भक्तीचा उत्सव, भक्त आणि ईश्वर यांचा अनोखा मेळा म्हणजे पंढरपूरची आषाढी एकादशी यात्रा.
लाखो वारकरी पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरची वाट धरतात, विठ्ठल विठ्ठल च्या नामस्मरणाने अवघे पंढरपूर दणाणून जाते, जात, धर्म, भाषा, द्वेष, मत्सर या पलीकडे जाऊन सर्व लोक एकमेकांना "माउली-माउली" ची हाक देतात, हा अनोखा मेळावा बघणार्यांचे खरच पारणे फिटतात.
त्या तमाम वारकऱ्यांना आणि सर्व भक्तांना आषाढी एकादशी च्या हार्दिक शुभेच्छा !
दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।
जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात !!
आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।
तोषोनिं मज ज्ञावे । पसायदान हें !!
- जिजाऊ.कॉम
1 comment:
आपला अहंकार ही वीट आहे. त्या विटेवर उभे राहून साक्षीभावाने सर्व पाहणार्या विठोबाचा जयजयकार असो.
Post a Comment