सदर लेखात शासनाने ओपन सोर्स आणि नव्या तंत्रज्ञानाचा कसा वापर करावा या बद्दल खूप काही दिले आहे.
----
आजचे युग ‘डिजिटल’ आहे. पण राज्यकर्त्यांना त्याची पुरेशी जाणीव नाही. चार-दोन उपक्रम इंटरनेटवर सुरू झाले, की आपण माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात वावरत असल्याचा आभास तयार होतो. पण माहिती तंत्रज्ञानाच्या क्षमतेचा पाच टक्केही वापर आपण आजतागायत केलेला नाही. राज्यातील सर्वाना स्वस्त दरात इंटरनेट अॅक्सेस मिळवून देणे आणि राज्यभाषेतील ‘कंटेन्ट क्रिएशन’ या दोन बाबींकडे तरी राज्य शासनाने प्रकर्षांने लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. शिवाजी महाराजांचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्राला आता गरज आहे- ‘डिजिटल व्हिजन’ची!
‘गिव्ह अस द व्हिजन दॅट वी मे नो व्हेअर टू स्टँड अॅण्ड व्हॉट टू स्टँड फॉर. बिकॉज अनलेस वी स्टँड फॉर समथिंग, वी विल फॉल फॉर एव्हरीथिंग !’
पीटर मार्शल यांचे हे विधान जगभरात गाजले. कारण माणूस, संस्था, राज्य अथवा देश यांना व्हिजन म्हणजे दूरदर्शीपणा का, कसा व किती गरजेचा असतो, हे त्यांनी नेमक्या शब्दांत सांगितले. वर्धापन दिनाच्या दिवशी सारे जण आपल्या यशाचे मूल्यमापन करतात. पण त्याच बरोबर गरज असते ती भविष्यातील वाटचालीच्या दिशादर्शनाची.
आज सुवर्णमहोत्सव साजरा करणारा महाराष्ट्र काय अवस्थेत आहे? महाराष्ट्राने वेगवेगळ्या क्षेत्रात बजावलेल्या कामगिरीचा तज्ज्ञांनी घेतलेला आढावा मुळीच दिलासादायक नाही. येणारा काळ हे डिजिटल युग असणार आहे, याची जाणीव एव्हाना आता आपणा सर्वांनाच झालेली आहे, तशीच ती शासकीय पातळीवरही झालेली असावी. पण वास्तव मात्र, जाणीवजागृतीची गरज अधिक असल्याचे स्पष्ट करणारे आहे.
सध्या बरेच जण इंटरनेट आणि मोबाईलचा वापर बँकिंगसाठी करतात. कधी मोबाईलचे बिल तर कधी विजेचे बिल आपण इंटरनेटवरून भरतो आणि इंटरनेटचा पुरेपूर वापर करत असल्याचा आनंद व समाधान आपल्याला मिळते. जी आपली अवस्था तीच सरकारचीही. सरकारचे चार-दोन उपक्रम इंटरनेटवर सुरू झाले, त्या संबंधित विभागामध्ये संगणक लागले आणि तेथील कर्मचारी संगणकावर काम करू लागले की, सरकारला वाटते संगणकीकरण झाले. वेगवेगळ्या विभागांच्या वेबसाईटस् तयार झाल्या की, त्यांना वाटते आपण माहिती-तंत्रज्ञानाचा वापर करू लागलो आहोत. सामान्य जनता त्याचा वापर किती करते, त्यांच्या सोयीचे काय आहे- याचा विचार फारसा होताना दिसत नाही.
पूर्ण येथे वाचवा
सौजन्य: लोकसत्ता
2 comments:
छान लेख आहे. आणि खराहि. कारण केवळ कॉम्पुटर असले किंव्हा MH-CET चा कोर्स केला म्हणजे कॉम्पुटर चे ज्ञान आले असे नाही. तर आत्ता कॉम्पुटर आणि इंटरनेट याची माहिती आणि त्याचा योग्य उपयोग गरजेचा आहे.
Barobar bollat prasadasrao ekadam. jag khup badalay ani tyamule khup sarya vyakhya hi.
Post a Comment