेस तुमचे खूप खूप अभिनंदन


भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते; मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवली गीते.
ते झरे चंद्रसजणांचे, ती धरती भगवी माया; झाडांशी निजलो आपण, झाडात पुन्हा उगवाया.
तो बोल मंद हळवासा, आयुष्य स्पर्शुनी गेला; सीतेच्या वनवासातील, जणू अंगी राघव-शेला.
स्तोत्रात इंद्रिये अवघी, गुणगुणती दुःख कुणाचे; हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे….

Tuesday, December 13, 2011

कालनिर्णय या कॅलेंडर ची महाचूक !

कालनिर्णय या कॅलेंडर ने जिजाऊ जयंती ही १२ जानेवारी २०१२ ऐवजी ९ जानेवारी २०१२ अशी छापली आहे. ही फार मोठी चूक आहे. आणि असभ्य भाषा वापरायची नाही म्हणून - हा एक घोर अपराध आहे.

अगोदरच छत्रपती शिवरायांच्या जयंतीचा घोळ घालून ठेवला असतांना अशा प्रकारच्या चुका पुन्हा एकदा केवळ आणि केवळ संभ्रम वाढवण्याचे काम करीत आहेत. कालनिर्णय ने त्वरित सर्व प्रतींमध्ये सुधारणा करावी आणि सुधारित दिनदर्शिकाच महाराष्ट्रातील शिवरायांना मानणाऱ्या लोकांनी विकत घ्यावी हि विनंती.

तरी सर्व महाराष्ट्रीय जनतेला आणि जिजाऊ.कॉम च्या वाचकांना विनंती की हे कॅलेंडर विकत घेऊ नये. ज्यांच्या कडे असतील त्यांनी होळी करून त्याचे फोटो येथे पोस्ट करावेत.

जय जिजाऊ! जय शिवराय!
जिजाऊ.कॉम
www.jijau.com

Monday, December 12, 2011

मुख्यमंत्री - कार्यकर्ता चे संस्थापक आणि सह-संपादक श्री. प्रकाशराव बा. पिंपळे (पाटील). उक्कलगावकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


महाराष्ट्राच्या ग्रामीण कुशीतून तयार झालेल्या आपल्या तेजस्वी विचारांची धार आणि समाजातील दुष्प्रवृत्ती विरुद्ध तुमच्या शब्दांचे वार दोन्ही हि वृद्धिंगत होवो हीच आई भवानी चरणी प्रार्थना.
आपल्या पुढील सामाजिक, कौटुंबिक आणि राजकीय जीवनास समस्त मुख्यमंत्री आणि जिजाऊ.कॉम परिवारातर्फे लाख लाख शुभेच्छा!

अमोल सुरोशे (नांदापूरकर)

तुमचा जूना कॉम्पुटर शाळेसाठी मिळेल का?


नाशिक मधील निफाड तालुक्यातील एका वस्ती शाळेला एका संगणकाची गरज आहे. तेथील मुख्याद्यापक श्री. विशाल चौहान यांनी तशी विचारणा केलेली आहे. कुणाकडे आपला जूना कॉम्पुटर असेल आणि तो शाळेला भेट म्हणून द्याची इच्छा असेल तर कृपया संपर्क साधा: pbpimpale@gmail.com oramol.suroshe@gmail.com.
किंवा फोन करा : 09960946967
जमले तर तुमच्या मित्रांना ही सांगा, अशी गरज अनेक शाळांना आहे.


http://jijau.com/?q=node/41

Sunday, December 11, 2011

पवार आणि मुंढे साहेब यांना जन्म दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा



या पिढीला लाभलेले एक आदर्श असे नेते, महराष्ट्राचे मार्गदर्शक आणि पुरोगामी चळवळीतील युवकांचे प्रेरणास्थान मा. शरद गोविंदराव पवार यांना वाढ दिवसाच्या समस्त मुख्यमंत्री कार्यकर्ता परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा!




लोकेनेते आणि बहुजनांच्या प्रश्नाची जाण असणारे राष्ट्रीय पातळीवर एका मुख्य असे नेतृत्व मा. गोपीनाथ मुंढे यांना ही  समस्त मुख्यमंत्री कार्यकर्ता परिवाराकडून वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, December 6, 2011

सोन्यासारखा देश करपून जातांना

कुठल्याही देशात एखाद्या मुद्द्यावर वाद हा अपेक्षितच असतो .. पण तो वादच असावा, निव्वळ गोंधळ नसावा.
एकीकडे आपल्या देशाची अर्थव्यवस्था एका गंभीर संकटाकडे वेगाने आगेकूच करतांना दिसत आहे आणि दुसरीकडे आपल्या देशाची ध्येय धोरणे ठरवणारी संसद गेले आठवडाभर गोंधळाने गाजते आहे. कुणा कुणालाच (न सरकारला ना हि विरोधी पक्षांना) येणाऱ्या भाविताव्या विषयी चिंता नाही का वाटत. का संकट आल्यावरच ह्यांची डोळे उघडतील. १२५ कोटींच्या देश्चे प्रतिनिधित्व करणाऱ्या संसदेमध्ये येणारे संकट ओळखण्याची दृष्टी कोणाकडेच नसावी हि केवढी दुर्दैवाची बाब.

खर तर देश सध्या भरकटलेल्या अवस्थेत असल्यासारखा भासतो आहे, ज्यांनी (मग ते राज्यकर्ते असोत कि विरोधक) काही बोलायचे किंवा करायचे अपेक्षित आहे ते एका निष्क्रिय अवस्थेत अडकले आहेत.. आणि ज्यांनी ओरडून ओरडून सांगितले तरी एक पान देखील हलणार नाही त्यांच्या बोलण्याला आणि वागण्याला कुठलीही मर्यादा राहिली नाही. हे ह्या साठी इथे नमूद करतोय कि अण्णांचे सहकारी प्रशांत भूषण यांनी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली ज्या मध्ये त्यांनी अशी मागणी केली आहे कि या देशातील अनु उर्जा सुरक्षे संदर्भात एक जन लोकपाल सारखी एक स्वायत्त संस्था असावी ज्यावर सरकारचे किंवा पंत प्रधानांचे नियंत्रण नसावे आणि ते लोकांच्या प्रतिनिधींकडे असावे ( लोकांचे प्रतिनिधी म्हणजे टीम अण्णा किंवा सिव्हील सोसायटी सारखे काही लोक), एवढ्या गांभीर्य पूर्वक विषयावर तुम्हाला वाटत नाही का हे एक प्रकारे मर्यादा उल्लंघन झाले.

एका दृष्टीने सबंध व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा प्रयत्न हि वेळोवेळी होताच असतो, "जो जो राजकारणी तो तो चोर " हि संकल्पना रूढ होतांना दिसते आहे. बुद्धीजीवी वर्ग सुद्धा त्याच त्याच प्रश्नांची वेगवेगळ्या पद्धतीने उजळणी करतो पण त्या प्रश्नांचे उत्तर शोधायला कुठे तरी कमी पडतोय.

सरकारचेही डोके ठिकाणावर आहे कि नाही असेच म्हणावे वाटते, सोशल नेट वर्किंग संकेत स्थळांवर देखरेख करण्याचे शहाणपण यांना सुचले कारण यांच्या दैवतांवर ( गांधी परिवार) काही आक्षेपार्ह मजकूर आढळून आला.
या मुद्द्याला एका धार्मिक बुरख्याचे पांघरून घालून सरकार काय साधू इच्छिते हे समजायला हि मार्ग नाही.

उद्योजक, शेतकरी, नौकारदार, कामगार यांचे प्रतिनिधित्व कुठेतरी हरवले आहे. सध्या तरी देशाच्या प्रत्येक प्रश्नाची चेष्टा करण्या ऐवजी चिंता व्यक्त करण्याची जास्त गरज आहे असे मला वाटते.

आजच्या या सकाळी देवाकडे एक प्रार्थना करतो, परमेश्वरा सर्वांना सद्बुद्धी दे रे बाबा.. सोन्यासारखा देश करपून जातांना बघू नाही शकत.
- अमोल सुरोशे (नांदापूरकर)