Sunday, August 28, 2011

विजय अण्णांचा .. विजय लोकशाहीचा !

जगातील सर्वात मोठी लोकशाही, गेली कित्येक वर्षे शुभ्र कपडे घातलेल्या काही गुंडांच्या हातामध्ये आणि प्रचंड पैश्याच्या दलदलीमध्ये फसलेली होती . या लोकशाहीचे धडे आम्ही अगदी शाळेपासून शिकत आलो, स्वातंत्र्य - समता -बंधुत्व हे पुस्तकातील शब्द अपवादानेच बाहेरच्या जगात बघायला मिळायचे, राजेशाही गेली आणि लोकशाही आली असेच वाटायचे कारण पहिले राजघराणे राज्य करायचे आणि नंतर राजकीय घराणे राज्य करू लागले. मोठे घराणे, प्रचंड पैसा, मुबलक मनुष्यबळ आणि आपल्या दादागिरीने समाज मनावर असलेली दहशत यामुळे खऱ्या लोकशाहीची फळे कित्येक वर्षे चाखायला मिळालीच नव्हती. नाही म्हणता निवडणुकीपुरता आमचा मतदार हा मतदार राजा बनायचा पण हाच राजा पुढील पाच वर्षे याच पुढाऱ्यांच्या दारावर चपला घासत फिरायचा.

निवडणुकांना युद्धाचे स्वरूप प्राप्त झाले, साम, दाम, दंड, भेद यांचा उपयोग सर्रास होऊ लागला, या मध्ये रोजीरोटी साठी धडपडत असणारा आमचा सामान्य भारतीय नागरिक बिचारा होरपळून निघाला. मध्यमवर्गीयांनी नेहमीप्रमाणे शांत राहणेच पसंत केले आणि गर्भ श्रीमंत लोकांना तर या लोकशाहीशी कधी देनेघेनेच नव्हते. शासन-सरकार त्यांच्या दाराशी उभे. अशा परिस्थितीत भारतीय नागरिक आणि भारतीय लोकशाही यांच्या मध्ये फार मोठा दुरावा निर्माण झाला होता.

सुदैवाने जगातील सर्वात जास्त तरुण आमच्या या देशामध्ये आहेत पण याच देशाचे दुर्दैव हे कि हा सगळा तरुण वर्ग इथल्या राजकीय व्यवस्थेला कंटाळला, भारत - भारतीय समाज, भारतीय लोकशाही यांपासून तो कित्येक दूर ढकलला गेला, परदेशा मध्ये जाऊन नौकरी करू लागला, इथे काहीच बदलणार नाही या भावनेने इतर देशाची स्तुतिसुमने गाऊ लागला, पण कुठे तरी या देशाविषयीची तळमळ त्याच्या आत होती.. शेवटी तरुणाईची जात ती कित्ती काळ शांत राहणार फ़क़्त एका ठिणगीची गरज होती.

तीच ठिणगी पडली जेव्हा भ्रष्टाचाराने कळस गाठला, महागाई - बेरोजगारी ने होरपळणारा तरुण अण्णा हजारे या ७४ वर्षीय सामान्य भारतीयामागे उभा राहिला. त्यांनी केलेल्या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. राळेगणसिद्धी सारख्या छोट्या खेड्यात राहणारे अण्णा देशाचे दुसरे गांधी बनले आणि एकविसाव्या शतकात गांधींच्या विचारांची टोपी मस्तकावर घेऊन, हाती तिरंगा आणि वंदे मातरम च्या जयघोषात हा तरुण रस्त्यावर आला. या देशातील सर्व रस्ते या तरुणाईने फुलून गेले, कुठेही एकही दगड न फेकता, पूर्ण अहिंसक मार्गाने हे आंदोलन १२ दिवस चालले. सबंध जगासमोर एक आदर्शच निर्माण झाला, गांधी द्वेषाने भरलेली डोकी गांधी टोपी घालून मिरवतानाचा क्षण तर खरोखरच ऐतिहासिक होता. इतिहासात वाचलेली आणि सिनेमात बघितलेली गांधीगिरी सर्वांनी प्रत्यक्ष अनुभवली.

सामान्य माणसांच्या प्रश्नावर उदासीन असणारे सरकार जागे झाले,पण झोपण्याचे सोंग काही केल्या जात नव्हते. कित्येक वर्षांनी लोकशाही ची सूत्रे सामान्य माणसाच्या हाती आली होती. लोकांनी लोकांसाठी, लोकांच्या द्वारे चालवण्यात येणारी व्यवस्था म्हणजे लोकशाही हे लवकरच सर्वांच्या ध्यानी आले, सरकार - विरोधी पक्ष खडबडून जागे झाले, लोकभावनेपुढे सोंगही उतरले.

संसदेमध्ये लोकांचे प्रश्न चर्चेला आले, पहिल्यांदाच तमाम देश डोळे लाऊन संसदेचे कामकाज पाहत होता आणि त्याचा लोकशाहीवरचा विश्वास हि परत जागृत झाला होता. आमचे प्रश्न याच व्यवस्थेतून सोडवले जाऊ शकतात यावर कधी विश्वास न ठेवणारे देखील डोळे फाडून हे सर्व काही पाहत होते, जिवंत लोकशाहीचं उदाहरण सबंध जगासमोर आले. लोकांच्या निगडीत प्रश्नावर संसदेने शिक्कामोर्तब केले आणि लोकशाहीचा विजय झाला.

या आंदोलनाने आमची लोकशाही किंवा घटना कमजोर झाली नसून भरकटलेल्या तरुणाईला परत बाबासाहेबांनी दिलेल्या या घटनात्मक व्यवस्थेकडे नेण्याचे कार्य अण्णांनी केले, गांधींनी दाखवलेला मार्ग केवळ पुस्तकी नसून तो प्रत्य्काशातही कसा यशस्वी होऊ शकतो याचा देमोच आजच्या आमच्या पिढीला मिळाला. आणि लोकशाही मध्ये जो पर्यंत लोकांचा सहभाग नसतो तो पर्यंत त्यांचे प्रश्न सुटणार नाहीत हे हि पुन्हा ठळकपणे सर्वांसमोर आले त्या बद्दल अण्णा तुमचे कोटी कोटी धन्यवाद.

भारतीयांचा विजय असो.. भारतीय लोकशाहीचा विजय असो !!

अमोल सुरोशे (नांदापूरकर)


Wednesday, August 24, 2011

जिजाऊ.कॉम तर्फे ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप कार्यक्रम.

परभणी पासून साधारण २२ किलोमीटर असलेले गाव कमलापूर,किमान २००० लोकसंख्या असणारे हे गाव, इयत्ता सातवी पर्यंत शाळा. गाव तसे शहरापासून दूर नाही, पण रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे सहसा जिल्हा परिषदेचे शिक्षक इकडे बदली करून घेण्यास फारसे उत्सुक नसतात. आड वळणाच्या रस्त्याने गावात प्रवेश केल्या केल्या एकदम साधी - सरळ माणसे तुम्हाला दिसतात. गाव तसे देशमुखी, पण इथे उसतोड कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. उसाच्या सिझन मध्ये हे लोक गाव सोडून कामाच्या शोधात इतर जिल्ह्याला जातात ह्यामुळे त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचे पुरते हाल व्हायचे. गावातील शिक्षक, जाणते नागरिक ह्यांच्या अथक प्रयत्नामुळे आत्ता हे कामगार, मजूर लोक आपली मुले गावातच त्यांच्या इतर नातेवाईकांकडे ठेवून कामाला जातात त्यामुळे निदान त्यांच्या शिक्षणात कुठलाही खंड पडत नाही. मजूर / कामगारांची मुले असली तरी हि ह्यांची जिद्द फार मोठी, कोणाला इथे मोठा होऊन डॉक्टर बनायचे तर कोणाला वकील, कोणी शिक्षक बनू इच्छितो तर कोणी अभियंता प्रत्येकाची स्वप्ने आहेत, प्रत्येकाकडे जिद्द आहे. शहरातील कुठल्याही मुलापेक्षा यांच्या कडे बुद्धिमत्ता कमी नाहीये गरज ती फ़क़्त चांगल्या मार्गदर्शनाची, चांगल्या शिक्षणाची आणि चांगल्या शैक्षणिक वातावरणाची.

अनंत अडचणींना समोर जात ह्या मुलांनी आपले शिक्षण अव्याहतपणे चालू ठेवले. त्यांच्या याच प्रयत्नांना प्रोत्साहित करण्यासाठी, त्यांच्या प्रयत्नांना एक छोटासा हातभार लावण्यास्ठी जिजाऊ.कॉम ची टीम या गावात पोहोचली. जिजाऊ.कॉम च्या "राष्ट्रमाता जिजाऊ ग्रामीण शिक्षण योजने" अंतर्गत १० गरजू, हुशार आणि होतकरू विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. त्यांच्या शिक्षणाला मदत म्हणून त्यांना शालेय गणवेश, बूट, सॉक्स, वह्या, पेन, कंपास, मराठी-इंग्लिश डीक्षनरी इ. चे वाटप करण्यात आले. गेली कित्येक वर्षे आपल्या छोट्याश्या खेड्यातच वाढणारी हि मुले ह्या सर्व गोष्टींनी हरखून गेली, त्यांच्यासाठी आणि त्या गावासाठी हि गोष्ट नवीच आणि नवलाईची.

कोणीतरी आपल्या पाठीशी आहे, कोणी तरी आपल्या प्रयत्नांचे कौतुक करणारे आहे हे बघून हि मुलेही अतिशय खुश होती. ह्या शाळेचे भाग्यच म्हणावे लागेल कारण खूप चांगला शिक्षक वृंद इथे लाभला. या शाळेतील दीपक घुसळे सर आणि मदन कदम सर यांच्या नव-नवीन कल्पनांनी येथील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाला, या शाळेचे आणि गावाचे वैशिष्ट्य म्हणजे या गावात पारधी समजा मोठ्या प्रमाणावर आहे, जन्मताच ज्यांच्याकडे सर्व समाज शंकेने बघतो असा अतिशय उपेक्षित समाज या गावात आढळतो. धड मराठी हि बोलता येत नसणारी हि मुले, त्यांच्या राहणीमानामुळे इतर मुलापेक्षा कायम वेगळी दिसणारी हि मुले कधी या सर्वांमध्ये एकरूप झाली हे गावालाही कळले नाही, या मध्ये या दोन शिक्षकांचे अथक परिश्रम असून त्यांची काही तरी करण्याची तळमळ आहे.

असे शिक्षक, अशी शाळा, असे गाव आणि असे आमचे विद्यार्थी असल्यामुळे जिजाऊ.कॉम ची टीम हि या गावी पोचली, तळागळातून कार्य करत असतांना अशा शाळेवर हा छोटासा कार्यक्रम घेणे म्हणजे खरोखरच आमचे महत भाग्यच.

जिजाऊ.कॉम तर्फे सर्व शिक्षकांना, गावकर्यांना आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्वल भवितव्यासाठी खूप खूप शुभेच्छा !!!

राष्ट्रानिर्मानाचे हे कार्य अखंडपणे चालू राहो हीच आई जिजाऊ चरणी प्रार्थना.



जय जिजाऊ - जय शिवराय
कार्यकर्ते जिजाऊ.कॉम.

Monday, August 15, 2011

They can't go on looting my nation

I was some days before not so positive about Jan Lokpal movement. Because personally I didn't like the way things were happening and democracy was made to act. I didn't like the candle lightening just for craze (and not vote at all!) and someone asking govt. to do what he says. Also I didn't like media and people looking at this issue as the only issue of national interest and everything else is good and okay. I didn't like the media staying calm on other issues like farmers suicides, poverty and many others and just en-cashing this TRP-full drama. But I now have understood why they needed to do it this way. I still don't like some of the above stated issues, but yes I would love to see A STRONG lokpal/Janlokpal bill coming into existence to eradicate the corruption and also to show every political party that they can't go on looting my nation and we still exist.

Also I would like to request my friends who are concerned about change in Constitution. Nor this or any other government has followed what Dr. Ambedkar had said. So let's not worry about that. Our democratic and secular values are still strong and we shall strive to keep them strong. We should also take care that no communal organizations and political parties make a use of this issue for political benefits. But let's think twice and be on right side NOW.

Otherwise, our situation will be like :

"First they (Nazi) came for the communists,  and I didn't speak out because I wasn't a communist. Then they came for the trade unionists,  and I didn't speak out because I wasn't a trade unionist. Then they came for the Jews, and I didn't speak out because I wasn't a Jew. Then they came for me  and there was no one left to speak out for me."  - Martin Niemöller.

Sunday, August 14, 2011

भारतीय स्वातंत्र्याचा शोध!


झा चे अयशस्वी 'आरक्षण' आणि यशस्वी 'मनिरक्षण'

खूप चर्चा आणि वादळ उठवले आरक्षण या चित्रपटाने. खरतर त्या चित्रपटाची तितकी लायकी नाही. 'कला' वगैरे जी मला कळत नाही :( सोडली तर चित्रपट भरकटलेला आणि ताळमेळ नसलेला असा फसलेलाच प्रयोग आहे. चित्रपट खरे तर आरक्षण या विषयावर नाहीच! चित्रपटाचा खरा विषय शिक्षणाचा दर्जा असे आहे. पण बेरकी 'झा' साहेबांनी चित्रपटला आरक्षण नाव देऊन उगाच काही माकडांच्या हातात कोलीते दिली आणि उगाच काही चांगल्या लोकांना चिंतेत टाकले. 'माकड' आणि 'चांगली लोके' या मुळे की कारण चित्रपटाला विरोध करणाऱ्या काही जणांचा विरोध हा फक्त राजकीय हेतूने प्रेरित आणि काही जणांचा चांगल्या आणि सामजिक हेतूने प्रेरीत होता. जर आरक्षण चित्रपटाचा मूळ गाभाच नसल्याने त्याला आरक्षण नाव देणे आणि फुकटात प्रसिद्धी मिळवणे हे सगळे ठरवून होते असे वाटते. आणि कदाचित चित्रपट विरोधाला उत्तर न देणे आणि तो त्यांना दाखवण्यास नकार देणे हे ही एक व्यावसायिक समीकरण. आता भीती याचीच उद्या कुणी ही काही ज्वलंत विषय उचलून त्यावर चित्रपट काढायला उठेल. आणि सगळ्यात मोठी भीती याची की त्या विषयाचे गांभीर्य नसणारींनी ते करावे. मराठी चित्रपटांमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर काही चित्रपट आले, विषयाचा बराच योग्य गाभा निर्मिती प्रक्रियेतील लोकांना कळला होता असे वाटते. तसे या आरक्षण या चित्रपटात होताच नाही (जरी आरक्षण ह्या चित्रपटाचा विषय नसला तरी). चित्रपटात आरक्षणाचा संदर्भ आहे पण त्याला उलट २ नायकांचे समर्थनच आहे, पण ते ही अमिताभ बच्चन च्या बाबतीत चांगले दाखवता आले असते. एकंदर चित्रपट खिचडी आहे. Looks naming it as Aarakshan is just a commercial strategy, but too cheap.

Tuesday, August 9, 2011

गोळ्या झाडताना आणि त्या झाडण्याचे आदेश देताना यांना बाप कसा आठवला नाही

माज चढलाय शासनाला. केंद्रात आणि राज्यात ही. पुन्हा परकीयांचे राज्य आले असाच वाटत आहे. नसता आपल्याच मायबाप शेतकऱ्यांवर गोळ्या झाडताना आणि त्या झाडण्याचे आदेश देताना यांना बाप कसा आठवला नाही. बहुजन आणि शेतकऱ्यांच सरकार म्हणून घेता त्याची तरी लाज बाळगायला हवी होती. ज्यांना आपला म्हणाव त्यानीचगहाण ठेवली आहे त्यांच्या कडून कसल्या प्रगतीची, पुरोगामी विचारांची अपेक्षा. राजीनामे द्या सगळे आता. आणि याद राखा पुन्हा स्वतःला शेतकऱ्याची औलाद आणि सरकार म्हटलात तर. तशी ही मातीच्या लेकरांनी तुम्हा सगळ्यांना मातीत घालण्याची वेळ आलीच आहे.

सत्तेचा माज! पण महाराष्ट्रातील जनता पुन्हा यांच्याच लोटांगण घेईल असे वाटते. आज पर्यंत कोंग्रेस चे सरकार पुरोगामी वाटायचे. यांच्या शिवाय पर्याय नाही असे वाटायचे. पण आपल्याच शेतकऱ्याचा जीव घेण्याची ही हरामखोरी विश्वास घात करून गेली. पुन्हा जोडीला षंढ विरोधी पक्ष. आता का जनतेनेच निवडणुकांच्या रिंगणात उतरायचे?

Sunday, August 7, 2011

जाती व्यवस्था उध्वस्त करताना तिचे सर्वांगाने आकलन असणे आवश्यक आहे

जाती व्यवस्था उध्वस्त करताना तिचे सर्वांगाने आकलन असणे आवश्यक आहे : जाती व्यवस्थेच्या विरुद्ध लढाईत त्या व्यास्थेचे मूळ, तिचे संगोपन आणि वाटचाल कशी झाली हे जाणून घेणे खूप महत्वाचे. म्हणजे जाती व्यवस्था ना रंगावरून ठरली, ना फक्त संपती आणि व्यवसायावरून. तिच मूळ मुख्यतः स्वार्थात आहे. एखादा व्यवसाय एका कुटुंबाला आवडला आणि मग आपली मक्तेदारी मोडून निघू नये म्हणून इतर जातींवर तो न करण्याचे बंधन लादले गेले. मुख्यातः ह्या निगेटिव्ह राईट प्रकारच्या व्यवस्था निर्मितीत उच्चवर्णीय म्हणवल्या जाणाऱ्या घाकांचा पुढाकार होता आणि त्या टिकून ठेवण्यासाठी अजून ही आहे. आता जाती निर्मूलन म्हणजे, माझ्या मते तरी, ही मक्तेदारीच मोडून काढणे. आणि आता पर्यंतच्या झालेल्या सामाजिक असमतेला नष्ट करणे आणि समाजातील काही घटकांचा हरवलेला किंवा काढून घेतलेला आदर आणि आत्मविश्वास परत देणे हे ही जातीव्यास्था निर्मुलानातील काही महत्वाचे मुद्दे. पण हे करतांना इतर कोणत्याही जातीतील लोकांचा द्वेष करणे वा सर्रास जातीय/वर्गीय विरोध दर्शवणे जाती निर्मूलनाच्या कार्यात बधाच आणेल आणि आणत ही आहे. The essence of Caste system eradication is in bringing equality, not by hatred, unnecessary-violence (do it only when there is no other option than violence) but by strategic moves using policies, practices and mutual co-operation for betterment of life not just for a society and group of people but for for the mankind.

Saturday, August 6, 2011

कम नशिबी शेतकऱ्याची कुंडली

अनेक कम नशिबी शेतकऱ्यांची कुंडली कदाचित अशी असावी. लहानपणी नशिबी ढोरं,नंतर नांगर आणि मग थोड मोठं झाल की खत आणि मग दुष्टचक्राची सुरुवात.


(प्रेरणा राजेंद्र देशमुखांची (http://myblog-prahaar.blogspot.com/) एक फेसबुक पोष्ट)


जाता जाता: कुंडल्या बनत कुठे ही असल्या तरी रेखाटल्या मात्र कागदावरच असतात. आणि कागद जाळणे जास्त कठीण नसते. इतर आणि कुंडलीच्या कागदात फरक इतकाच की इतर कागद जाळायला काडीची पेटी ही बस असते. पण इथे मात्र मशालीच हव्या असतात- बदलाच्या आणि धाडसाच्या.

Thursday, August 4, 2011

आता मात्र मशाली पेटवायलाच हव्यात

पाऊस पडलाय आणि सगळीकडे हिरवळ दिसू लागली
उपयोगी आणि उपद्रवी सगळीच झाडे आणि वेली अगदीच खुश आहेत
प्रत्येक सकाळ प्रसन्नच असते आजकाल
नजर फिरवा तिकडे चमकणारी काय म्हणतात त्याला ती 'फ्रेश' हिरवळ
पण संध्याकाळ झाली की अंधार ही आजकाल तितकाच गडद्द असतो
त्यातच विजा चमकायला लागल्या की सगळं काही अजूनच भीती वाटावी इतकं आक्राळ विक्राळ होतं
कदाचित हाच भुलावा असावा
आता मात्र मशाली पेटवायलाच हव्यात

Wednesday, August 3, 2011

They said let's increment your salaries 10 fold

They told us it's gonna change the India. We believed in them. They said let's urbanize everything. We thought they are talking about infrastructure. They said let's increment your salaries 10 fold. We thought it's gonna make us very rich. Later they said you will need to leave your homes and come to cities as we can't urbanize so fast being busy with current cities. We believed them and moved in. Seeing us move our neighbors moved. Seeing everyone moving our labours moved. And nearly a lot of people moved in cities to find out heavy-cost-living not affordable with the 10 fold salaries. Tiny little spaces to hide. Overloaded transport system. Rising costs caused because of our own salaries and the derived reasons. No infrastructure which they promised and were busy with. We found ourselves fighting for daily living and poorer than before. We thought of going back and found we have imbalanced the complete equilibrium. And we are told to prepare PPTs, audit someones calculations. Some do better job of automating their process which anyway in turn are consumed by us only and many of which we never needed. We came believed in them and participated with enthusiasm, but now we are forced to be here, do what they tell. They live lavish life and we serve them pizzas.