Monday, June 14, 2010

मुलांचे करिअर आणि पालक

कालचा उर्वरित लेख येथे  देत आहे 

नुकताच १२ वी चा निकाल लागला आणि पालक व विध्यार्थी यांची एकाच धावपळ चालू झाली. आणि लवकरच १० चा हि निकाल लागेल. पण आत्ता पुढे काय ? हा तर सर्वात मोठा प्रश्न. बऱ्याच विध्यार्थी आणि पालकांचे पुढे काय करायचे याचे नियोजन असते. सर्वांत गोची होती ती त्या विध्यार्त्यांची ज्यांना साधारण गुण मिळाले असतात. त्यांना नेमके काय करावे तेच माहित नसते. शक्यतो हि मुले आर्टस मध्येच admission घेतात. नाहीतर कोणी जवळचा शहाण्या व शिकलेल्या व्यक्तींना विचारून आपला निर्णय घेतात. बरेचजण अमुक अमुक गोष्टीला खूप वाव आहे, घुप पैसा आहे म्हणूनच जास्त तर पालक त्यांच्या मुलांना त्या त्या field मध्ये टाकतात.

पण खरच त्या मुलाला ज्या field मध्ये admission घेत आहोत ती आवडते का नाही हे विचारले जात नाही. तसे आजकालचे पालक शिकलेले आहेत व काही पालक आपल्या मुलाच्या आवडीचाही विचार घेतात. पण मला त्या पालाकांबद्धल बोलायचे आहे जे शिकून नं शिकल्या सारखे आहेत. कारण बऱ्याच वेळा असे आढळते कि अश्या पालकांना वरवरचे बरेच माहित असते पण पूर्ण माहित नसते. मग ते याचे थोडे ऐकून, त्याचे थोडे ऐकून आपला निर्णय घेतात.

महत्वाचा मुद्दा असा कि ज्याला शिक्षण घ्यायचे आहे त्याचा जास्त विचार घेतला जात नाही. आणि बऱ्याचवेळा विद्यार्थ्याला सुद्धा काय करावे ते नाहीत नसते. काय करावे काय करु नये हा ज्याचा त्याचा प्रश्न, पण जो निर्णय घ्यायचा आहे तो पूर्ण विचार करूनच घ्यावा आणि त्यानंतर पाठीमागेच नव्हे तर इकडे तिकडे पण पाहू नये. याचा अर्थ असा नव्हे कि दुसऱ्या गोष्टींचे ज्ञान नसावे. पण बऱ्याच गोष्टी एकदाच माहित झाल्या कि सर्वच छान वाटतात, पण सर्वच करणे शक्य नसते. नाहीतर बऱ्याचवेळा असे होते कि आगोदर एक छान वाटते म्हणून त्यामध्ये उडी मारतात काही दिवसांनी दुसरे बरे वाटते मग वाटते ते करावे. जे काही करायचे आहे ते आगोदर ठरवा आणि टाका उडी त्यामध्ये. कारण एक गोष्ट खरी कि माणसाला ज्या गोष्टी मध्ये आवड असते त्या मध्ये तो जरूर यशस्वी होतो. कधी लवकर होईल नाहीतर कधी वेळ लागेल पण यश हे नक्की आहे.

१० वी , १२ वी नंतर पालकांनी मुलासोबत मित्रासारखे राहावे असे सर्वच लोक सांगत असतात. पण असे सहसा होत नाही. कारण शेवटी आम्ही पालक, आम्ही मोठे, आम्ही म्हणेल तेच खरे असा मुद्दा कुठेतरी येतोच. कारण ते मूळ स्वभावातच नसते. आणि कधी कधी प्रयत्न करून सुद्धा असे होत नाही. पण तेच पालक दुसऱ्याच्या म्हणजेच आपल्या मित्राच्या मुलांना छान सल्ला देऊ शकतात पण आपल्या नाही. कारण मित्राच्या किंवा दुसऱ्याच्या मुलाला सांगताना तो हक्क दाखवता येत नाही आणि याच गोष्टीमुळे ते त्याला छान समजून सांगू शकतात. मग अश्या वेळी हाच मार्ग पर्याय म्हणून का होईना वापरता येऊ शकतो. जर तुम्हाला समजून सांगता येत नसेल तर तुमच्या मित्रांना सांगा. किंव्हा अश्या व्यक्तीला सांगा कि ज्याला त्या क्षेत्रातली माहिती आहे. अश्यावेळी विचारांची देवाण घेवाण छान पद्धतीने होते.

दुसरा आणखीन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे बरेच पालक असा विचार करतात कि काहीतरी शिक्षण घेऊन थोडेसे पैसे वगैरे देऊन मुलाला नौकरी लाऊन देऊ म्हणजे आपली जबाबदारी संपली. हा पैसे देऊन नौकरी हा मुद्दाच मुळात नं पटणारा आहे. आणि तुम्ही अश्याप्रकारे जेंव्हा मुलांसमोर बोलता तेंव्हा त्याची चांगले शिक्षण घ्यायची आवड कमी होऊ शकते. कारण असी एक मानसिकताच बनते कि काही झाले तर पैसे देऊन नौकरी लागेल. यापेक्षा तुम्ही त्याला आगोदर समजाऊन सांगा कि तुला शिक्षणाला पाहिजे ते मी देतो पण नौकरी तू तुझ्या स्वत:च्या कर्तत्वावरच करावी लागेल.

शेवटी जे विध्यार्थी नापास झाले आहेत त्यांच्याबद्धल. जे नापास झाले आहेत त्यांची तर तर गोष्टच वेगळी. आत्ता त्यांचे काय होणार. एकदा नापास झाले म्हणजे त्याचे आयुष्य, त्याचे currier संपले असा एक निकष होतो. पण असे काहीही नाही, कारण अपयश हीच यशाची पहिली पायरी आहे असे म्हणतात. ते विध्यार्थी नापास झाले आहेत ते काटावरती पास झालेल्या विध्यार्थ्यांपेक्ष्या चांगले असे मला तरी वाटते. कारण जे नापास झाले आहेत त्यांना नव्याने काहीतरी करायची इच्छा होऊ शकते. अपयश माणसाला बरेच आकी शिकून जाते. मलातरी वाटते जीवनात प्रतेकाला एकदातरी अपयश यायला पाहिजे. पण या अपयशाची त्या विद्यार्थ्याला जान व्हायला हवी. सोबतच त्याला घरातल्या व आजूबाजूच्या लोकांच्या प्रोत्साहनाची आवशकता असते.

सांगायचा मुद्धा म्हणजे तुम्ही एखाध्याला कितीही समजून सांगा, मारून सांगा किंव्हा काही लालच देऊन सांगा. त्याचे आयुष्य तेंव्हाच भरारी घेणार जेंव्हा त्याला या सर्व गोष्टींची जान होईल. म्हणून एखाद्याला समजाऊन सांगायचे असेल तर त्याला समजाऊन सांगण्यापेक्ष्या त्याला ठराविक गोष्टीची जान करून देण्यान मदत करा.
  

सौजन्य: प्रसाद पवार, उस्मानाबाद 

1 comment:

Waman Parulekar said...

नमस्कार प्रकाशजी. ओळखलत का? मी वामन परुळेकर रत्नागीरी. आपली ओळख सी एस् आय् परीषदेवेळी झालेली. कसे आहात? तुमचा ब्लॉग मनापासुन आवडला. असेच लिहीत रहा.

धन्यवाद

Post a Comment