परंपरेत किंवा पुराणात दिवाळी कशासाठी का असेना, त्याच्याशी आम्हाला घेणे नाही आणि फायदा ही नाही. पण आप्तजनांची भेट, जवळच्या मित्रांचा सुटीतला सहवास, उटण्याचा आणि सुगंधाचा दरवळ आणि सोबतीला खमंग दिवाळी पेटंटटेड फराळ - चिवडा, करंज्या, लाडू, चकल्या आणि शंकरपाळे या सगळ्यांनी दिवाळीच महत्वच बदलून टाकलय.
तुमच्या ही आयुष्यात वर्षभर तर सुखे येवोतच येवोत पण या दिवाळीला खूप महिने न भेटलेल्या त्या मित्राची भेट होवो, तुमच्यात खूप गप्पा होवोत, त्या कुणाची तरी थोडी का असेना पण झलक का होईन पण वाट्याला येवो, नव्या कपड्यात तुम्हाला ही काही क्षण आपण खूप रुबाबदार आहोत असा भास (का होईना) व्हावा, वरचे सगळे सुगंध तुमच्या घर भर दरवळावेत आणि वर्ष भराचा सगळा थकवा निघून जाऊन दिवाळीचे दिवस फक्त आणि फक्त आनंदाने भरून जावेत याच आमच्या आपणा सर्वांना दिवाळीच्या छोट्या छोट्या शुभेच्छा.
- अमोल सुरोशे - नांदापूरकर आणि प्रकाश पिंपळे - उक्कलगावकर
मुख्यमंत्री कार्यकर्ता आणि जिजाऊ.कॉम
No comments:
Post a Comment