Sunday, March 14, 2010

राजा शंभू छत्रपती !!!! पुण्यतिथी १५ मार्च

शंभू राजांना मानाचा मुजरा !!!!
ईतिहासकारांनी दुर्लक्षलिले, थोरल्या छत्रपतींच्या राजकारणातील अतर्क्य खेळ्या व जबाबदार्‍या वयाच्या ८व्या वर्षापासुन शंभर टक्के यशस्वी करणारे, आप्तांच्या रोशाला फशी पडलेले आणि पराक्रमासोबत कवित्वाचे बहुमोल लेणे घेऊन जन्माला आलेल्या त्या महान योध्याचा जीवनपट। थोरल्या महाराजांच्या अवकाळी मृत्युनंतर घरातील भेदी, स्वकीय शत्रु आणि औरंग्याचे आक्रमण ह्या तीनही आघाडींवर हा रुद्र अविरत लढला. उण्यापुर्‍या ८ वर्षाच्या राजेपणात त्यांनी स्वराज्य दुपटीने वाढविले, रक्षिले, पापी औरंग्याला तब्बल ८ वर्षे सीमेवर हात चोळीत बसावयास भाग पाडीले, त्याला १ किल्ला सुध्दा जिंकता येऊ नये यातच त्यांचे राजकारणी, रणधुरंधर व्यक्तीमत्व सिध्द होते. मात्र केवळ एका जहागिरीपोटी नाराज झालेल्या गणोजी शिर्के नामक हरामजाद्याने स्वतःच्या बहिणीच्या कुंकुवाचा लिलाव मांडत मोगली सैन्याच्या तोंडात महाराजांच्या रुपाने आयता घास दिला. पापी औरंग्याने शिवाजी राजांपासुनच्या पराभवाचे उट्टे काढत या नरशार्दुलाचे अविरत हाल केले, कल्पनातीत अत्याचार केले आणी शेवटी वधु-तुळापुर येथे तुकडे-तुकडे करुन मारुन टाकले. या सर्व प्रवासात त्यांच्या साथीला होते, छंदोगामात्य कवी कलश. त्यांचेही बलिदान ईतिहासकारांनी दुर्लक्षिले.


शिव रुपाने मराठ्यांचा सूर्य उगवला
पराक्रमे तयाच्या महाराष्ट्र दारी भगवा फडकला !!
बापाने घडवल्या मुलुखाला
पुढे रेटाया आज युवराज धड़कला |
सिंहाच्या छाव्या जन्मी घालुनी ,
सयीने पुरंधारी शम्भू जोडीला !!

माथी संकट नसे , तो कोण भोसला
सिद्ध करावया शम्भू लहणपणीच संकटाशी भिडला |
युवराज असुनही त्या दिवासी शम्भू एकाकी पडला
कळन्याअधिच आईचा पदर सरला !!

धाराऊ दुधाने बाळशम्बु सळसळला ,
शिवाचा फ़र्जन्दच तो , त्यांच्या तोलानेच तयाने भगवा हाती धरला |
एक समयी पाच मिहिमा लढला होता ,
मराठ्यांची ताकत धाखवत , शम्भूराजा अवघ्या मुलुखाची शान बनला होता !!

रायगडाच्या होळी माळावर उभ्या त्याच्या आबासाहेबाना मनात आठवत ,
मांवळचा हा वाघ लढत होता |
औरंग्याची गुर्मी उतरवत ,
शिवाचा शम्भू सारी हिरवी धगड़ फोडत होता !!!

गनोजी सिर्क्याच्या बैमान हातान , आप्त्स्वकियानिच त्याचा घाट रचला होता ,
पैस्यापाई त्याना हा स्वाभिमानी राजा नको होता |
सर्वाना पुरून उरनारा शम्भुराजा
म्हनुनच आज शत्रु हाती सापडला होता !!


डोळे फोडले , मीठ चोळले ,
तरी राजा डगमगत नव्हता |
कवडयाच्या माळीवर हात घालनार्यावर ,
त्याअवस्तेताही शम्भुराजा भडकला होता !!!

पण भवानीनेच आज गोंधळ घातला होता ,
म्हनुनच की काय तिला हा वीर स्वर्गातच पाहिजे होता |
शिवाने दिलेल्या शपतेपाई शम्भुराजा महाराष्ट्र धर्मासाठी बेचाळीस दिवस लढला
मरता मरताही भगवा कवटाळत ,
शम्भू राजाने " जग्दम्भ !! " म्हणत हिन्दवी शब्दच उच्चारला होता
हिन्दवी शब्दच उच्चारला होता ....... !!!!


कार्यकर्ते जिजाऊ.कॉम ....
(साभार :- श्याम वाढ़ेकर)

टिप : राजे संभाजी आणि क्षेत्र तुळापुर या बद्दल अधिक माहित इथे वाचा

1 comment:

प्रकाश बा. पिंपळे said...

छत्रपती संभाजी महाराज की जय!

Post a Comment