Sunday, June 13, 2010

मुलांच्या दहावी आणि बारावी नंतर, पालकांच्या जबाबदारी

नुकताच १२ वी चा निकाल लागला आणि पालक व विध्यार्थी यांची एकाच धावपळ चालू झाली. आणि लवकरच १० चा हि निकाल लागेल. पण आत्ता पुढे काय ? हा तर सर्वात मोठा प्रश्न. बऱ्याच विध्यार्थी आणि पालकांचे पुढे काय करायचे याचे नियोजन असते. सर्वांत गोची होती ती त्या विध्यार्त्यांची ज्यांना साधारण गुण मिळाले असतात. त्यांना नेमके काय करावे तेच माहित नसते. शक्यतो हि मुले आर्टस मध्येच admission घेतात. नाहीतर कोणी जवळचा शहाण्या व शिकलेल्या व्यक्तींना विचारून आपला निर्णय घेतात. बरेचजण अमुक अमुक गोष्टीला खूप वाव आहे, घुप पैसा आहे म्हणूनच जास्त तर पालक त्यांच्या मुलांना त्या त्या field मध्ये टाकतात.

पण खरच त्या मुलाला ज्या field मध्ये admission घेत आहोत ती आवडते का नाही हे विचारले जात नाही. तसे आजकालचे पालक शिकलेले आहेत व काही पालक आपल्या मुलाच्या आवडीचाही विचार घेतात. पण मला त्या पालाकांबद्धल बोलायचे आहे जे शिकून नं शिकल्या सारखे आहेत. कारण बऱ्याच वेळा असे आढळते कि अश्या पालकांना वरवरचे बरेच माहित असते पण पूर्ण माहित नसते. मग ते याचे थोडे ऐकून, त्याचे थोडे ऐकून आपला निर्णय घेतात.

पूर्ण येथे वाचा.

सौजन्य: प्रसाद पवार, उस्मानाबाद 



No comments:

Post a Comment