Sunday, June 5, 2011

आज ही छत्रपती आम्हा सर्वांच्या ह्रिदय सिंहासनावर राज्य करतात आणि येणारी लाखो वर्षे करत राहतील!


आज काही शतकांपूर्वी मराठी साम्राज्याला मनाने आणि कर्तुत्वाने आधीच छत्रपती असलेला राजा, विधिवत छत्रपती म्हणून मिळाला. आजच्या दिनाच तसं अप्रूप खूप मोठ्ठ. कारण राजेपद येऊनही कधीच महाराजांनी सामान्य माणसाला दूर केले नाही. कदाचित हे राजेपण राष्ट्रासाठी सर्व काही कधीच अर्पण केलेल्या छत्रपती साठी निव्वळ एक विधी होता. पण तो विधी ही महाराजांनी असा केला की प्रत्येकाचे डोळे दिपले. जन सामान्यांनी महाराजांना कधीच छत्रपती घोषित केले होते, कारण ते होतेच. गोरगरीब जनतेला, जुलामांना कांटाळलेल्या नागरिकांना रक्षेचेच नव्हे तर मायेचे छत्र धरले, प्रसंगी स्वतः ऊन-पाऊस सहन करून. खऱ्या अर्थाने आमचा शिवबा कधीच छत्रपती झालेला होता. विधींनी आज त्यांना छत्रपती म्हणून मान्य केले. नव्या शकाची सुरवात झाली. जिजाऊ साहेबाच्या डोळ्यासमोर महाराज आजच्या दिनी विधिवत छत्रपती झाले. आज ही छत्रपती आम्हा सर्वांच्या ह्रिदय सिंहासनावर राज्य करतात आणि येणारी लाखो वर्षे करत राहतील! 



प्रौढ प्रताप पुरंदर गौब्राह्मन प्रतिपालक क्षत्रीय कुलावतंस सिन्हासनाधीस्वर राजाधिराज महाराज श्रीमंत श्री शिवाजी महाराज की जय

 आणि खऱ्या अर्थाने 

  प्रौढ प्रताप पुरंदर बहुजन प्रतिपालक क्षत्रिय कुलावतांश छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय


सर्वांना शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 

[आजच्या राज्यकर्त्यांना अस छत्रपतीपद कळाल तर खूप छान होईल]    

जय जिजाऊ                                                                              जय शिवराय.

No comments:

Post a Comment