वैद्यकीय शिक्षण अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्यांसाठी येत्या शैक्षणिक वर्षापासून देशभरात एकच सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) होणार आहे.
ग्रामीण भारतातील विद्यार्थ्यांना जाणून बुजून स्पर्धेतून बाद करण्या साठी INDIA च्या नोकरशाही आणि राजकारण्यांनी हि खेळी रचली आहे. . आज ग्रामीण भागात शैक्षणिक सुविधांची बोंबाबोंब आहे. बऱ्याच खेड्यात शाळात गुरुजी नाहीत, शैक्षणिक साधने नाहीत . उलट शहरी भागात शाळांपासून खाजगी शिकवणीचे गलोगल्ली कारखाने आहेत,बालवाडी पासूनच खाजगी शिकवण्या लावल्या जातात. त्यात CBSE च्या विध्यार्थ्यांना पडणारे भरमसाठ गुण. या गुणांमुळे खुद्द महाराष्ट्रातातील नव्हे तर भारतातील नावाजलेल्या शैक्षणिक सुविधा असलेल्या मुंबई शहरातील दहावीच्या विद्यार्थ्यांची गेल्या ३ वर्षा पासून ससेहोलपट चालू आहे. प्रत्येक वर्षी कोर्टात प्रकरण गेल्या शिवाय प्रवेश होत नाही . आज आगस्ट संपत आला तरी प्रवेश झाले नाही. हा सर्व वाईट अनुभव असूनही सर्व भारतभर एकच सीएटी घेण्याचा अट्टाहास का?
पूर्ण येथे :
http://www.thanthanpal.blogspot.com
No comments:
Post a Comment