बापू,
आज (२ ऑक्टो.) तुमची जयंती. तुम्ही विसरला असाल हो. आम्ही कशे विसरू? आज दिवसभर टी.व्ही. वर कार्यक्रमक्रम होतील आणि वर्तमान पत्रात जाहिराती ही येतील शासनाच्या. मग कस विसरुत तुम्हाला? कारण २ ऑक्टो. आणि ३० जाने. आणि इतर काही राष्ट्रीयसण झाले की तुमची आमची गाठ (वैचारिक) तशी पडत नाही. तुम्ही दिसता सगळीकडे, शासकीय कार्यालयात, भर चौकात आणि अनेक ठिकाणी. पण काही लक्ष जात नाही. वेळच मिळत नाही हो आजकाल दुसर काही करायला. मला तर हा प्रश्न पडतो की आज जर आपण पारतंत्र्यात असतो तर स्वातंत्र्य चळवळ पण आउटसोर्स करावी लागली असती; वेळच नाही हो! तुम्हाला असेल ना हो फार वेळ आता; मग ह्या राजकारण्यांना का नही खडसावत तुम्ही. तुम्ही बघाना बाईंनाच बोलून. कारण त्यांच्या शिवाय पान ही हलत नाही. बर नसतील ऐकत तर नको बरका उगाच तुम्हाला त्रास आणि मनस्ताप.
आणि हो मागे ते इकडे ठाण्यात साहित्य संमेलनात जे झालं त्याच जास्त वाईट नका वाटून घेऊ. असे बरेच प्रकार चालत राहतात, आम्हाला आता सवय झाली आणि तुम्हाला तर कदाचित झालीच असेल आणि नसेल तर प्लीज करून घ्या. इकडे काही पिंपळावर बसलेले मुंजे आहेत, संधी आली की टपा-टपा उड्या मारतात. असो. तुम्ही नका जास्त मनाला लावून घेऊ. कारण तुम्हाला जे जवळच म्हणतात तेच तुमच्या विचारांनी चालत नाहीत तर उगच दुसऱ्यांवर राग करून काय फायदा.
तुम्हाला एक सांगू का तुमच त्यातली त्यात बर आहे, शिवाजी महाराज आणि बाबासाहेब याचं तर फारच अवघड होवून बसलय. आधी वाटायचा या लोकांच्या मागे एक जात किंवा समाज तरी आहे तुमच्या मागे कुणीच नाही. कसतरीच वाटायच. पण तेच फार छान आहे, कारण हे मागे असलेले कधी पळून जातील आणि कशासाठी तूमचा उपयोग करतील याचा तुम्ही अंदाज ही लावू शकणार नाहीत, आणि मी जर सांगितलं तर तुम्ही म्हणाल अशक्य आहे! जाऊ द्या म्हणून ना सांगितलेलेच बरे. तस तुम्हाला याचा अनुभव आहेच कारण तुमच्या विचारांशी बांधिलकी सांगणारे लोक आणि पक्ष कधीच गायब झालेत तुमच्या मागून.
असो. अजून ही बरेच लोक तुम्हाला आठवतात, वेळ नसला तरी. कधी कधी सगळ्यांनाच वाटते गांधीच्या मार्गाने देश गेला असता तर आतापर्यंत सुराज्य मिळाले असते. पण आता जरा मार्ग बदलला आहे. आज ना उदया तुमच्याच मार्गाच मोडीफिकेषण आम्हाला सुराज्याकडे जायला वापराव लागेलच.कारण कदाचित तुमचेच विचार असे उरलेत जेथे कॅपीट्यालिस्ट, कम्युनिस्ट, सोशलिस्ट आणि इतर सगळे प्रवाह नतमस्तक होतात.आणि म्हणूनच विश्वास वाटतो कधी ना कधी पुन्हा तुम्ही सांगितलेल्या मार्गाने चालून नक्की सुराज्य येईल; असा आशावाद आहे आणि हा आशावाद खरा ठरावा यासाठी तुमच्याकडे प्रार्थना.
बापू, लोक घाई गडबडीत विसरतील ही थोडं कधी तुम्हाला पण अस नव्हे की तुमचं कर्तुत्व वाया गेल, अस नव्हे की आम्ही कधीच तुम्हाला आठवणार नाहीत. येते कधी कधी निराशा, जातो आम्ही चुकीच्या आणि सोप्या मार्गाने. पण प्रयत्न चालू आहेत. या ना त्या मार्गाने तुमच्या स्वप्नातील सुराज्य निर्माण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
तुम्हाला आणि तुमच्या कर्तुत्वाला आम्हा सर्वांचा प्रणाम.
गांधी जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

No comments:
Post a Comment