आयुष्याचे ४५-५० वर्षे सार्वजनिक जीवनात अहोरात्र खर्च करणाऱ्या एका ज्येष्ठ वयाच्या नेत्यावर एक मनोविकृत माणूस हल्ला करतो आणि त्याच्या ह्या कृतीने आपलेच काही देशबांधव / मराठी बांधव एका आसुरी आनंदाने हुरळून जातांना बघून खरच आच्छर्य वाटले, देश, भ्रष्टाचार या सारख्या मुद्द्यावर बोलणारे साध्या सरळ भारतीय संस्कारांना कसे विसरले.
शरद पवार आणि त्यांचा भ्रष्टाचार हे मुद्दे वेगळे आणि त्या रोगी माणसाने "पाठीमागून" एका ज्येष्ठ वयाच्या व्यक्तीवर केलेला वार हि घटना निराळी, दोन्हींची सांगड घालून आपण आपल्यातल्या विकृतीला खतपाणीच घालत आहोत असे मला वाटते.
दोन्ही गोष्टींचा तितक्याच प्रखरतेने विरोध करावा पण निदान आपल्या सांस्कृतिक दिवाळखोरीचे प्रदर्शन थांबवावे असे मला वाटते. रस्त्यावर एखाद्या मोठ्या वयाच्या माणसाला / स्त्रीला कोणी मारहाण केली तर पेटून उठणारे आज नक्कीच एवढे हि मनाने पांगळे बनले नाहीयेत.
विकृत मानसिकतेने ग्रासलेल्या देशात काही हि घडू शकते, एरवी मातीमध्ये राब राब राबणाऱ्या त्या शेतकऱ्याची कोणाला आठवण येत नाही , तो कसे जीवन जगतो, त्याचे कुटुंब कुठल्या परिस्थतीत आहे ह्याची दुरूनही जाणीव नसणारेही आज शेतकर्यांबद्दल कळवळून बोलत आहेत, प्रत्येक आठवड्याचे दोन दिवस सिनेमे आणि मॉल मध्ये घालवणारे आणि उरलेले पाच दिवस बैलासारखे काम करणारे अगदी थोडीशी सवड मिळाली कि सबंध देशाच्या समस्यांवर फारच पोट तिडकीने बोलतांना दिसतात आणि एका ब्रेक मध्ये चुटकीसरशी सारे प्रश्न सुटले पाहिजेत ह्याची अपेक्षा करून आणि देश पुन्हा त्याच पुढाऱ्यांच्या हातात देऊन पुन्हा आपल्या व्यक्तिगत आयुष्यात मग्न होतात.
संविधान कर्त्याने मतदानासारखे शक्तिशाली हत्यार हाती दिलेले असतांना आता देश हरविंदर सिंग सारख्या मनोविकृत माणसावर जास्त विश्वास करते याचे फार वाईट वाटते आणि देशाच्या भवितव्याबद्दल चिंता निर्माण होते. मला माहित आहे शहाण्यांना शहाणपण शिकवावे लागत नाही पण वेळ निघून जाण्यापूर्वीच आपल्या विचारांना आवर घाला कारण आपले विचारच आपल्या देशाचे भवितव्य घडवणार आहेत, आणि ते नक्कीच उज्वल आणि सुसंकृत असावे यामध्ये नक्कीच कोणाचे दुमत नसावे.
- अमोल सुरोशे (नांदापूरकर)
4 comments:
तुम्ही म्हणता आहात ते बरोबर आहे, आपण मागच्या ५० वर्ष पासून मतदान करतच आहोत ना?मग हे भ्रष्ट कॉंग्रेस सत्ते वरून उतरली का? नाही. भ्रष्टाचार कमी झाला का नाही. अहो युंही पैसा खा. पण लोकांचे काम तर करा. आणि पैसा तरी कटी खावा माणसांनी ह्यला काही सीमा आहे कि नाही. शरद पवार किती भ्रष्ट आहे हे मी काही तुम्हाला सांगायला नको. पूर्ण भारताला ते माहित आहे. मग त्यांना पकडले का नाही अजून ? तर पुरावे कुठे आहेत? पैसा हेच खाणार आणि कारवाई पण हेच करणार. चोरालाच जर इन्स्पेक्टर बनवले तर चोर पकडले कसे जाणार ?
जे झाले ते फारच छान झाले. ह्यला तुम्ही विकृत म्हणा कि काही. पण भ्रष्टाचार करून भारताचे नाक कापणारे तुम्हाला चालतात. त्यांना पाठींबा ठेणारे विकृत नाही का ? मी तर म्हणतो कि खूनच करायला हवा होता. महाराष्ट्रात दिवाळी साजरी झाली असती. शेतकरी सुखी झाले असते.
तुम्ही अगदी माझ्या विचाराचे आहात.. मीही या गोष्टीचा निषेध करतो.. महागाई नाही स्वतः कडे तितके पैसे नसतात.. शेतकऱ्यांना योग्य भाव मिळालाच पाहिजे.
हजारो शेतकऱ्यांच्या आत्महत्येला कारणीभूत असलेल्या आणि दाउदचा हस्तक असलेल्या माणसाला कुठल्याही वयात आणि सावध/बेसावध कुठल्याही अवस्थेत मारणं यात काहीही वावगं नाही !!!
तुम्ही केलेले आरोपांमध्ये तथ्य असेल तर मग फाशीच द्यायला हवी त्यांना, त्यांच्या कर्माची शिक्षा देण्यासाठी तरी निदान आपण या देशात येऊन त्यांच्या विरुद्ध कायदेशीर लढाई द्यावी हि अपेक्षा... का न्यायालयांवर पण विश्वास राहिला नाही आत्ता ?
Post a Comment