Tuesday, October 5, 2010

"साहेब", कसे आहात तुम्ही ?


दोन क्षेत्रातील दोन दिग्गज, लोकांनी ज्यांना देवपण दिले.. एक दक्षिणात्य चित्रपट श्रुष्टीचा नायक.. ज्याला दक्षिणे मध्ये देव मानतात .. आणि एक मराठी मनाचा राजा .. ज्याच्या एका शब्दाखातर शिवसैनिक आपली जान पण कुर्बान करायचा .. आशा या दोन दिग्गजांची काल भेट झाली, तब्बल १४ वर्षांनी झालेली हि भेट होती.. आणि भेटताच या सुपरस्टार पण अत्यंत नम्र अशा महानायाकाने बाळासाहेबांना विचारले "साहेब" कसे आहात तुम्ही ? खरोखरच म्हणतात न जेव्हा दोन मोठी मानसभेटतात तेव्हा केवळ २-३ शब्द देखील पुरे पडतात त्यांच्यातला मोठे पणा जाणवायला.

दक्षिणात्य चित्रपट श्रुष्टीवर अधिराज्य गाजवणार्या या महा नायकाने चक्क मराठीतून वार्ताहरांशी बातचीत केली, जन्माने मराठी असणार्या या महानायाकाने दाखवून दिले त्याची या मातीशी असलेली नाळ अजूनही घट्ट आहे ! एवढेच नव्हे तर त्याने मराठी चित्रपटात काम करण्याची इच्छा देखील व्यक्त केली.. आणि एकीकडे आम्ही १-२ वर्षे काय उच्चभ्रू समाजामध्ये राहून आपली भाषा.. आपली संस्कृती विसरतो.

खरच खूप काही शिकण्यासारखा असते ह्या मोठ्या लोकांकडून .. या दोन महान पण तरीही आपले पाय जमिनीवरच असणऱ्या दिग्गजांना उदंड आयुष्य , यश लाभो हीच आई भवानी चरणी प्रार्थना !

जय महाराष्ट्र
अमोल सुरोशे

2 comments:

Abhishek Zambre said...

"एकीकडे आम्ही १-२ वर्षे काय उच्चभ्रू समाजामध्ये राहून आपली भाषा.. आपली संस्कृती विसरतो."

खरच...

Anonymous said...

sar aka malach mani

Post a Comment