
महाराष्ट्राच्या मातीत आणि या मातीतल्या माणसांच्या मनात आणि आचरणात ज्यानं स्वाभिमान आणि स्वातंत्र्य पेरलं, अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात ते स्वाभिमान आणि स्वातंत्र्याच बीज ज्या आईने पेरलं, ती आई म्हणजे जिजाऊसाहेब.त्यांना फक्त शिवबांच्याच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राच्या आई म्हणाव लागेल, म्हणूनच राष्ट्रमाता आणि राजमाता हे नाव जिजाऊ साहेबांना अगदी शोभते. काही शतकांनंतर सुद्धा छत्रपतींचे विचार किती सद्य परिस्थितीला साजेशे वाटतात. सामाजिक समता, मानवी हक्क, स्त्रियांचा हक्क, सर्वांसाठी समान न्याय आणि अनेक मानवी मुल्यांचा आदर करणारे विचार, जे छत्रपतींच्या आचरणात होते, आपण म्हणू शकतो या आईनेच त्यांना दिले; त्यासाठीचे वातावरण आणि संस्कार जिजाऊ साहेबांनी शिवरायांना दिले. हा सह्याद्रीचा राजा, सहयाद्री सारखाच कणखर आणि अंगाई सारखा दयाळू व मायाळू या आईच्या पदराखालीच झाला. पुढे छत्रपतींच बाळ, बाळराजे, धर्मवीर संभाजी महाराज ही याच कुशीत आणि संस्कारात वाढले.
स्वाभिमान आणि स्वातंत्र्याची साक्षात भवानी, एका सुर्याइतक्या तेजस्वी आणि सहयाद्री सारख्या कणखर आणि खंबीर असलेल्या युगपुरुषाची माता, धर्मवीर आणि ज्ञानवीर छत्रपती संभाजी राजांची आजी आणि आऊ असलेल्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब यांच्या जीवनावर एक चित्रपट येत आहे "राजमाता जिजाऊ". महाराष्ट्रातील प्रत्येक घरात मॉं जिजाऊ यांचे विचार, संस्कार रुजायला पाहिजेत नव्हे ती आजच्या काळाची गरजच आहे म्हणूनच जिजाऊ.कॉम आपणा सर्व मराठी जनतेला आवाहन करते आहे कि कृपया हा चित्रपट थेटर मध्ये सहकुटुंब जाऊन बघावा.
ऐतिहासिक विषयावरील भव्य अशा या कलाकृतीस जिजाऊ.कॉम तर्फे हार्दिक शुभेच्छा !
जय जिजाऊ .. जय शिवराय
www.jijau.com
2 comments:
अरे वा... हा चित्रपट येतोय हे ठावूक नव्हते... हल्ली मराठी चित्रपट जाहिरात व्यवस्थित करतात आणि २-३ महिने आधीपासून चित्रपटाबद्दल माहिती कळू लागते.. इथे ३ दिवस आधी कळतंय..... तरी आनंदच आहे... :)
छान
Post a Comment