Tuesday, September 21, 2010

डॉ. अभय बंग यांच्या विषयी एक खूप छान लेख

ज्ञानयोगी
अनिल शिदोरे ,बुधवार, २२ सप्टेंबर २०१०

अभयची भेट पहिल्यांदा कधी झाली ते नीटसं आठवत नाही. तीस-एक वर्षांपूर्वी
वध्र्याला एकदा जंगल जमिनीच्या प्रश्नावर आदिवासी कार्यकर्त्यांची बैठक
झाली होती. तेव्हा शरद कुलकर्णीना भेटायला तो आला असताना भेटला असावा असं
वाटतं. पण खात्री नाही. तो तेव्हा भेटण्याच्या आधी डॉ. सुखात्मे आणि डॉ.
वि. म. दांडेकरांशी वृत्तपत्रातून चर्चा करणारा, वाद घालणारा, शास्त्रीय
मांडणी करून माणसाला जगायला किमान उष्मांक किती लागतात, हे सांगणारा एक
तरूण डॉक्टर म्हणून महाराष्ट्राला आणि मला माहीत होताच. त्याच्याशी
प्रत्यक्ष भेट आणि मैत्री त्यानंतर दहा-एक वर्षांनी झाली.
आज एक सामाजिक संशोधक म्हणून, शास्त्रीय अभ्यासक म्हणून, उत्तम लेखक,
प्रभावी वक्ते असून, महाराष्ट्रभूषण म्हणून डॉ. अभय बंग यांची उभ्या
महाराष्ट्राला ओळख आहे. असे हे डॉ. अभंय बंग २३ सप्टेंबरला आपल्या वयाची
साठ वर्षे पूर्ण करत आहेत. महाराष्ट्रातल्या मोजक्या, जाणत्या आणि आदरणीय
व्यक्तींपैकी आज डॉ. अभय बंग एक असले, तरी मी मात्र आज लिहिताना ‘माझा
मित्र अभय’ याच नात्यानं लिहिणार आहे. कारण तशा भूमिकेतून लिहिलं नाही तर
मला लिहिताच येणार नाही.
अभयचा जन्म पन्नास सालचा. स्वातंत्र्य मिळून तीनच वर्षे झालेली. पं.
नेहरूंच्या नेतृत्वाखाली उभ्या देशाला उभारी आलेली आणि अभय लहान होता.
प्राथमिक शाळेत होता. तेव्हा विनोबांच्या भूदान पदयात्रेनं देशात
समाजकारणाचा नवा आयाम बसवण्याचं काम चाललेलं! अभय अगदी तरूण होता, तेव्हा
जगभर, देशात, ठिकठिकाणी संघर्षवादी तरूण आंदोलनांचा मार्ग स्वीकारत होते.
अभय चाळीस वर्षांचा होता, तेव्हा देशभरात आर्थिक सुधारणांचं ताजं, जोमदार
वारं सुटलेलं! अभयची साठी त्याही अर्थानं आपल्या सर्वाना, महाराष्ट्राला
काळाच्या एका टप्प्याची जाणीव करून देणारी!
या सर्व काळात अभयची भेट वेगवेगळ्या कारणांनी होत राहिली. काही
प्रकल्पांवर, उपक्रमांमध्ये आम्ही एकत्र कामही केलं. खूप बोललो, चर्चा
केली. एक सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे, या प्रत्येक भेटीत अभयकडे
सांगण्याजोगं काहीतरी होतंच. काहीतरी असायचंच. मग तो रोजच्या रोज भेटताना
असो किंवा सध्या भेटतो तसं चार-सहा महिन्यांनी असो. अभयकडे काहीतरी
असतंच; सांगण्याजोगं, देण्याजोगं!
अगदी परवाचीच गोष्ट पाहा. महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्याविषयी आम्ही
बोलत होतो. ‘सध्याची स्थिती अशी आहे की, सरकारनं आणीबाणी जाहीर करावी’,
असं काहीसं मी म्हटल्याबरोबर अभयनं एक उत्तम रेखीव आणि प्रखर अभ्यासू
माडंणी केली. त्या विषयातल्या खाचाखोचा सांगितल्या. तेव्हा त्याने
१८६०च्या आसपासच्या लंडनमधील सार्वजनिक स्वच्छतेविषयीच्या एका मोठय़ा
लोकचळवळीची माहिती तर दिलीच, पण तशीच चळवळ आता महाराष्ट्रात, मुंबई-
पुण्यासारख्या शहरांतही करायला हवी, असं सांगितलं. लोकांच्या चळवळीसाठी
काय करायला हवं, हेही मांडलं.
तो अवघी पाच-एक मिनिटं बोलला असेल-नसेल, पुढे कित्येक दिवस त्यानं
दाखवलेल्या दिशेनं मी शोधत राहिलो. मला त्यातून कितीतरी गोष्टी सापडल्या.
अभयचं हे मोठं वैशिष्टय़! सतत दक्ष, जिवंत असं मन आणि तत्पर, तीक्ष्ण अशी
बुद्धी! यातून अभय प्रासादिक विद्वतेचं, शहाणपणाचं दर्शन कायम देतो आणि
ही फक्त देवाची देणगी आहे, असं मला मुळीच वाटत नाही.
एखाद्या गोष्टीवर, मग तो लेख असो, भाषणाची तयारी असो किंवा एखादा अहवाल
असो, अभय जे काही कष्ट घेतो त्याला तोड नाही. पुन:पुन्हा घोटून घोटून,
तपासून, फेरफार करून तो जी अस्सल गोष्ट आपल्यासमोर ठेवतो, तो लख्ख शुद्ध
आणि तेजस्वी असा मानवी आविष्काराचा नमुना असतो. अचूक, तरीही रंजक, आकर्षक
असं स्वच्छ शहाणपण त्यातून समोर येतं. ज्ञानयोगीच तो! त्यानं स्वत:वर
ज्या पद्धतीनं काम केलं आहे, आपल्या मनाची - विचार कसा करावा याची- जी एक
शिस्त बसवली आहे, स्वत:ला जसे पैलू पाडले आहेत; त्याची कथा त्यानं एकदा
त्याच्याच अभ्यासू पद्धतीनं पुढच्या पिढीसमोर ठेवावी. खूप गुणी मुलांचं
आयुष्य बदलेल त्यानं! अर्थात हेही त्याचं संचित तो पुढच्या पिढीला
देण्याचं काम त्याच्या ‘निर्माण’मधल्या ताज्या प्रयत्नांद्वारे करतो
आहेच.
अभयचा मूळ पिंड काय, असं म्हटल्यास तो अभ्यासकाचा, संशोधकाचा आणि
द्रष्टय़ा विचारवंताचा आहे, असं मी म्हणेन. त्यानं आणि राणीनं मिळून लाखो
बालमृत्यू वाचवले असतील. जगातल्या बऱ्याच देशांनी आणि आपल्या देशातल्या
बऱ्याच राज्यांनी आता बालमृत्यू वाचविण्यासाठी हीच पद्धत अंगिकारली आहे.
कामाचा विस्तार या अर्थानं खूपच व्यापक पल्ला आज अभयने - राणीच्या आणि
शोधग्रामच्या इतर सहकाऱ्यांच्या मदतीनं - गाठला आहे. त्यावर एकदा
स्वतंत्रपणे लिहायला हवं.
मला आजही बऱ्याच वर्षांपूर्वीचं गडचिरोलीच्या जवळचं, झाडांनी आच्छादलेलं
मैदान आठवतं. एका संध्याकाळी अभय मला तिथं घेऊन गेला होता आण एका छोटय़ा
ढिगाऱ्यावर उभं राहून, ‘इथं आपण आता ‘सर्च’ हलवू’ असं म्हणाला होता. आज
मी जेव्हा जेव्हा शोधग्रामला जातो, तेव्हा मला तो प्रसंग आठवतो आणि त्या
जागेवर अभयनं आणि राणीनं जो काही सुंदर आश्रम उभा केला आहे त्याचं अप्रूप
वाटतं. शोधग्रामच्या त्या वातावरणात मला अभयचा नेटकेपणा, काटेकोरपणा,
शिस्त, कल्पकता आणि राणीचं मार्दव, सर्जनशीलता, आस्था यांचा विलक्षण संगम
झालेला दिसतो.
१९९२ च्या आसपास गडचिरोली जिल्हा दारूमुक्त व्हावा म्हणून चळवळ चालली
होती. गावागावांत बैठका चालू होत्या. आपल्या गावातून दारू हटवावी म्हणून
बायकांनी जोर लावला होता. त्या आंदोलनाचं नेतृत्वही अभयकडे होतं. तो ज्या
तन्मयतेनं, मनाचा ठाव घेत गावात लोकांशी संवाद साधायचा तो अनुभव, त्याची
ती प्रतिमा माझ्या आठवणीत अजूनही ताजी आहे. पुढे त्यानं संशोधनाचा
ज्ञानमार्ग स्वीकारला आणि त्यात खूप प्रवास केला. पण लोकांशी बोलणं,
त्यांना प्रोत्साहित करणं, संघटित करणं, लढाईला तयार करणं यातही तो खूप
वाकबगार आहे. तिथली मुलूखगिरी आणि त्यातला मोह अभयनं नंतर टाळलेला दिसतो.
आमचं महाराष्ट्रभर बालमृत्यूविषयक सर्वेक्षण चालू होतं. महाराष्ट्राच्या
वेगवेगळ्या भागांत, गावांत, वस्त्यांमध्ये जाऊन माहिती गोळा करण्याचं काम
आम्ही करत होतो. या कामाची आखणी, नियोजन अभयने अत्यंत चोख केलं होतं.
आम्हाला प्रशिक्षण दिलं होतं. प्रत्यक्ष गावात जाऊन माहिती मिळवावी,
कामाची प्रत्यक्ष पाहणी करावी म्हणून आम्ही दोघं मिरज तालुक्यातल्या एका
गावात पोहोचलो. पूर्वी सव्‍‌र्हे झालेल्या एका घराची, तिथल्या बाळाची
माहिती घ्यायला अभयने सुरुवात केली. अभय शांतपणे एक-एक प्रश्न विचारत
होता. बाळाची आई तिच्या गतीनं उत्तर सांगत होती. त्या बाळाच्या
तब्येतीविषयी चौकशी करता करता एकूणच सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा वेध
घेतला जात होता. पद्धतशीरपणे, शांतपणे, शास्त्रोक्त पद्धतीने! खूप उशीर
होत होता. पोटात भुकेनं कावळे ओरडत होते, पण तब्बल दोन तास अभयची ती
विचारपूस चालू होती. माझ्या आयुष्यात पाहिलेली सामाजिक क्षेत्रातली ती
सर्वात उत्तम मुलाखत!
त्या दिवशी मला त्याचं जे दर्शन झालं, ते मी कधीही विसरणार नाही. विसरू
शकणारच नाही. मला तो पुढय़ात बाळ ठेवून त्याच्याकडे बघणारा, गंभीर
मुद्रेचा; पण शांत, अविचल, शहाणा असा योगीच वाटत होता. ज्ञानयोगी! दोन
दशकांची खडतर तपस्या पाठीशी असताना ज्या तन्मयतेनं, एकाग्र चित्तानं तो
ज्ञानाचा शोध घेत होता, ती अवस्था फारच थोर होती. एखाद्या महान गायकाची
उत्तम गाताना असते, तशी ज्ञानी, योगी भावमुद्रा!
अभय थोर आहे, असं माझं मत आहे. मी त्याला असं म्हणणं कदाचित त्याला
आवडणार नाही. कदाचित आम्ही भेटल्यावर तो तसं म्हणेलही, पण आज मला ते
सांगू दे.
आज तो साठ वर्षांचा झाला आहे, पण त्याचा शोध संपलेला नाही. स्वत:वर काम
करणं तर त्यानं अजिबात थांबवलेलं नाही. कालपरवाच त्यानं नव्या कुठल्या
दोन गोष्टींचा शोध घेण्याचं ठरवलं आहे, ते सांगितलं. नित्य नवा विचार,
नवी प्रमेयं, नव्या पद्धती, नवी माहिती, नवं संशोधन याची तपासणी चालूच
आहे आणि ज्ञानाच्या, विचारांच्या क्षेत्रात पूर्ण रममाण होऊन त्याचा आनंद
देण्याघेण्याचं अभयचं कामही!  अभयबरोबर अनुभवलेले क्षण माझ्या आयुष्यातला
मोठा ठेवा आहे. खूपच मोठा ठेवा! कितीतरी गोष्टी मी अभयकडून शिकलो. कामाची
शिस्त, पद्धत, चिकाटी-चिवटपणा, खडतर अभ्यास, ज्ञानाचा शोध. कितीतरी
गोष्टी!
सध्या आमची क्षेत्रं खूपच वेगळी झाली आहेत. आमचा संवाद तरीही चालू आहे.
त्याला त्याविषयी कुतूहल आहे. मागे मला तो म्हटला होता, ‘अनिल, तू
राजकारणाचं नवं क्षेत्र स्वीकारलं आहेस. खूप वेगळं क्षेत्र आहे ते. त्या
राजकारणात काहीही होऊ दे बाबा, पण तू सगळ्या गोष्टी नीट लिहून ठेव.
मागाहून त्यावर लिहिता येईल.’ इथंही मला त्यानं अभ्यासच करायला सांगितला
आहे. राजकारणातले वेगवेगळे पदर समजून घ्यायला, नोंदी ठेवायला सांगितले
आहे. त्याच्या मते सारं संपतं; पण ज्ञान नाही, ज्ञानाचा शोध नाही. अगदी
राजकारणाच्या क्षेत्रातदेखील!
अभय माझा मित्र आहे हे माझं भाग्य आहे. अभय महाराष्ट्रात काम करतो,
मराठीत लिहितो ते महाराष्ट्राचं भाग्य आहे. प्रत्येकानं आपापल्या
भाग्याचं काय करायचं हे ठरवायचं असतं. तसंच महाराष्ट्रानंही ठरवायचं आहे,
अभय बंग यांच्या ज्ञानसाधनेचा उपयोग आपण कसा करावा ते!
त्याच्या साठाव्या वर्षी आमचं एवढंच मागणं आहे की, डॉ. अभय बंग यांनी
आजवर आपल्याला जे दिलं, तसं ते आणखी देत राहोत. अनेक र्वष, अनेक दशकं! आज
त्याच्या साठाव्या वाढदिवसादिवशी त्याच्या कामास आणि ज्ञानसाधनेस माझ्या
शुभेच्छा!
आज.. इतकंच!!


सौजन्य: लोकसत्ता 

Monday, September 20, 2010

८४ टक्के ग्रामीण भारत 'नेट'पासून दूर

सौजन्य : . टा.

' ई-कॉमर्स', 'ऑनलाइन शॉपिंग', 'ऑनलाइन स्टॉक ट्रेडिंग' असे शब्द महानगरी उच्चभ्रूंच्या वर्तुळांमधील संभाषणात सहजपणे वापरात येत असले तरी ज्या 'इंटरनेट'च्या माध्यमातून हे सर्व व्यवहार होतात त्याची सुतराम खबर देशाच्या ग्रामीण भागांतील तब्बल ८४ टक्के लोकसंख्येला नाही! कारण, पायाभूत सोयी अर्थात 'इन्फ्रास्ट्रक्चर'ची देशातील दारूण स्थिती! 'इन्फ्रास्ट्रक्चर'अभावी 'इंटरनेट' या जनतेपर्यंत पोहचूच शकत नाही.

' इंटरनेट अॅण्ड मोबाइल असोसिएशन ऑफ इंडिया' ('आयएएमएआय') आणि देशातील एक प्रमुख मार्केट रिसर्च कन्सल्टन्सी ऑर्गनायझेशन 'आयएमआरबी' यांनी संयुक्तपणे केलेल्या संशोधनातील हा निष्कर्ष आहे.

' आयएएमएआय'चे अध्यक्ष सुभो रॉय यांनी या पाहणीतील निष्कर्षांची माहिती देताना सांगितले की, ग्रामीण भागांतील लोक इतक्या मोठ्या प्रमाणावर 'इंटरनेट'बाबत अनभिज्ञ आहेत यावरूनच 'इंटरनेट' सेवेसाठी 'इन्फ्रास्ट्रक्चर' उभारण्याची आणि 'कॉमन सव्हिर्स सेन्टर्स' ('सीएससी') आणि 'स्टेटवाइड एरिया नेटवर्क'सारख्या ('स्वॅन') योजना राबविण्याची कशी नितांत गरज आहे, हे यावरून स्पष्ट होते.

देशभरातील ग्रामीण भागांत पायाभूत सोयींच्या बाबतीत अत्यंत दळभदी अवस्था असल्यामुळे तेथे 'इंटरनेट पेनट्रेशन' होऊ शकत नाही, हे तर स्पष्टच आहे, पण पाहणीत ज्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या त्यातील ३८ टक्के लोकांना 'इंटरनेट'ची गरजच वाटत नाही! पाहणी अहवालात म्हटले आहे: ग्रामीण लोकसंख्येतील ३१ टक्के लोकांना 'इंटरनेट अॅक्सेस पॉइंट' उपलब्ध नाहीत, २५ टक्के लोकांकडे 'इंटरनेट कनेक्शन' नाही आणि सुमारे २२ टक्के लोक तर चक्क मूलभूत 'इन्फ्रास्ट्रक्चर'पैकी एक असलेल्या 'इलेक्ट्रिसिटी'पासून, वीजपुरवठ्यापासूनच वंचित आहेत!

Saturday, September 18, 2010

इन्‍कलाब महोत्‍सव, 26, 27 व 28 सप्‍टेंबर 2010, पुणे

इन्‍कलाब महोत्‍सव 26, 27 व 28 सप्‍टेंबर 2010
मोठ्या संख्‍येने सामील व्‍हा
समाजातील अस्‍वस्‍थ युवांना नम्र आवाहन


कचराकोंडी, पिपली लाईव्‍ह, रंग दे बसंती यासारखे चित्रपट पाहून आपण व्‍यथित होतो. परंतु निश्चितपणे काय करावे हे आपल्‍याला समजत नाही. आज इन्‍कलाब महोत्‍सवाच्‍या निमित्ताने आपण पुण्‍यातील कष्‍टकरी, श्रमजिवी यांच्‍याबरोबर एकत्र येउन आपल्‍याला सर्वांना मिळून काय करता येईल याचा विचार करु. आज आपल्‍यासमोर अनेक प्रश्‍न आ वासून उभे आहेत. मागेल त्‍याला काम का मिळत नाही? रोज वाढणा-या महागाईला सरकार आळा का घालू शकत नाही? अन्‍न, वस्‍त्र, निवारा, शिक्षण व आरोग्‍य या गरजा का भागवता येत नाहीत? हे सगळे प्रश्‍न जर आपल्‍याला सोडवायचे असतील तर पुन्‍हा एकदा सर्वांना एकत्रितरीत्‍या प्रयत्‍न करावे लागतील. याकरता आपल्‍याला संघटित होण्‍याची आवश्‍यकता आहे.

सर्व समाजात आमूलाग्र बदल व्‍हावा याकरता आपल्‍या देशात अनेक प्रयत्‍न झाले व बदल घडून आले. मात्र परिवर्तन हे कायमच हळुवार गतीने व टप्‍प्‍याटप्‍प्‍याने घडून येत असते. एक अशी म्‍हण आहे,

       तुम्‍हाला वेगाने जायचे असेल तर एकटे जा,
               दूरपर्यंत जायचे असेल तर एकत्र जा
आज आपल्‍याला वेगाने दूरपर्यंतचा पल्‍ला गाठायचा आहे.

हा पल्‍ला गाठताना, आपल्‍याला सामाजिक बदल घडवायचा आहे. त्‍यासाठी आज आपल्‍या सर्वांचे  संघटित होणे गरजेचे आहे. आपण याकरता प्रयत्‍न करुन एक आदर्शव्‍यवस्‍था उभी करु शकू जी या देशाला प्रगतीच्‍या दिशेने नेईल.
28 सप्‍टेंबर हा क्रांतिवीर भगतसिंगाचा जन्‍मदिन. भगतसिंग यांनी आपल्‍या आयुष्‍यात, जग अधिक सुंदर व्‍हावे आणि त्‍या सुंदर जगात प्रत्‍येकाला जगण्‍याची समान संधी मिळावी हे क्रांतिकारी स्‍वप्‍न पाहिले व त्‍यासाठी आपले सर्वस्‍व पणास लावले. भगतसिंगासारख्‍या अनेक क्रांतिकारकांनी या स्‍वप्‍नासाठी आपले बलिदान केले पण हे स्‍वप्‍न अद्यापही पूर्ण झालेले नाही. भगतसिंगांच्‍या जन्‍मदिनाचे औचित्‍य साधून इन्‍कलाब महोत्‍सवाचे आयोजन केलेले आहे.

आम्‍ही तुम्‍हाला इन्‍कलाब महोत्‍सवात सहभागी होण्‍याचा आग्रह करत आहोत!!!


कार्यक्रम पुढील प्रमाणेः


26 सप्‍टें 2010, रविवार                विद्रोही कवी सम्‍मेलन
27 सप्‍टें 2010, सोमवार                शेतक-यांच्‍या आत्‍महत्‍येवरील माहितीपट
28 सप्‍टें 2010, मंगळवार               अभिवादन मिरवणूक
स्‍थळः श्रमिक, मंगला टॉकीजच्‍या मागे, शिवाजीनगर, पुणे
वेळः रोज सर्व कार्यक्रम दुपारी 03.00 वाजता सुरु होतील.

(कार्यक्रमात कोणाला भाग घ्यायचा असेल- कविता म्हणणे, समुहगीत म्हणणे, तर स्वागत आहे.)




संयोजकः

पुणे महानगरपालिका कामगार युनियन (मान्‍यताप्राप्‍त),
संपर्कः प्रकाश जाधव- 9923797692
               प्रकाश चव्‍हाण- 9823147394

पुणे जिल्‍हा मोलकरीण संघटना
 सपंर्कः वंदना वनगे- 9372801258

सर्व श्रमिक संघटना
 संपर्कः पी.एन. पालेकर- 9421016858

क्रांतिवीर भगतसिंग ब्रिगेड          
संपर्कः चिदानंद कसबे- 9764149629
               राम अडागळे- 9011067461

ऑल इंडिया स्‍टुडंट असोसिएशन
संपर्कः प्रशांत निकम- 9372139344

श्रमिक महिला मोर्चा
संपर्कः चंद्रभागा सपकाळ- 9763241024
              अरुणा ठाकून- 9881573716

भरारी समूह संघटना (संलग्‍न पुणे मनपा कामगार युनियन)
संपर्कः मधुकर नरसिंगे- 9766804832

भगतसिंग रहिवासी मंडळ
संपर्कः संतोष दरेकर- 9763345336

निर्माण
संपर्कः सिध्‍दार्थ प्रभुणे (शास्‍त्री) -9970005661

Monday, September 13, 2010

अपंगांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, शेवटची तारीख ३० सप्टे.

खालील माहिती येथून[http://www.nhfdc.org/upload/nhfdc/SCholarship_Scheme_2010_11.pdf] डावून्लोड पण करता येते आणि त्यात अर्जाचा नमुना सुद्धा  आहे.

सौजन्य: कपिल मोरे (ई-मेल ने )
              

         SCHOLARSHIP FOR
             STUDENTS WITH DISABILITIES
            MINISTRY OF SOCIAL JUSTICE & EMPOWERMENT
                          GOVERNMENT OF INDIA
INVITATION OF APPLICATIONS FOR THE NATIONAL SCHOLARSHIP FOR
PERSONS WITH DISABILITIES (2010-11)
Applications (in English or Hindi) are invited latest by 30th September, 2010 in
the prescribed proforma from the persons with disabilities to award the
National Scholarships for the year 2010-11 for pursuing technical and
professional courses from recognized institutions. Salient features of the
scheme are:-
     500 national scholarships will be awarded to eligible students with
      disabilities for the year 2010-11 for pursuing technical and professional
      courses from recognized institutions.
     Financial Assistance can be given for computer with editing software for
      blind/deaf graduate and post graduate students pursuing professional
      courses and for support access software for cerebral palsy students.
     Scholarship of Rs.1000/-p.m. for hostellers and Rs.700/- p.m. for day
      scholars studying in professional courses at graduation and above level,
      and Rs.700/- p.m. for hostellers and Rs.400/- p.m. for day scholars
      pursuing Diploma /certificate level professional. Course fee is
      reimbursed upto ceiling of Rs.10,000/- per year.
The eligible students with disabilities should submit their applications for
scholarship in prescribed format duly countersigned and recommended by the
head of the institution, where they are studying, so as to reach, complete in all
respects to: National Handicapped Finance and Development Corporation
(NHFDC), Red Cross Bhawan, Sector-12, Faridabad-121007 on or before
30-09-2010.
Details containing the eligibility conditions, the prescribed proforma for the
application are available on website of Ministry of Social Justice &
Empowerment, Govt. of India “www.socialjustice.nic.in”.
For further details, please visit website of NHFDC “www.nhfdc.org” or contact:
NHFDC, Red Cross Bhawan, Sector-12, Faridabad-121007. Tel no. 0129-
2226910, 2287512, 2287513 Fax-0129-2284371, e-mail-nhfdc97@gmail.com
 Applications received, other than countersigned and recommended by the
head of the institution in which the applicant is enrolled for study or after the
last date or incomplete in any respect (i.e. without requisite information or
documents), shall not be considered.

Tuesday, September 7, 2010

पोळ्या निमित्त्य हार्दिक शुभेच्छा

आपल्या कष्टाने सबंध भारत देशाचे पोट भरणाऱ्या बळीराजाचा साथीदार असलेल्या त्या "बैल जोडी" च्या पूजेचा आजचा सन.

परंपरा असलेल्या या देशामध्ये असलेला हा सन म्हणजे खरोखरच जगासमोर एक आदर्श आहे, आमच्या या देशात, महाराष्ट्रात केवळ पशु- प्राणी म्हणून नाही तर आमच्या जीवन उपयोगी येणार्यांची देवासारखी पूजा केली जाते, आणिकुटुंबातील सभासदासारखा वागवले जाते, हि संस्कृती आहे आपली. याचा सर्वांना अभिमान असला पाहिजे.

परत आपल्या बळीराजाला आणि त्यांच्या कुटुंबाला एकदा पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा !

अमोल सुरोशे नांदापूरकर

Monday, September 6, 2010

सामान्यांना भ्रष्टाचार थांबवण्याची संधी

आमचे ब्लॉगर मित्र thanthanpal परभणीकर  [http://www.thanthanpal.blogspot.com/]  यांनी पाठवलेला हा इमेल. 


भ्रष्ट्राचार मुक्त भारत !! हे स्वप्न आता दूर राहिले नाही. राष्ट्रीय भ्रष्ट्राचार-विरोधी धोरण या मथळ्या खाली आज लोकसत्तेत केंद्रीय दक्षता आयोगाने एक जाहिरात दिली आहे. केंद्रीय दक्षता आयोगाने भ्रष्ट्राचार-विरोधी राष्ट्रीय  धोरण तय्यार करण्यात पुढाकार घेतला आहे. हे शासकीय धोरण निव्वळ सरकारी होवू नये म्हणून आयोगाने सर्व हितसंबधिता कडून म्हणजेच भारतीय नागरिक, सिव्हील सोसायटी,ऑर्गनायजेशनस, खाजगी व्यवसायिक,प्रसिद्धी माध्यम, राजकीय व्यक्ती, न्यायधीश, यांच्या कडून आयोगाने या मसुदा धोरणावर जनतेचा प्रतिसाद मागितला आहे. २०/०९/२०१०
पर्यंत आयोग कडे आपली मते पोहोचणे  आवश्यक आहे. आयोगाचा पत्ता पुढील प्रमाणे आहे. ज्या भारतीय नागरिकांना देश भ्रष्ट्राचार मुक्त भारत व्हावा असे वाटत असेल त्यांनी कृपया आपली मते, सूचना  आयोग कडे आवश्य पाठवाव्यात.  ही नम्र विनंती.
                 श्री. के.  सुब्रमण्यम
                 ओ एस डी टु सीव्हीसी
                 सेन्ट्रल व्हिजिलन्स कमिशन
                 सतक्रता भवन आयएनए ;
                 नवी दिल्ली ११००२३
                 फोन : ०११-२४६५१०८५
                 e mail: subramaniam.k@nic.in



अधिक माहिती साठी येथे भेट द्या: http://cvc.nic.in/nacs26082010.htm
येथे मसुदा वाचता येईल .