कालच्या वर्तमान पत्रातील ही बातमी खूप आवडली. बदलाचा नवा चेहरा हा असा हवा आणि हा चेहरा सर्वपरिचित होवून समाजाच्या प्रत्येक थराला हाच चेहरा मिळावा. अजून काय हवं होत आपल्या महापुरुषांना...
--
दलित उद्योजकांचे भारतीय उद्योग जगतात पदार्पण
- इतरांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी
- दलित इंडियन चेम्बर्स ऑफ कॉर्मस
- अँड इंडस्ट्रीजच्या मुंबई शाखेची स्थापना
एकेकाळी ‘दलित भांडवलवाद’ हा विषय सामाजिक-आर्थिक चर्चेच्या दृष्टीने खिजगणतीत नव्हता. काळ बदलला. काळानुसार सामाजिक मानसिकताही व्यापक होत नवोन्मेषी विचारसरणी रुजतगेली आणि अखेरीस दलित समाजातील शिकल्या सवरलेल्या लोकांनीच पुढाकार घेऊन ‘दलित इंडियन चेम्बर्स ऑफ कॉर्मस अँड इंडस्ट्रीज’ची (डीआयसीसीआय) स्थापना करून भारतीय उद्योगजगतात मोठय़ा आत्मविश्वासाने आणि निर्धाराने पाऊल टाकले. एका अर्थाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेले स्वप्न साकार होत आहे.
भारताची आर्थिक राजधानी आणि अनेकांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करणारी महानगरी म्हणून ओळखल्या जाणार्या मुंबईत शनिवारी दलित उद्योजकांनी एकत्र येऊन ‘डीआयसीसीआय’ चीस्थापना केली. केवळ एक उद्योजकांचे संमेलन किंवा एखाद्या औद्योगिक चेंबरच्या नव्या शाखेचे उदघाटन, एवढीच या घटनेची व्याप्ती नाही, तर याला एक सामाजिक आयाम आहे,समाजव्यवस्थेताली बदलाचा! कारण ही संस्था म्हणजे, केवळ आणखी एक औद्योगिक चेंबर नाही, तर देशाच्या समाजव्यवस्थेतील सर्वात वंचित घटकाने देश चालविणार्या कॉर्पोरेट क्षेत्रातकेलेली ही एन्ट्री आहे.
क्रांतीकारी अशा या योजनेबाबत माहिती देताना डिक्कीचे अध्यक्ष मिलिंद कांबळे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, दलित समाजाच्या उत्थानासाठी उद्योगधंदे किंवा भरीव काही आपणकरणार की नाही, असा सवाल पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी उपस्थित केल्यानंतर आम्ही एक अँक्शन प्लॅन तयार केला. त्यानुसार, डिक्कीची स्थापना करत दलित समाजाला प्राधान्यमिळण्यासाठी आम्ही काम सुरू केले.
चेंबरच्या कामाची सुरुवात केल्यानंतर, प्रथम पश्चिम महाराष्ट्रात विशेषत: सातारा, सांगली, कोल्हापूर येथील शाखेची स्थापना केली. परंतु, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्यानेस्वाभाविकपणे आम्ही मुंबईतही नुकतीच शाखा सुरू केली. कॉर्पोरेट क्षेत्राचा मानबिंदू असणार्या द ताज महल हॉटेलच्या रुफटॉपवर एका आलीशान कार्यक्रमात आम्ही चेंबरच्या मुंबई शाखेचेउदघाटन केले. दलित समाजाचे आणि यशस्वी उद्योजक म्हणून गणले जाणारे देशभरातील एकूण 1 हजार उद्योजक या कार्यक्रमाला उपस्थित होते. पाच लाखांहून अधिक खर्च झालेल्या याबैठकीसाठी मुंबई शेअर बाजाराचे अनेक उच्चपदाधिकारी आवर्जून उपस्थित होते. या सर्वांनी या उपक्रमाचे तोंड भरून कौतुक केले. र्मसिडिज, बीएमडब्ल्यू, ऑडी अशा आलिशान गाड्यांनीताजमहल हॉटेलचा परिसर फुलून गेला होता. या ही शान गाड्यांची, र्शीमंतीची नव्हती, तर बदलाच्या एका नव्या पर्वाची होती, असे कांबळे यांनी अभिमानाने सांगितले.
आजवर आम्ही रोजगाराच्या शोधातील लोक होतो, पण आम्ही आता जगाला दाखवून दिले आहे की, आम्हीही रोजगार निर्मिती करू शकतो..कांबळे म्हणाले. त्यांच्या या विधानाची साक्ष याकार्यक्रमातील उपस्थितांकडून आणि त्यांच्या वक्तव्यांवरून पटत होती.
550 कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या दास ऑफशोअरचे सर्वेसर्वा अशोक खाडे म्हणाले की, आता भविष्याचा वेध घ्यायचा आहे, भविष्य आपले आहे. तर, पेट्रोनेट इंडिया लि. चे माजी मुख्यकार्यकारी अधिकारी आनंद तेलतुंबडे म्हणाले की, काही मोजके दलित उद्योजक आज या निर्मितीचा आनंद घेत आहेत, अर्थात त्यांना जनसर्मथन मिळणेही आवश्यक आहे.
शोषित, वंचित असल्याने पिढय़ानपिढय़ा पाठीवर वागवलेल्या ओझ्याची शिदोरी..भाळी नाही रे वर्गात वावरण्याची सामाजिक शिक्षा..उपरा, उचल्या अशी संभावना वाट्याला आलेल्यांनी प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा, असा आर्थिक उद्धाराचा नवा प्रपंच सिद्ध केला आहे. अगदी डॉ. बाबासाहेबांना अभिप्रेत असलेल्या उन्नतीच्या मार्गाने!
सध्या डिक्कीचे राज्यात 400 तर देशात एकूण एक हजार सदस्य आहेत. सातारा, सांगली, कोल्हापूर आणि मुंबईमध्ये शाखा सुरू झाल्या आहेत. लवकरच पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद येथेशाखा सुरू होणार आहेत. तर त्यापाठोपाठ दिल्ली, पंजाब, गुजरात, लुधियानासह देशात 50 ठिकाणी चेंबरच्या शाखा सुरू करण्याचा मानस मिलिंद कांबळे यांनी व्यक्त केला.
आम्हाला कनेक्शन हवेत, कन्सेशन्स नकोत !
मिलिंद कांबळे,
अध्यक्ष, डिक्की
सौजन्य: लोकमत आणि मयूर चिटणीस

No comments:
Post a Comment